मंगळवेढा टाईम्स न्युज ।
राज्यात प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी) आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता सातवी) 26 एप्रिल 2026 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.

या परीक्षेची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in आणि https://puppssmsce.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली.

शासनमान्य शाळांमधून 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता चौथीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व सातवीमध्ये प्रवेश घेतलेल्या


विद्यार्थ्यांमधील उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

शाळा माहिती पत्र, आवेदनपत्र आणि शुल्क ऑनलाईन भरण्यासाठी 2 फेब्रुवारी 2026 पर्यंतचा कालावधी देण्यात आला असून विलंब, अतिविलंब आणि अति विशेष विलंब शुल्कासह 28 फेब्रुवारी 2026 पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.

त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही, असे परीक्षा परिषदेमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













