टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील भगरे गल्लीत एका ३४ वर्षीय तरुणाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन राहते घरात कापडी फेट्याच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली असून याची मंगळवेढा पोलीसात नोंद झाली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, दि. ३ रोजी सायंकाळी ५ च्या पुर्वी खबर देणारे विकास भगरे यांचे मयत चुलत भाऊ अमोल गणपत भगरे (वय ३४) याने राहते घराच्या


दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबच्या खोलीत छताच्या हुकास कापडी फेट्याच्या सहाय्याने गळफास घेवून अज्ञात कारणावरुन आत्महत्या केली.


सुधीर भगरे, सोमनाथ भगरे, प्रशांत ओमने, शहाजी जाधव या सर्वांनी मिळून अमोल यास खाली उतरवून उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे घेवून गेले.

मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून ते उपचारापुर्वीच मयत झाल्याचे सांगीतले. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

दरम्यान, एका तरुण व्यक्तीने टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र शहरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
अमोल भगरे याने कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली? कोणी त्रास देत होते का? याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज









