mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक! दोनच महिन्यांपूर्वी झाला होता विवाह, व्हिडीओ बनवून, लोकेशन पाठवून सोलापूरच्या तरुणाने केली आत्महत्या

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 4, 2025
in क्राईम, सोलापूर
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क। 

एका युवकाने उत्तर सोलापूर तालुक्यातील वांगी गायरान झुडपामध्ये आत्महत्या करीत आपली जीवनयात्रा संपवली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी आत्याच्या मुलाच्या मोबाइलवर व्हिडीओ व आत्महत्या करत असल्याच्या ठिकाणाचे लोकेशन पाठवले.

अमर लहू मुळे (वय २५, रा. नान्नज) असे त्या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आत्महत्या करण्याअगोदर त्याने स्वतःच्या मोबाइलमध्ये मी आत्महत्या करत आहे.

पाच व्यक्तींच्या त्रासाला कंटाळून मी आपले जीवन संपवत आहे, असा व्हिडीओ बनवून आत्याचा मुलगा आदेश यांच्या मोबाइलवर व्हिडीओ व आत्महत्या करत असल्याच्या ठिकाणाचे लोकेशन पाठवले आहे.

त्याने विनंती केली आहे की, खंबीरपणे आमच्या पाठीमागे उभे राहा, माझ्या मोबाइलमध्ये फोटो व रेकॉर्डिंग आहे. त्याचा पासवर्डही सांगितला आहे.

अमर याचे वडील, चुलते, चुलतभाऊ व नातेवाइकांनी त्या ठिकाणावर रात्रभर शोधाशोध केली असता तो निदर्शनास आला नाही. रविवारी सकाळी पुन्हा त्या ठिकाणी शोधाशोध घेतली असता अमर याचा कडूलिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला.

या घटनेची माहिती वांगीचे पोलिस पाटील योगिता पवार यांनी तालुका पोलिसांना कळवली. उत्तरीय तपासणी विच्छेदनाकरिता मृतदेह सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला.

अमर याचा दोनच महिन्यांपूर्वी झाला विवाह

अमर हा वाहनचालकाचे व खासगी कंपनीत काम करत होता. ६ जून रोजी पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव गावातील विजय सुरवसे यांची कन्या ऋतुजा यांच्यासोबत झाला होता. दोन महिन्यांतच अमरने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात जाताच आत्महत्येची माहिती आली समोर

शनिवारपासून मुलगा गायब होता, फोनही उचलत नसल्याने तक्रार देण्याकरिता वडील तालुका पोलिस ठाण्यात गेले होते. तोच मुलाने आत्महत्या केली असल्याचा फोन येताच पोलिस ठाण्यातून वडील आत्महत्या केलेल्या घटनास्थळावर आले.

आपल्या एकुलत्या एका मुलाने आत्महत्या केल्याने आई-वडील व नातेवाइकांनी टाहो फोडला. या घटनेची तालुका पोलिस स्टेशनकडून चौकशी सुरू आहे. अमर यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, बहीण आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: गळफास घेऊन आत्महत्या

संबंधित बातम्या

धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

भयंकर! लग्नामध्ये सत्कारात नाव पुकारला नाही, रागाच्या भरात तलाठ्यानं तरुणाच्या डोक्यात टाकला लोखंडी माईक

July 14, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

July 12, 2026
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

July 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बँकेचे पैसे बुडवणे भोवले! धनश्री मल्टीस्टेटची आक्रमक वसुली; कारखान्याच्या माजी संचालकाची थेट तुरुंगात रवानगी; न्यायालयाचा मोठा दणका

July 10, 2026
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

मंगळवेढ्यात बुलेट राजांना दणका! पोलिसांची धडक कारवाई; मॉडिफाईड सायलेन्सर अन् विना नंबर प्लेटच्या ‘या’ वाहनांवर ‘ॲक्शन’

July 10, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

पुनर्वसनाच्या जमिनीवर डोळा! जमीन तुमची, आधार कार्ड खोटे अन् अंगठा दुसऱ्याचाच; मंगळवेढ्यात उजनी जमीन घोटाळ्याचा थरार, वाचून थक्क व्हाल; एजंट मालामाल

July 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आ.समाधान आवताडेंचा धडाका! मंगळवेढ्याला म्हैसाळचे, तर पंढरपूरला कॅनॉलद्वारे मिळणार पाणी; वीज पुरवठाही ८ तास होणार

July 10, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

हट्टापायी पोटचा मुलगा गेला…; सांगोल्यातील ‘या’ घटनेने पालकांचे डोळे उघडले, नक्की वाचा काय घडलं?

July 8, 2026
Next Post
मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, विशेष अधिवेशनापूर्वी महत्वाची घडामोड; किती टक्के आरक्षण मिळणार?

खळबळ! एकनाथ शिंदे कर्णासारखे दानशूर, 40 वर्षाच्या राजकीय जीवनात असा माणूस पाहिला नाही; शरद पवारांचा आमदार शिंदेंच्या प्रेमात

ताज्या बातम्या

धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

भयंकर! लग्नामध्ये सत्कारात नाव पुकारला नाही, रागाच्या भरात तलाठ्यानं तरुणाच्या डोक्यात टाकला लोखंडी माईक

July 14, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

भेसळीच्या विळख्यातून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी तुकाराम मुंढेंचा ‘हा’ मास्टरप्लॅन; नागरिकांना केली मोठी विनंती

July 14, 2026
शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

July 13, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो लक्ष द्या! सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून ‘या’ महत्त्वाच्या मार्गांवर अचानक मोठा बदल, नक्की काय घडणार? पालिकेचा मोठा निर्णय

July 13, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

July 12, 2026
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

July 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा