मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क ।
माणसाच्या आयुष्याचा काही भरोसा नाही म्हणतात ते अनेकदा वेगवेगळ्या घटनांमधून दिसून आलं आहे.
आता, भंडारा शहरातही बॅडमिंटन खेळत असताना सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं बॅडमिंटन कोर्टवरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
भंडारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा स्टेडियमवर ही घटना घडली. त्यानंतर, तातडीनं त्यांना उपचारासाठी डॉ. झंवर यांच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांकडून त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
बाजीराव चिंधालोरे (60) असं मृत सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकांचं नावं आहे. विशेष म्हणजे नुकतेच त्यांचा सेवानिवृत्ती सोहळा पार पडला होता.
सेवानिवृत्तीनंतर ते आपल्याला व्यस्त करण्यासाठी बॅडमिंटन कोर्टवर यायचे, बॅडमिंटन खेळ खेळायचे.
मात्र, काल अचानक खेळता-खेळता ते खाली कोसळले आणि जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. भंडारा शहरातील शिवाजी महाराज स्टेडियमवर ही दुर्घटना घडली असून ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज