मंगळवेढा टाईम्स न्युज
चार महिन्यांत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ६ मे रोजी दिले. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे.
प्रशासकीय आणि राजकीय नियोजनानुसार तीन टप्यांत निवडणूक घेण्याचे नियोजन होत असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
राज्यातील २९ मनपा, २५७नगरपालिका, २६ जिल्हा परिषद आणि २८८ पंचायत समित्यांसाठी ऑक्टोबर महिन्यात या निवडणुका होतील.
काही दिवसांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने सर्व महापालिका, जिल्हा परिषदांना एक पत्र पाठवले होते. त्यात ४० दिवसांत म्हणजे जूनअखेरपर्यंत वॉर्ड, प्रभाग तसेच गण, गट रचना करून घेण्याचे आदेश दिले
ऑक्टोबर महिनाच का निवडतोय राज्य निवडणूक आयोग
२०११ च्या जनगणनेनुसार प्रभाग रचना होणार आहे. काही ठिकाणच्या रचनेत, वॉडांच्या हद्दीत बदल होईल. त्याविरुद्ध लोक न्यायालयात जातील. त्यामुळे प्रभाग रचनेसाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
एकूणच निवडणूक प्रक्रिया अंतिम करण्यासाठी तीन ते साडेतीन महिन्यांचा कालावधी लागेल. म्हणून ऑक्टोबरमध्ये निवडणुका घेता येतील, असे राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांचे म्हणणे आहे.
ईव्हीएम: हवेत दीड लाख
एकाच टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी १ लाख ५० हजार ईव्हीएमची गरज भासणार आहे. मात्र, राज्य निवडणूक आयोगाकडे फक्त ६५ हजार ईव्हीएम आहेत. म्हणूनही तीन टप्प्यांत निवडणूक घेण्याची तयारी आयोग करत आहे.
आखणी: शेवटी मुंबई, ठाणे
निवडणूक आयोगातील सूत्रांचे असे म्हणणे आहे की, पहिल्या टप्प्यात उत्तर व दक्षिण महाराष्ट्रात मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा तर तिसऱ्या टप्प्यात, मुंबई, ठाणे आणि कोकणात मतदान व्हावे, अशी आखणी केली जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज