मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये देणारी पीएम किसान योजना लोकप्रिय ठरली. पण, या योजनेच्या अॅपमुळे मात्र काल शुक्रवारी प्रशासनासह अनेकांची डोकेदुखी वाढवल्याचे दिसून आले.
व्हाटसअॅपवर चुलत भावाकडून आलेली अॅप फाइल तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी मोबाईल फोनवर इन्स्टॉल केली. त्यानंतर तत्काळ त्यांचा मोबाइल हॅक झाला.
व्हाटसअॅप ऑटोमॅटिक लॉगआऊट
व्हाटसअॅप ऑटोमॅटिक लॉगआऊट झाल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली. तोवर त्यांच्या मोबाइलवरून शेकडो जणांना ती फेक फाइल ऑटोमॅटिक फॉरवर्ड झाली होती. त्यामुळे अनेकांचा मोबाइल हॅक झाला.
काल शुक्रवारी रात्री तहसीलदार पाटील यांच्यासह मोबाइल हॅक झालेल्या कर्मचाऱ्यांनी सायबरकडे ऑनलाइन तक्रार नोंदवली. तसेच सायबर कक्षाकडे जाऊन त्याबाबत तक्रार नोंदवली.
तत्काळ मोबाइल फोनमधून त्यांनी सिम कार्ड काढले
पीएम किसान योजनेची फाइल इन्स्टॉल केल्याने तहसीलदार श्रीकांत पाटील व गौण खनिज विभागातील सोमय्या स्वामी यांचे मोबाइल हॅक झाले. लक्षात येताच तत्काळ मोबाइल फोनमधून त्यांनी सिम कार्ड काढले.(स्रोत:दिव्य मराठी)
फाइल इन्स्टॉल करू नये
माझ्या व्हाटसअॅपवर चुलत भावाकडून पीएम किसान योजनेची फाइल आली. ती मी डाऊनलोड केली. त्यातून इन्स्टॉल करण्याचा मेसेज आला. त्यानुसार इन्स्टॉल केली. त्यानंतर मोबाइलच हॅक झाला. तोवर अनेकांना तीच फाइल फॉरवर्ड झाली होती. त्यासंबंधी तक्रार सायबरकडे नोंदवली आहे. ज्यांच्याकडे फाइल आली आहे त्यांनी ती इन्स्टॉल करू नये.’- श्रीकांत पाटील, तहसीलदार
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज