mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

जरा याद करो कुर्बानी! जवान लक्ष्मण पवार यांच्यावर मूळगावी अंत्यसंस्कार; भूमिपुत्रासाठी ग्रामस्थांचे डोळे पाणावले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 17, 2025
in सोलापूर
देशभरात संतापाची लाट! काश्मिरात पर्यटकांवर दहशतवादी हल्ला; दोन परदेशी पर्यटकांसह २६ जण ठार, २० जखमी

मंगळवेढा टाईम्स न्युज मेट

भारतीय सैन्य दलात पश्चिम बंगाल राज्यातील बागडोगरा येथे कर्तव्यावर असताना मृत्यू पावलेले जवान लक्ष्मण संजय पवार यांच्या पार्थिवावर आज 16 मे रोजी गिरझणी येथील मूळग गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.

गावातील स्मशानभूमीत शासकीय इतमामात हजारोंच्या उपस्थितीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी, जवान लक्ष्मण पवार अमर रहे.. भारत माता की जय… वंदे मातरमच्या घोषणांनी स्मशानभूमी परीसर दुमदुमून गेला होता.

तर, जो शहीद हुए है उनकी, जरा याद करो कुर्बाणी हे गीत अंत्यसंस्कार मिरवणुकीत अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावत होते.

माळशिरस तालुक्यातील गिरझणी (इलाक्षीदेवीनगर) येथील जवान पश्चिम बंगाल राज्यातील बागडोगरा येथे भारतीय सैन्य दलात नायक रँक पदावर कर्तव्य बजावत होते.

यावेळी जवान लक्ष्मण संजय पवार (वय 33) यांचे 13 मे रोजी पश्चिम बंगाल येथे निधन झाले होते. आज शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजता त्यांचे पार्थिव अकलूज येथे आणण्यात आले.

अकलूजच्या महर्षी चौकापासून ते गिरझणीपर्यंत सजवलेल्या रथावर जवान लक्ष्मण पवार यांचे तिरंग्यात लपेटलेले पार्थिव ठेऊन अत्यदर्शन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माजी सैनिकांसह हजारो नागरीक सहभागी झाले होते.

रस्त्यावर दुतर्फा उभे राहिलेल्या नागरिकांनी रथावर पुष्पवृष्टी करीत व पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. त्यानंतर जवान लक्ष्मण पवार यांचे पार्थिव राहत्या घरी आणण्यात आले. यावेळी आई, वडील, भाऊ बहीण यांना शोक अनावर झाला होता.

काही वेळ पार्थिव अत्यंदर्शनासाठी घरासमोरील उभारलेल्या मंडपात ठेवण्यात आले होते, त्यावेळी हजारो नागरिकांनी भूमीपुत्राचे अत्यंदर्शन घेत सॅल्यूट केला.

राहत्या घरापासून अत्यंयात्रा काढून गिरझणी येथील स्मशानभूमीत जवान लक्ष्मण पवार यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान पवार यांचे बंधु विकी पवार यांनी चितेला अग्नी दिला.

यावेळी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून बंदुकीचा 24 फेऱ्या हवेत झाडून मानवंदना देण्यात आली. आजी, माजी आमदार विविध संस्थाचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांचेसह हजारो नागरिक जवानाच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते.

दरम्यान, जवान पवार यांचे पार्थिव अकलूज येथे आल्यावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, बाजार समीतीचे अध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार राम सातपुते, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील,सुजयसिंह माने-पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली.

अत्यंदर्शन मिरवणूक शंकरनगर येथे आल्यावर सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील, कार्य. संचालक राजेंद्र चौगुले व अधिकारी कर्मचाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. तर, माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तम जानकर, तहसीलदार सुरेश शेजुळ, पो.नि.भानुदास निभोंरे, सैनिक कल्याण विभगा व माजी सैनिक संघ, यांनीही पुष्पचक्र अर्पण केले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर जवान

संबंधित बातम्या

मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आत्याच्या मुलाशी लग्न, पदरात 2 मुली, सुखाचा संसार सुरू असतानाच महिलेनं मुलीसह संपवलं जीवन, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

July 28, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

बंपर ऑफर! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

July 27, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

​शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा; बोंबाबोंब आंदोलन शिवसेना आक्रमक; मंगळवेढा महावितरणला ८ दिवसांची मुदत; नेमकी अडचण आणि नागरिकांचा विरोध का?

July 24, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

सातबारा, दाखले अन् मोजणी अर्ज आता थेट हातात; सोलापूर जिल्ह्यातील ११ मतदारसंघांत भव्य शिबिर; तुमच्या मतदारसंघात शिबिर कधी आणि कुठे?

July 25, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

बळीराजाला मोठा दिलासा! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ चार गावांतील शेतकऱ्यांना पांडुरंग पावला; कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये २१ शेतकऱ्यांचा समावेश

July 23, 2026
Next Post
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो मशागतीला लागा! आजपासून आठवडाभर विजांच्या कडकडाटासह मुसळधारा; हवामान अभ्यासक पंजाबराव डख म्हणाले...

ताज्या बातम्या

धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 28, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 28, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आत्याच्या मुलाशी लग्न, पदरात 2 मुली, सुखाचा संसार सुरू असतानाच महिलेनं मुलीसह संपवलं जीवन, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

July 28, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणार; ‘या’ तारखेची मतदार यादी स्थगित? पाहा नवीन वेळापत्रक

July 27, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणी वाहून जातंय अन् पिके करपताहेत! भीमा काठच्या शेतकऱ्यांसाठी ८ तास विजेची आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

July 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा