मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर येथील बिरुदेव मंदिराच्या परिसरात एका ३५ वर्षीय जावईबापूने अज्ञात कारणावरुन लिंबाच्या झाडाला गळफास दोरीच्या सहाय्याने घेण्याचा प्रकार घडला असून
अमितकुमार महादेव चौगुले असे त्या आत्महत्या ने करणाऱ्या जावईबापूचे नाव आहे. दरम्यान या घटनेची मंगळवेढा पोलीसात नोंद झाली आहे.
पोलीस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी, यातील खबर देणारे रामा शिंदे (रा. पडोळकरवाडी) यांची मुलगी सुनिता अमितकुमार चौगुले (रा.हुन्नूर) ही आजारी असल्याने औषधोपचाराकरिता आई वडिलाकडेच आली होती.
दि.१२ मे रोजी सकाळी ७.३० वाजता खबर देणारे घरी असताना भैरु भोसले यांनी फोन करुन सांगितले की तुमचा जावई अमितकुमार चौगुले यांनी बिरुदेव मंदिराच्या गेटच्या आतील बाजूस लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेतला आहे.
असे सांगितल्यावर खबर देणारे त्यांनी सदर ठिकाणी जावून पाहणी केली असता जावयांनी दोरीने फास घेतल्याचे दिसून आले.
याची पोलीसांना खबर दिल्यानंतर पोलीसांनी व तेथील लोकांनी सदरचे प्रेत खाली उतरवुन तपासणीसाठी मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात घेवून आले व डॉक्टरांनी मयत झाले असल्याचे खबरमध्ये म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज