मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एक आई आणि मुलीने वडिलांच्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केलीय.
स्नेहा श्रीधर तेली (वय 25) असं आईचं नाव आहे आहे तर मैथली श्रीधर तेली (वय 4) असे अल्पवयीन मुलीचे नाव आहे.
ही घटना काल दि.13 मे रोजी सकाळी 8 च्या सुमारास डोणज या गावात घडली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील डोणज या गावात वडील रेवाप्पा निंगाप्पा देवपुरे यांचे राहते घरात या मायलेकी राहत होत्या.
दोघींनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मंगळवेढा पोलिसांनी या मायलेकींच्या आत्महत्येप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
या घटनेची मंगळवेढा पोलीस ठाण्यात खबर मयत विवाहित महिलेचे चुलते चन्नाप्पा निंगप्पा देवपुरे (वय 42) यांनी दिली आहे.
घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, पोलीस उप निरीक्षक नागेश बनकर आदी अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.
दरम्यान, मयत स्नेहा तेली ही मंगळवेढा येथील एका हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचा अभ्यास करीत होती. तिला सांगली जिल्ह्यात लग्न करून दिले होते. कौटुंबिक वादामुळे ती तिथे न राहता डोनज येथे राहत होती.
सकाळी घरातील सर्व लोक हे कामानिमित्त बाहेर गेले असता स्नेहा तेली हिने आधी मुलगी मैथली हिला गळफास लावला व नंतर स्वतःचा गळफास घेत आत्महत्या केली असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज