mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पाकिस्तानचे तुकडे पडणार, एक तृतीयांश भागावर बलोच आर्मीचा कब्जा, पाकिस्तानी सैन्य चौक्या सोडून पळाले; भारताने प्रतिहल्ल्यात पाकिस्तानचं कंबरडं मोडलं, लाहोर-इस्लामाबादेत स्फोट

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 9, 2025
in राष्ट्रीय
पाकिस्तानचे तुकडे पडणार, एक तृतीयांश भागावर बलोच आर्मीचा कब्जा, पाकिस्तानी सैन्य चौक्या सोडून पळाले; भारताने प्रतिहल्ल्यात पाकिस्तानचं कंबरडं मोडलं, लाहोर-इस्लामाबादेत स्फोट

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

भारतीय सैन्याने गुरुवारी रात्रभरात पाकिस्तानला रात्रभर मोठा दणका दिला आहे. थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंत धडक मारत जोरदार ड्रोन आणि हवाई हल्ले केले.

त्यामुळे इस्लामाबादेत एकच हाहाकार माजलाय. कानठळ्या बसवणाऱ्या स्फोटांच्या आवाजांनी इस्लामाबाद हादरून गेले. केवळ इस्लामाबादच नाही तर लाहोर आणि पेशावरचीही भारतीय सैन्यांनी झोप उडवली…पाकिस्तानातल्या 16 शहरांवर भारतानं जोरदार प्रतिहल्ला करत हाहाकार माजवला…अनेक शहरांमध्ये ब्लॅक आऊट ठेवण्याची वेळ पाकड्यांवर आली.

पाकिस्तानने जम्मू काश्मीरमध्ये एलओसीवर रात्रभर जोरदार गोळीबार केला. त्याला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिलं. भारताने केलेल्या भडीमारात पाकिस्तानी चौक्या अक्षरशः भाजून निघाल्या.

दक्षिण काश्मीरमधील पूंछ, राजौरी, सांबा सेक्टरमध्ये एलओसीवर पाकिस्तानचा रात्रभर तोफांचा भडीमार सुरू होता. तो अजूनही सुरूच आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतानेही तोडीस तोड उत्तर दिलं. पाकिस्तानच्या गोळीबारामुळे संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आलाय.

भारतानं पाकिस्तानला मोठा दणका दिला तो म्हणजे कराचीत…आकाशानंतर समुद्रातूनही भारतानं पाकिस्तानचं कंबरडं मोडलं…
पाकिस्तानातल्या कराची बंदरावरच भारतीय नौदलानं हल्ल्यामागून हल्ले केले…14 पेक्षा जास्त स्फोटांनी कराची बंदर हादरून गेलं…

भारतीय नौदलाच्या धडक कारवाईनंतर घाबरगुंडी उडालेल्या पाकिस्ताननं कराची बंदरात ब्लॅकआऊट केलं. १९७१ नंतर पहिल्यांदाच भारतीय नौसेनेनं पाकिस्तानच्या कराची बंदराला टार्गेट केलं…

भारताला ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या हवाई दलाची भारतानं झोप उडवलीय…भारतानं पाकिस्तानची तीन लढाऊ विमानं गारद केलीयत. चीननं दिलेले पाकिस्तानचे दोन जेएफ १७ आणि अमेरिकेच्या एका एफ १६ विमानाचा भारतीय हवाई दलानं लक्ष्यभेद केला…

भारतानं दोन विमानं पाडल्याची कबुली पाकिस्ताननंच्या सैन्य अधिकाऱ्यांनी दिलीय…पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का असल्याचंही त्यांनी मान्य केलंय. एफ १६ विमानं अमेरिकेनं पाकिस्तानला दिलेत. त्याचा दहशतवादी कारवायांसाठी वापर केल्यानं आता अमेरिका पाकिस्तानवर काय कारवाई करणार ते पाहायचंय.

भारतानं जोरदार प्रत्युत्तर देऊनही नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक सुरूच आहे. त्यात सीमेवरच्या निष्पाप लोकांचा बळी गेलाय…

पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी भारतीय लष्करानंही आक्रमक पवित्रा घेत प्रतिहल्ला चढवला…पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं जोरदार कारवाई केली. पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवर लक्ष्य करत भारतीय सैनिकांनी त्यांची पळता भुई थोडी केली.

पाकिस्तानचे तुकडे पडणार, एक तृतीयांश भागावर बलोच आर्मीचा कब्जा, पाकिस्तानी सैन्य चौक्या सोडून पळाले

भारताच्या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानचे तुकडे पडणार हे निश्चित झालं आहे. कारण बलुचिस्तानच्या बलोच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या एक तृतीयांश भागावर कब्जा मिळवला आहे.

बलोच आर्मीच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्य चौक्या सोडून पळाले. ही घटना म्हणजे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याकडे एक पाऊल असल्याची चर्चा आहे.

पाकिस्तानच्या कुरापतीला उत्तर देताना भारताने आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानवर हल्ला केला. लष्कर, नौदल आणि वायूदलाने संयुक्त कारवाई करत पाकिस्तानला पुरत नामोहरम केलं. त्यामुळे पाकिस्तान कोंडीत सापडला असताना बलुचिस्तामध्येही बंडखोरांनी तोंड वर काढलं.

बलोल आर्मीचा पाकिस्तानवर हल्ला

बलुचिस्तानच्या बंडखोर बलोच आर्मीने पाकिस्तानवर गोळीबार केला. त्यामध्ये पाकिस्तानच्या सैन्याचा निभाव लागला नाही. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याने चौक्या सोडून पळून जाणं पसंत केलं. बलुचिस्तानच्या एक तृतीयांश भागावर कब्जा केल्याचा बलोच लिबरल आर्मीने दावा केला आहे. त्यामुळे स्वतंत्र बलुचिस्तानकडे टाकलेलं हे एक पाऊल आहे.

अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमेजवळील भाग बलोच आर्मीच्या ताब्यात गेला आहे. केच, मस्टंग आणि कच्छीमध्ये बलोच आर्मीने पाकिस्तानला पळवलं. गुरुवारी सकाळी बलोच आर्मीने पाकिस्तानच्या 14 सैनिकांना ब्लास्ट करून ठार केलं होतं. या आधी 11 मार्च 2025 मध्ये बलोच आर्मीने जाफर एक्स्प्रेसचंही अपहरण केलं होतं.

बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला भारताचा पाठिंबा

बलोच लोक हे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराणच्या काही भागात राहतात. त्यातील बहुतांश भाग हा पाकिस्तानच्या ताब्यात आहे. पाकिस्तानी सैन्याने बंदुकीच्या ताकदीवर बलुचिस्तानचा भाग ताब्यात ठेवला आहे. इथले लोक स्वातंत्र्य बलुचिस्तानची मागणी करत आहेत. त्यासाठी बलोच लिबरेशन आर्मीही स्थापन करण्यात आली आहे. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला भारताचा नेहमीच पाठिंबा राहिला आहे.

तुर्कीचे कार्गो विमान कराचीत

भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्याचा मित्र तुर्की मदतीला आल्याचं चित्र आहे. पाकिस्तानमधील कराची विमानतळावर तुर्कीचे एक कार्गो विमान उतरले आहे. जम्मूमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर, या मालवाहू विमानात तुर्की ड्रोन असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एवढी वाताहत झाल्यानंतरही पाकिस्तानची कुरापत करण्याची सवय काही गेली नसल्याचं यावरून दिसतंय.

सांबा सेक्टरमध्ये जैशचे सात दहशतवादी ठार

जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न बीएसएफने उधळून लावला. बीएसएफच्या कारवाईत सात दहशतवादी ठार झाले. मिळालेल्या माहितीनुसार, 10 ते 12 जैश दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: भारत पाकिस्तान युद्ध सुरू

संबंधित बातम्या

घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

भारताच्या मार्गातील ‘मोठा’ अडथळा दूर झाला! Super 8s मध्ये आता लिंबूटींबू संघ दिसणार;  वेळापत्रक फिक्स, पहिलाच सामना हायव्होल्टेज, कुणाचं आव्हान?

February 18, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

टीम इंडियाच्या वाघांनी पाकिस्तानचा फडशा पाडला, आधी फलंदाजांनी धुतलं; नंतर गोलंदाजांनी कंबरडं मोडलं, भारताचा मोठा विजय

February 15, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

काय सांगताय..! बायकोने दीड कोटींना नवरा विकला, गर्लफ्रेंडने पैसे मोजताच दिला ‘हँडओव्हर’; ‘जुदाई’च्या रियल लाइफ स्टोरीची गावभर चर्चा

February 15, 2026
हुन्नूरच्या तरुणाचा दुबईत डंका! कोट्यवधींच्या पगाराची नोकरी; तानाजी गोरडची अबुधाबीत भरारी; मिळाले ‘एवढ्या’ कोटींचे पॅकेज; आमदार समाधान आवताडेंनी थोपटली कौतुकाची थाप

हुन्नूरच्या तरुणाचा दुबईत डंका! कोट्यवधींच्या पगाराची नोकरी; तानाजी गोरडची अबुधाबीत भरारी; मिळाले ‘एवढ्या’ कोटींचे पॅकेज; आमदार समाधान आवताडेंनी थोपटली कौतुकाची थाप

February 14, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

मोठी बातमी! अखेर भारत- पाकिस्तान सामना होणार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये आमने सामने येणार; पीसीबी-आयसीसीच्या बैठकीनंतर निर्णय

February 9, 2026
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! अर्थसंकल्पानंतर सोन्याचे दर कमी होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती…

January 26, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! विना OTP ही उडू शकतात खात्यातून पैसे, फोनमध्ये शिरतोय नवीन वायरस, यापासून कसं वाचाल? ही गोष्ट लक्षात ठेवा

January 22, 2026
मी मटण खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? सुप्रिया सुळेंच विधान चर्चेत; सत्ताधाऱ्यांवर केली ‘ही’ सडकून टीका

मोठी बातमी! सुप्रिया सुळे केंद्रात, रोहित पवार राज्यात मंत्री होणार? पवार गट NDAमध्ये जाणार? ताईंनी थेट सांगितलं

January 10, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

बाबो..! ‘मी कोणतीही टक्केवारी खाणार नाही’, उमेदवाराचं नाद खुळा शपथपत्र; गावभर चर्चा; स्टॅम्पवर दिलेल्या शपथपत्रात काय नमूद केले?

January 10, 2026
Next Post
दानशूर भक्त! मंगळवेढ्यातील श्री.संत दामाजी मंदिर बांधकामाला ‘या’ भाविकांकडून लाखांची देणगी; मंदिराच्या जिर्णोदराचे काम आधुनिक पद्धतीने सुरू

दानशूर भक्त! मंगळवेढ्यातील श्री.संत दामाजी मंदिर बांधकामाला 'या' भाविकांकडून लाखांची देणगी; मंदिराच्या जिर्णोदराचे काम आधुनिक पद्धतीने सुरू

ताज्या बातम्या

घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

भारताच्या मार्गातील ‘मोठा’ अडथळा दूर झाला! Super 8s मध्ये आता लिंबूटींबू संघ दिसणार;  वेळापत्रक फिक्स, पहिलाच सामना हायव्होल्टेज, कुणाचं आव्हान?

February 18, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जिल्हा नियोजनाचा ‘रिमोट कंट्रोल’ कोणाकडे? ४० जागांसाठी ‘या’ महिन्यात निवडणूक; गुडघ्याला बाशिंग बांधून नेते तयार; पालकमंत्र्यांकडे आतापासून फिल्डिंग

February 18, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले; सोलापूर जिल्ह्यातील ७५८ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेला ‘या’ तारखेपासून सुरुवात

February 18, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

February 18, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

February 18, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती नंतर जिल्हा परिषदेच्या निवडी; नव्या सदस्यांचे गॅझेट झाले प्रसिद्ध; निवडणूक कार्यक्रम होणार लवकरच जाहीर;..अशी असेल पुढची प्रक्रिया…

February 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा