mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खतरनाक! मोठ्या भावानेच फसविले माजी आमदार भावाला; माजी आमदारांची पोलिसांत धाव; तिघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 19, 2024
in क्राईम, सोलापूर

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

शेत जमिनीवर परस्पर नाव नोंदवून मोठ्या भावानेच तहसीलदाराशी संगणमत करून माजी आमदाराची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

महादेव बाबूराव चाकोते, जयशंकर महादेव चाकोते अशी संशयित आरोपींची नावे आहेत. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाचे माजी आमदार विश्‍वनाथ बाबूराव चाकोते यांची कारंबा (ता. उत्तर सोलापूर) येथे गट नं.११२/१ ही शेत जमीन आहे. त्या जमिनीवर विश्वनाथ चाकोते यांच्यासह मोठा भाऊ महादेव चाकोते आणि अन्य चौघांची नावे होती.

ती जमीन आमच्या कब्जे वहिवाटेत होती. तरीदेखील मोठा भाऊ महादेव चाकोते याने आम्हाला कोणतीही माहिती न देता आमचे नाव परस्पर कमी करून त्या जमिनीवर स्वत:च्या मुलाचे नाव लावले.

त्यासाठी त्याने उत्तर सोलापूरच्या तत्कालीन तहसीलदाराची मदत घेतली, असाही आरोप विश्वनाथ चाकोते यांनी पोलिसांना सांगितले. तसेच नवसमता ट्रान्सपोर्ट या आमच्या वडिलोपार्जित व्यवसायाच्या नावाने हैदराबाद येथील ऑटो नगरमध्ये असलेली जमिनीवरील आमचे नाव वगळून परस्पर त्याने माहिती न देता मूळ कागदपत्रे गहाळ झाल्याचे सांगून नव्याने बनावट कागदपत्रे तयार करून घेतली.

माजी आमदार बाबूराव चाकोते यांचा मी एकटाच वारसदार असल्याचे भासवून २००७ मधील तत्कालीन तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून संगनमताने फसवणूक केली, असेही फिर्यादीत नमूद आहे.

तसेच ‘तुम्ही कसे जमीन घेता तेच बघतो’ अशी दमदाटी देखील मला करण्यात आल्याचे विश्वनाथ चाकोते यांनी पोलिसांना सांगितले. पोलिस उपनिरीक्षक संजीवनी व्हट्टे तपास करीत आहेत.

भाऊ महादेव चाकोते याने जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्यानंतर फिर्यादी माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी १७ मे २००७ रोजी त्या वाटपासंदर्भातील कागदपत्रांची तहसील कार्यालयाकडे मागणी केली होती.

पण, वाटपासंदर्भातील कोणतीही कागदपत्रे आमच्याकडे उपलब्ध नसल्याचे उत्तर २३ नोव्हेंबर २०२१ रोजी तहसील कार्यालयाने आम्हाला दिल्याचा धक्कादायक खुलासा विश्वनाथ चाकोते यांनी त्यांच्या फिर्यादीतून केला आहे. तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ही फसवणूक झाल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.(स्रोत:सकाळ)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: माजी आमदार फसवणूक

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

शेतकऱ्यांच्या संयमाचा विजय! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात शेतीसाठी मिळणार आता आठ तास वीज; ‘टाळे ठोकू’ इशाऱ्याची प्रशासनाने घेतली धडक दखल

June 21, 2026
मंगळवेढेकरांनो! दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय व इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन; ‘ही’ प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीची असणार उपस्थिती

दहावीच्या निकालात मोठा उलटफेर! पुनर्मूल्यांकनानंतर मंगळवेढ्याची पाटील महाराष्ट्रात सर्वप्रथम; मंगळवेढा इंग्लिश स्कूलच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

June 20, 2026
धक्कादायक! ज्या रुग्णालयात हजारो रुग्णांवर उपचार केले तिथंच घेतला अखेरचा श्वास; सोलापूरमधील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ.शिरीष वळसंगकर यांनी जीवन संपवलं

सोलापुरात खळबळ! देवमाणूस गेला, पण मागे वादाची ठिणगी पडली; डॉ. वळसंगकर यांच्या कुटुंबातील ‘तो’ वाद अखेर चव्हाट्यावर; पोलिसांसमोर मोठा खुलासा

June 20, 2026
मोठी बातमी! धैर्यशील मोहिते पाटलांनी दिला भाजपा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा; भाजपाची मोठी डोकेदुखी वाढणार

अदृश्य शक्तीनं आम्हाला साथ दिली, दुष्काळात ‘वसंत’ बहरेल; धैर्यशील मोहिते पाटलांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

June 19, 2026
‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

स्क्रीनवर लाखो फॉलोअर्स, पण खऱ्या आयुष्यात नरकयातना! रिल स्टार रोहिणी पाराध्येच्या मृत्यूचा खरा विलन अखेर समोर; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 20, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सोलापुरात ‘सिंघम’ इफेक्ट! आता जनतेचाच थेट वॉच; दररोज येताहेत भेसळीच्या ढीगभर तक्रारी; सोलापूर FDA कडून दंडात्मक कारवाईचा बडगा सुरू

June 18, 2026
रक्ताच्या नात्याप्रमाणे सूर्योदय परिवार सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील; अनिलभाऊंची भावनिक साद; सेवानिवृत्त व पदोन्नत कर्मचाऱ्यांचा ‘शाही सन्मान’

रक्ताच्या नात्याप्रमाणे सूर्योदय परिवार सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील; अनिलभाऊंची भावनिक साद; सेवानिवृत्त व पदोन्नत कर्मचाऱ्यांचा ‘शाही सन्मान’

June 17, 2026
धक्कादायक! मंगळवेढा येथून अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल

माणुसकीला काळीमा! अवघ्या ३ वर्षांच्या बालिकेचा विनयभंग; मंगळवेढ्यात संताप, १७ वर्षीय नराधम पोलिसांच्या ताब्यात

June 17, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! मोफत बियाणे मिळणार, पण ‘हा’ अहवाल देणे बंधनकारक; ऑनलाइन नोंदणी करावीच लागणार

June 17, 2026
Next Post
नागरिकांनो! आमदारांना सरकारमध्ये किमंत नाही, पंढरपूर-मंगळवेढ्यासाठी एक ही रुपयाची योजना खेचून आणू शकले नाहीत; अभिजीत पाटील‌ यांनी केले आ.आवताडेंवरती गंभीर आरोप

आमदार अभिजित पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात मांडले अभ्यासपूर्ण प्रश्न; जातीनिहाय जनगणना आणि आरक्षणाचा प्रश्न केला उपस्थित

ताज्या बातम्या

३ वर्षांचं वय अन् काळजाचा थरकाप उडवणारा विक्रम! पोलीस पुत्राने १४ पायऱ्यांची उभी भिंत चढून जाज्वल्य डोरलेचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये इतिहास रचला

३ वर्षांचं वय अन् काळजाचा थरकाप उडवणारा विक्रम! पोलीस पुत्राने १४ पायऱ्यांची उभी भिंत चढून जाज्वल्य डोरलेचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये इतिहास रचला

June 21, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

शेतकऱ्यांच्या संयमाचा विजय! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात शेतीसाठी मिळणार आता आठ तास वीज; ‘टाळे ठोकू’ इशाऱ्याची प्रशासनाने घेतली धडक दखल

June 21, 2026
मंगळवेढेकरांनो! दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय व इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन; ‘ही’ प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीची असणार उपस्थिती

दहावीच्या निकालात मोठा उलटफेर! पुनर्मूल्यांकनानंतर मंगळवेढ्याची पाटील महाराष्ट्रात सर्वप्रथम; मंगळवेढा इंग्लिश स्कूलच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

June 20, 2026
धक्कादायक! ज्या रुग्णालयात हजारो रुग्णांवर उपचार केले तिथंच घेतला अखेरचा श्वास; सोलापूरमधील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ.शिरीष वळसंगकर यांनी जीवन संपवलं

सोलापुरात खळबळ! देवमाणूस गेला, पण मागे वादाची ठिणगी पडली; डॉ. वळसंगकर यांच्या कुटुंबातील ‘तो’ वाद अखेर चव्हाट्यावर; पोलिसांसमोर मोठा खुलासा

June 20, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

मोठी बातमी! सरकारी जमिनी हडपणाऱ्यांना मोठा दणका… ‘या’ जमिनींवर आता थेट महाराष्ट्र शासनाचे नाव लागणार…;  ‘इतक्या’ महिन्यांचा अल्टीमेटम

June 20, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! राज्याला पावसाची हुलकावणी, हवमान विभागाचा हादरवणारा अंदाज; आता थेट ‘या’ तारखेनंतरच पाऊस

June 20, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा