टीम मंगळवेढा टाईम्स ।
टोमॅटो, मिरची, बटाटा, इत्यादी रोजच्या जेवणातल्या फळभाज्यांमधून शेतकरी बांधव बक्कळ उत्पन्न मिळतात. परंतु बदलत्या वातावरणात हे पीक जगवणं ही मोठी कसरत असते.
त्यासाठी विविध उपाययोजना कराव्या लागतात. विशेषतः अति पाऊस पडल्यावर पीक डोळ्यांदेखत सडून जातं, त्याला रोगराई लागते. अशात मिरचीचं पीक जपण्याबाबत सोलापूरच्या शेतकऱ्यानं यशस्वी प्रयोग केला.
सोलापूरच्या हराळवाडी गावातील शेतकरी गोपाळ दिलीप शेळके हे पूर्वी पारंपारिक शेती करत होते. कालांतरानं त्यांनी आधुनिक पद्धतीनं शेती करायला सुरुवात केली.
सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच त्यांनी अडीच एकरात मिरचीची नवीन व्हरायटी असलेल्या ज्वेलरी मिरचीची लागवड केली.
पेपर ग्लास लावल्यानं रोपाचं संरक्षण
शेळके यांनी रानाची योग्य मशागत करून, 4 फुटांची सरी करून मातीवर मल्चिंग पेपर अंथरले आणि पेपर कपमध्ये मिरचीच्या रोपांची लागवड केली. मिरची पिकाला पावसात गोगलगायींपासून मोठा धोका असतो, त्यामुळे पेपर ग्लास लावल्यानं गोगलगायींपासून रोपाचं संरक्षण होतं.
एकरी 30 टन उत्पन्न
गोपाळ शेळके यांनी केलेल्या या प्रयोगामुळे त्यांना एकरी 30 टन उत्पन्न मिळतं. त्यांनी कागदी ग्लासच्या खालचा भाग काढून केवळ आवरणात मिरचीच्या रोपांची लागवड केली.
पावसाळ्यात मिरचीची लागवड केल्यास पेपर कपचा वापर करावा जेणेकरून पिकांना संरक्षण आणि आपल्याला चांगलं उत्पन्न मिळतं, असा सल्ला गोपाळ शेळके यांनी शेतकऱ्यांना दिला.
दरम्यान, मल्चिंग पेपर हा प्लॅस्टिकपासून बनवलेला पेपर आहे. तो बेडवर किंवा वाफ्यांवर टाकला जातो. त्यामुळे तणापासून, जमिनीची धूप होण्यापासून संरक्षण होतं.
शिवाय पाण्याची बचत होते. एकसमान तापमान, एकसमान ओलावा राहण्यासाठी मदत मिळते. याचा पिकाला भरपूर फायदा होतो. टरबूज, मिरची यांसारख्या पिकांवर मल्चिंग पेपर वापरल्यास विषाणूंपासून पिकांचं रक्षण होतं.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज