mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यू, अज्ञात व्यक्तींनी चार ते पाच गोळ्या झाडल्या; कोण आहेत बाबा सिद्दिकी?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 12, 2024
in राजकारण, राज्य
मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यू, अज्ञात व्यक्तींनी चार ते पाच गोळ्या झाडल्या; कोण आहेत बाबा सिद्दिकी?

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच, बांद्रा पूर्वेत खेरवाडी परिसरात ही घटना घडली आहे.

तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच ही घटना घडली आहे. तोंडाला रुमाल बांधून तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून दोघांना अटक केली आहे.

पंधरा दिवसांपूर्वी आली होती धमकी

बाबा सिद्दिकी यांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. पंधरा दिवासांपूर्वी त्यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. आता त्यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे.

लिलावती रुग्णालयाच्या परिसरात आणि वांद्रे पूर्व परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू झाला आहे.

बाबा सिद्दिकी हे वांद्रे पूर्व परिसरातील बडे नेते असून त्यांनी राज्याचे मंत्री म्हणूनही काम केलं आहे. त्यांचे पुत्र झिशान सिद्दिकी हे वांद्रे पूर्व मतदारसंघातून आमदार आहेत. लोकसभेच्या आधी बाबा सिद्दिकी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

कोण आहेत बाबा सिद्दिकी?

झियाउद्दीन उर्फ बाबा सिद्दिकी हे मुंबईतील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक समजले जात होते. तीन वेळा ते आमदार झाले आहेत. त्याशिवाय मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

1999, 2004 आणि 2009 मध्ये ते सलग तीन वेळा वांद्रे पश्चिम मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार राज्यमंत्री आदी खातीदेखील सांभाळली आहेत.

बाबा सिद्दिकी हे 1992 आणि 1997 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. 2000-2004 या कालावधीत काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सिद्दिकी यांची नियुक्तीही केली होती.

बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समितीवर महत्त्वाच्या पदावर होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत बाबा सिद्दीकी यांचा अशिष शेलार यांनी पराभव केला होता.

लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी बाबा सिद्दिकी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांचे पुत्र झिशान सिद्दिकी हे वांद्रे पूर्वमधून आमदार आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: बाबा सिद्दीकी गोळीबार

संबंधित बातम्या

आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

चिंताजनक! राज्यात ‘या’ रोगाचा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन; लक्षणे आणि उपचार?

September 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! माजी सैनिकानं आधी बायकोला संपवलं; मुलावरही जीवघेणा हल्ला; मग स्वतः भीमा नदीकाठी गळ्याला दोर लावला

September 3, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सावधान! नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; पॅकेटवरील एक्स्पायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री, 11 कंपन्यांविरुद्ध कारवाई

September 2, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

September 1, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 29, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारला मुदत दिली; मागण्या पूर्ण न झाल्यास ‘या’ तारखेपासून उपोषण सुरू करणार

August 25, 2026
Next Post
निधीसम्राट! गेल्या अनेक वर्षांचे शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण; तामदर्डी बंधारा परिसरातील शेतकऱ्यांकडून गट, मतभेद बाजूला ठेवून समाधान आवताडे यांना पुन्हा आमदार करण्याचा केला निर्धार

निधीसम्राट! गेल्या अनेक वर्षांचे शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण; तामदर्डी बंधारा परिसरातील शेतकऱ्यांकडून गट, मतभेद बाजूला ठेवून समाधान आवताडे यांना पुन्हा आमदार करण्याचा केला निर्धार

ताज्या बातम्या

आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा

September 5, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

September 4, 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्या निमित्ताने आज मंगळवेढ्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन; झी टॉकीज फेम बाल कीर्तनकारचे होणार कीर्तन

मंगळवेढ्यात आज रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी जन्मोत्सव सोहळा थाटात संपन्न होणार; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

September 4, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उद्या मंगळवेढा तालुका १००% बंद; सकल मराठा समाज आक्रमक, प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन

September 3, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

चिंताजनक! राज्यात ‘या’ रोगाचा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन; लक्षणे आणि उपचार?

September 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा