मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
गेल्या अनेक वर्षांपासून संवेदनशील राजकारणाचा कळीचा मुद्दा ठरलेला तामदर्डी बंधारा निर्मितीसाठी मी केलेले प्रामाणिक प्रयत्न हीच माझ्या आमदारकीची फलश्रुती असल्याचे भावनिक उद्गार पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले आहेत.
आमदार आवताडे यांच्या प्रयत्नांतून तामदर्डी बंधाऱ्यासाठी ३५ कोटी निधी मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला आरंभ झाला आहे.
आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून आपला गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित असणारा अतिशय महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागल्याने या भागातील माचणूर, ब्रह्मपुरी, तामदर्डी सिद्धापूर, अरळी, तांडोर, बठाण, उचेठाण, रहाटेवाडी आदी गावातील शेतकऱ्यांनी संयुक्तपणे आमदार आवताडे यांचा माचणूर येथील श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात भव्य नागरी सत्कार व शेतकरी मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सदरप्रसंगी सत्काराच्या उत्तराखल बोलताना आमदार आवताडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना माजी सरपंच विलास डोके यांनी सांगितले की, मतदारसंघातील विविध विकास बाबींना करोडो रुपयांचा निधी मंजूर करत आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या कार्य नेतृत्वाची एक वेगळीच आणि विश्वासपूरक प्रतिमा निर्माण केली आहे.
निधीसम्राट आमदार अशी ओळख असणाऱ्या त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे या बंधाऱ्याचे या भागातील शेतकऱ्यांचे गेल्या अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण झाल्याने एक वेगळाच उत्साह या भागातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.
त्याचबरोबर कार्यक्रमामध्ये बोलताना उद्योजक जनार्दन शिवशरण यांनी सांगितले की, सामान्य जनतेच्या प्रश्नांबद्दल प्रचंड आपुलकी आणि जिव्हाळा असणाऱ्या आ आवताडे यांच्यासारख्या एका कामसू लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून या बंधाऱ्याचा प्रश्न सुटल्याने या भागातील शेतकऱ्यांचे शिवार अक्षरशः नंदनवन होईल.
मतदार संघातील धोरणात्मक विकासाच्या अनुषंगाने मूलभूत आणि पायाभूत विकास बार्बीना ऐतिहासिक निधी खेचून आणणाऱ्या आमदार समाधान आवताडे यांच्या २०२४ मधील आमदारकीसाठी आपण सर्वांनी आपापसातील गट, मतभेद बाजूला ठेवून
एकजुटीने आणि एक दिलाने काम केल्यास या मतदारसंघांमध्ये परिवर्तनाचे एक वेगळेच चित्र निर्माण होईल आणि ते सामान्य जनतेच्या विकासासाठी लाखमोलाचे असेल असे त्यांनी नमूद करून आमदार समाधान आवताडे यांच्या या कार्यकृतीबद्दल उपस्थित शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर आभार व्यक्त केले.
यावेळी माजी मुख्याध्यापक जगदीश पाटील, युवा नेते भागवत बेदरे, दत्तात्रय पवार, श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे विकास पुजारी यांनीही आपली मनोगते व्यक्त करून सदर बंधाऱ्याची गरज आणि महत्व सखोलपणे विशद केले.
या कार्यक्रमास श्री दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे, माजी पंचायत समिती सदस्य नवनाथ पवार, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजीव बाबर, जिल्हा लेबर फेडरेशन संचालक शाम पवार, दामाजीचे माजी संचालक राजन पाटील,
ज्येष्ठ नेते बबन पाटील, तानाजी पाटील, ठेकेदार प्रकाश शेवाळे, सचिन शिवशरण, सतिश शिवशरण, हरिभाऊ काकडे, बबन सरवळे, डॉ. अविनाश पवार, सरपंच दत्तात्रय कोळी, बठाणचे सरपंच कोडग,
आबासो डोके, गोपाळ पवार, बिभिषण बेदरे, उपसरपंच प्रकाश डोके, गणेश बेदरे, विकास पवार यांच्यासह संबंधित गावातील शेतकरी आणि महिला मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप बिनवडे यांनी केले तर शेतकरी लाडिक डोके यांनी सर्वांचे आभार मानले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज