टीम मंगळवेढा टाईम्स ।
गणेश उत्सवाला केवळ सात दिवस बाकी असून, गणेश मंडळांकडून तयारीला सुरुवात झाली आहे. या मंडळांना वीजपुरवठ्याचे कनेक्शन सोयीस्कर व्हावे, यासाठी महावितरणने उपकेंद्रामध्ये ही सुविधा केली आहे.
गणेश मंडळांना घरगुती दरात हे वीज कनेक्शन मिळणार आहे. मंडळांना रीतसर अर्ज करून वीज जोडणी करता येणार आहे.
सर्वत्र गणेश उत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अनेक गणेश मंडळांकडून सभामंडप, देखावे व आरास तयार करण्याला सुरुवात केली आहे.
महावितरणकडून गणेश मंडळांना वीजपुरवठा कनेक्शन देण्यासाठी सुविधा महावितरणने सुरू केली आहे.
घरगुती दरात वीज कनेक्शन महावितरणकडून घरगुती, व्यावसायिक तसेच औद्योगिक दरात वीज जोडणी दिली जात असते.
गणेशोत्सवाशिवाय नवरात्र उत्सवातही मंडळांना वीजपुरवठा महावितरणकडून केला जातो.
जोडणीसाठी अर्ज करता येईल
गणेश मंडळांना वीजपुरवठा जोडणीसाठी अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन, जुनी गिरणी आवारातील ग्राहक सुविधा केंद्र आणि सबडिव्हिजन कार्यालयातही जोडणीसाठी अर्ज करता येईल.
पोलिस आयुक्तालयात झालेल्या शांतता कमिटीतदेखील मंडळांना आवाहन केले आहे. आवश्यक कागदपत्र व एनओसी जोडल्यास त्वरित कनेक्शनची परवानगी दिली जाईल. – आशिष मेहता, कार्यकारी अभियंता, सोलापूर शहर
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज