टीम मंगळवेढा टाईम्स।
अलीकडच्या काळात सुरक्षेच्या प्रश्न चांगलाच पुढे येत आहे. दरम्यान, जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येणार आहे.
सर्वच शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासंदर्भात शिक्षण विभागाला निर्देश दिले असून, लवकरच त्याबाबतचा आढावा घेऊन १०० टक्के शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागतील,
मुलं सुरक्षित राहतील, असा विश्वास जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी बोलताना व्यक्त केला.
मनीषा आव्हाळे यांची पुण्याला बदली झाल्यानंतर कुलदीप जंगम यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे शक्रवारी स्वीकारली.
शनिवारी सकाळी जंगम यांनी अक्कलकोट तालुक्यातील वळसंग येथील प्राथमिक आरोग्य केंदाला अचानक भेट दिली. त्यानंतर दहिटणेवाडी यासह अन्य दोन शाळांना भेट देऊन पाहणी केली.
सर्वच शाळांमध्ये तक्रार पेटी लावणार
नूतन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारताच दुसऱ्या दिवशी काही शाळांना भेट दिली. त्यावेळी शाळांमध्ये तक्रार पेटी नसल्याचे दिसून आले.
त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच शाळांना तक्रार पेटी लावण्याबाबतचे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहेत. शिवाय तक्रार पेटीत आलेल्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्याबाबतही कळविले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज