टीम मंगळवेढा टाईम्स ।
सहा वेगवेगळ्या जुगार गुन्ह्यातील वेगवेगळ्या अंमलदारांनी जमा केलेली रक्कम ७ लाख ८५ हजार ९६९ रुपयेचा अपहार केल्याप्रकरणी सांगोल्याचे सहाय्यक फौजदार तथा तत्कालीन मुद्देमाल व नगदी कारकून अब्दुल लतिफ अमरुद्दीन मुजावर याच्यावर सांगोला पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान गुन्हा दाखल होताच आरोपी तथा सहाय्यक फौजदार फरार झाले असून त्याच्या तपासासाठी विशेष पथके तपासिक अंमलदार पो.नि. यांनी नेमली आहेत.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील आरोपी तथा सहाय्यक फौजदार हे सांगोला पोलीस ठाण्यात कार्यरत असताना सन २०१६ ते २०२० या कालावधीत विविध अंमलदारांनी सहा वेगवेगळ्या ठिकाणी
जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यातून मिळालेला मुद्देमाल रुपये ७ लाख ८५ हजार ९६९ रुपये चा अपहार स्वतःच्या पदाचा गैरवापर करुन आर्थिक फायद्यासाठी केली.
तसेच नगदी कारकून यांनी सदर रक्कम वेळोवेळी चलनाने विहित मुदतीत शासनास भरणा केली नसल्याची फिर्याद सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप यांनी दिल्यावर दि. २० ऑगस्ट रोजी सदर आरोपी विरुध्द सायंकाळी ६.५८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा अधिक तपास मंगळवेढ्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण हे करीत असून आरोपीच्या शोधासाठी त्यांनी विशेष पथक नेमले आहे. या पथकाने सोलापूर शहर व अक्कलकोट तालुका पिंजून काढला आहे मात्र आरोपी अदयाप हाती लागला नाही.
दरम्यान, आरोपीला शोधण्यासाठी पोलीस पथक रात्रंदिवस सोलापूर जिल्ह्याच्या लगत असलेल्या जिल्ह्यामध्ये शोध घेत आहे.
दरम्यान शासकीय मुद्देमालावरच कायदयाचे रक्षणकर्त्या पोलीस अधिकाऱ्यानेच डल्ला मारल्याने नेमका विश्वास ठेवायचा कोणावर असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला असून या घोटाळ्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
एकीकडे सुशिक्षीत बेकार युवकांना नोकऱ्या मिळत नसल्याने ते हैराण झाले असताना ज्यांना नोकरी मिळाली आहे ते मात्र शासकीय पैशाचा गैरव्यवहार करुन स्वतःचे उखळ पांढरे करुन घेत असल्याचे दिसून येत आहे. पोलीस दलातच काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने असे केलेल्या कृत्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन बनत चालली आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज