mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

‘तुम्हाला आयुष्यातला सर्वात मोठा फटका 2024 मध्ये बसणार’; मनोज जरांगे यांचा ‘या’ बड्या नेत्याला मोठा इशारा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 20, 2024
in राज्य
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. “फडणवीस साहेब आम्ही तुम्हाला कधीही विरोधक मानले नाही.

तुम्हीच आमच्यावर खोटे केसेस करून आता तुम्ही पश्चात्ताप करीत आहात. राजीनामा देण्योपेक्षा आम्हाला आरक्षण द्या. हैद्राबाद संस्थानचे गॅझेट अद्याप तुम्हाला भेटले नाही. EWA, ECBC आणि कुणबी तीनही A पर्याय ठेवा.

ज्याला जे मिळेल ते मिळेल. आता पश्चात्ताप करू नका. मराठ्यांचा द्वेष सोडून द्या. छगन भुजबळ यांचं ऐकलं म्हणून हे सर्व झालं. तुम्ही छगन भुजबळ यांच्या माध्यमातून आमच्या विरोधात गेला आहात”, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

“तुम्ही मराठ्यांचा रोष घेवू नका. इथे केवळ ओबीसींची बाजू ऐकून घेत आहात. मराठ्यांची बाजू ऐकत नाही. मराठे संपविण्यासाठी तुम्ही का उतावीळ झाला आहात? आम्ही तुमचे विरोधक नाहीत. कोण भुजबळ आणि फिजबळ? त्यांचं आम्ही का ऐकावे? 13 टक्के आरक्षण दिल्यावर तुमचे 106 आमदार मराठ्यांनी निवडून दिले होते. आम्हाला चिरीमिरी कशाला देता?”, असा सवाल जरांगे यांनी केला.

‘फडणवीस साहेब तुम्हाला लाज वाटली पाहिजे’

“देवेंद्र फडणवीस तुम्हीच छगन भुजबळ यांना आमचे प्रमाणपत्र बोगस आहेत, असे बोलण्यास सांगितले. माझ्यावर SIT का नेमली? कारण काय? एवढा रोष कशामुळे आहे? पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला गोळ्या घातल्या, त्याला तुम्ही बढती दिली.

मराठ्यांना मारहाण करण्यासाठी तुम्ही दुसऱ्या जातीचे पोलीस आणले. पोलीस आमच्या बायकांच्या मुंडक्यावर पाय देत होते. फडणवीस साहेब तुम्हाला लाज वाटली पाहिजे. अनेक महिला आमच्या तडीपार केल्यात”, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

‘तुम्हाला आयुष्यातला सर्वात मोठा फटका….’

“कोकणातले लोक माझ्याबद्दल का बोलतात? त्याचे काय कारण? कापूस बेंड्या तो कोण आहे? मराठ्यांच्या विरोधात जावून फडणवीस आज तुम्ही पश्चात्ताप करतात. भाजपमधले मराठे आज अस्वस्थ आहेत. तुम्हाला आयुष्यातला सर्वात मोठा फटका 2024 मध्ये बसणार आहे. मराठा, मुस्लिम, दलीत, बारा बलुतेदार, धनगर, बंजारा, आदिवासी सर्व लोक परेशान आहेत. तुम्ही केवळ मतापूर्ते काम करता?”, असा सवाल जरांगेंनी केला.

‘आमच्या पोरांवर अन्याय करू नका’

‘उठ की सुट ईडीची धमकी देत आहेत. त्यामुळे सत्ता येणार नाही. लोक सर्वात शेवटी विचार करतील. फडणवीस यांना सरळ पाडून टाका. माझे आवाहन आहे. मला राजकारणात जायचे नाही. माझी मागणी कुणबी प्रमाणपत्र, आरक्षण आणि केसेस मागे घेण्यासाठी मागणी आहे. आमचे प्रश्न निकाली काढा. छगन भुजबळ यांचे ऐकून आमच्या पोरांवर अन्याय करू नका.

विदर्भ, खान्देश, ओबीसी आरक्षणात पूर्ण गेला आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आरक्षण लागू आहे. ओबीसी यादीत मराठा हा 83 क्रमांकावर येतो. मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का? इतर समाजाचे व्यवसाय जर सारखे होत असतील तर मराठ्यांचे कसे जमत नाही?”, असं मनोज जरांगे म्हणाले.

‘मला हलक्यात घेवू नका’

फडणवीस साहेब, तुम्ही गोंधळ निर्माण करून ठेवला आहात. वेळ द्या म्हटल्यावर आम्ही वेळ दिला. तुम्ही मात्र पाळला नाहीत. मला निर्णय घेण्याची आत आमची मागणी मान्य करा. 28 ऑगस्ट पर्यंत आमची मागणी मान्य करा. मला हलक्यात घेवू नका”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

“तुम्ही पश्चात्ताप झाल्यासारखे खचल्यासारखे बोलत आहात म्हणून मी बोलत आहे. तुम्ही कितीही योजना आणा. रेल्वेने पैसे जरी वाटले तर तुम्ही आता सत्तेत येणार नाहीत. जतीजातीत तेढ निर्माण करण्याचे काम केले. दरेकर तुमच्या शब्दाच्या बाहेर जाऊ शकत नाही. लाड खोड, डाकू माकु. कोण आहेत? हे अन्नाला मोहताज आहेत.13 वर्षापूर्वीची केस माझी शोधून काढली. संभाजीनगर सिडकोमधले तुमचेही प्रकरण मला माहीत आहे. मात्र मी तसे करणार नाही”, असं मनोज जरांगे म्हणाले.

‘अन्यथा तुमची राज्यात एकही सीट लागू देणार नाही’

“भुजबळ यांच्या डोक्यावर केस राहिले नाहीत. आमच्या वाट्याला जाऊ नका. मी क्षेत्रात उतरलो तर सीट निवडून येऊच देणार नाही. मी कोणता डाव कुठे टाकेल हे तुम्हाला कळणार नाही. आम्ही 200 वर्ष पूर्वीपासून आरक्षणात आहोत. धनगर बांधवांना आमच्या आंदोलनाच्या विरोधात घालू नका. आरक्षण द्या. अन्यथा तुमची राज्यात एकही सीट लागू देणार नाही”, असादेखील इशारा मनोज जरांगे यांनी दिला.(स्रोत:TV9 Marathi)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मनोज जरांगे पाटील

संबंधित बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो नोंद घ्या! ऐन शाळा सुरू होताच शिक्षकांचा ‘एल्गार’; ७ आणि ८ जुलैला शाळा बंद राहण्याची शक्यता; काय आहे कारण?

July 6, 2026
आमदार रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात सामाजिक उपक्रमांचा धडाका; ​उद्योजक राहुल ताड यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम

आमदार रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात सामाजिक उपक्रमांचा धडाका; ​उद्योजक राहुल ताड यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम

July 5, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

शेतकऱ्यांनो! ट्रॅक्टर-बैलगाडी आता कोणीच अडवणार नाही; शेतीकामांसाठी मुरूम, वाळू, दगड मोफत

July 3, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

कामाची बातमी! ग्रामीण भागातील बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; मोफत राहणे, खाणे आणि १००% नोकरीची हमी; ‘प्रथम फाउंडेशन’ व पंचायत समितीचा मोठा पुढाकार

July 2, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सिंघम रिटर्न! FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा दणका; बाजारपेठेतून सुटे तेल गायब, बनावट दूध, पनीर विक्रेते रडारवर; डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; भेसळखोरांचे धाबे दणाणले

July 2, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकऱ्यांच्या जीवनात नवा प्रकाश! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ऐतिहासिक मोठी घोषणा; शेतकऱ्यांचा ‘हा’ मोठा त्रास आता कायमचा संपणार?

July 2, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

शेतजमीन नसली, तरीही राबणारी महिला ‘शेतकरी’च; महिला सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर; कोणाला मिळेल दर्जा? कुठे करावा अर्ज?

July 2, 2026
सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अख्ख्या गावाला मोफत रक्तपुरवठा

हे यमराजा, उद्या आमच्या बायका येतील पण…;  वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला नक्की काय घडलं? पुरुषांनी फोडला हंबरडा; ज्याची चर्चा आता संपूर्ण राज्यात आहे?

June 29, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

तिकडे NEET चा बाजार, इकडे TET चा तमाशा; गरिबांच्या पोरांनी फक्त फी भरायची का? प्रहारच्या राकेश पाटीलांचा संतप्त सवाल; टीईटी’ परीक्षा कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी

June 28, 2026
Next Post
दुःखांचा डोंगर! दाढ दुखीने घात केला, आईने फोडला टाहो; मंगळवेढ्यात भाऊ बहिणीवर शोकाकुल वातावरणात झाले अंत्यसंस्कार

दुःखांचा डोंगर! दाढ दुखीने घात केला, आईने फोडला टाहो; मंगळवेढ्यात भाऊ बहिणीवर शोकाकुल वातावरणात झाले अंत्यसंस्कार

ताज्या बातम्या

​पोलीस ठाण्याच्या मैदानात रंगला थरार; मंगळवेढा व्हॉलीबॉल स्पर्धेत ‘हे’ संघ ठरले मानकरी; पोलीस-जनता सलोख्यासाठी रंगले सामने

​पोलीस ठाण्याच्या मैदानात रंगला थरार; मंगळवेढा व्हॉलीबॉल स्पर्धेत ‘हे’ संघ ठरले मानकरी; पोलीस-जनता सलोख्यासाठी रंगले सामने

July 6, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

सावधान! बीएलओ तीनदा येऊनही भेटला नाही तर मतदार यादीतून नाव होणार बाद; ​निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

July 6, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो नोंद घ्या! ऐन शाळा सुरू होताच शिक्षकांचा ‘एल्गार’; ७ आणि ८ जुलैला शाळा बंद राहण्याची शक्यता; काय आहे कारण?

July 6, 2026
आमदार रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात सामाजिक उपक्रमांचा धडाका; ​उद्योजक राहुल ताड यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम

आमदार रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात सामाजिक उपक्रमांचा धडाका; ​उद्योजक राहुल ताड यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम

July 5, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

​काळजाचा थरकाप! लेकरांना जेवत्या ताटावरून उठवलं, झोपवायला नेते म्हणून गेली; विहिरीतील ‘ते’ दृश्य पाहून गावकऱ्यांचा हंबरडा

July 5, 2026
बसवेश्वर स्मारकासाठी निधी देण्याचे दिले आश्वासन; अर्थसंकल्पात कोणतीच निधीची तरतूद केली नाही

अखेर प्रतीक्षा संपली! महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठी महत्त्वाची पाऊले; ‘या’ तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

July 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा