टीम मंगळवेढा टाईम्स ।
मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी शाळांना स्वतः भेटी देऊन विद्यार्थ्यांचे पेपर तपासणी केली असता पॅट चाचणी पेपरमध्ये अनेक चुका आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
त्यामुळे डायटचे अधिकारी यांना पॅट संकलित चाचणी पेपर तपासणीचे निर्देश देण्यात आले होते. त्याअनुषंगाने डायट अधिकारी यांनी अनेक शाळांना भेटी देऊन पॅट चाचणीचे उत्तर पेपर तपासणी केली असता त्रुटी आढळलेल्या शाळांना भेटी देण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केल्या.
जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये पेपर तपासणीमध्ये अनेक त्रुटी निर्देशनास आल्या. त्यामधील एकूण ५३ शाळांत अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी ५३ शाळांतील मुख्याध्यापकांची बैठक घेऊन त्यांना सक्त सूचना देऊन त्रुटीचे खुलासे गटशिक्षणाधिकारी यांना सादर करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख व डायट अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली उपशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांनी शाळांची तपासणी भेटी वाढवून ऑनलाइन व ऑफलाइन वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिले आहेत.
सीईओंनी घेतली मुख्याध्यापकांची शाळा
डायटचे अधिकारी यांच्या शाळा तपासणीत शिक्षक- मुख्याध्यापकांची पेंट चाचणीचे पेपर तपासणीमध्ये समाधानकारक कामगिरी नसल्याचे दिसून आले आहे.
याबाबत वारंवार सूचना करूनही सुधारणा होत नसल्यास मुख्याध्यापक यांना कारणे दाखवा नोटीस काढा, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत. शिक्षण विभागामधील गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण विभागाकडे विशेष लक्ष केंद्रित केल्याचेही यावेळी सांगण्यात आले.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज