mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! समान नागरी कायदा, बांग्लादेशातील हिंदूंची सुरक्षा, विकसित भारत.. मोदींच्या भाषणातील ‘हे’ 10 महत्त्वाचे मुद्दे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 15, 2024
in राष्ट्रीय
आयुष्य समर्पीत! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशवासीयांना आवाहन; स्वातंत्र्यदिनी ‘हा’ संकल्प केला

टीम मंगळवेढा टाईम्स ।

देशभरात आज 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय. स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी ते अनेक महत्त्वाच्या विषयांवर व्यक्त झाले.

युनिफॉर्म सिव्हिल कोड, संविधान आणि बांग्लादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबद्दलही ते बोलले. मोदींच्या या भाषणातील दहा महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत, ते पाहुयात.

स्पेस सेक्टर- स्पेस सेक्टर हे भविष्य आहे. महत्त्वाचा पैलू आहे. स्पेस सेक्टरमध्ये बऱ्याच सुधारणा केल्या आहेत.

स्पेस सेक्टरमध्ये अनेक स्टार्टअप येत आहेत. आम्ही दूरगामी विचार करुन स्पेस सेक्टर मजबूत करत आहोत. आज प्रायव्हेट रॉकेट लॉन्च होत आहेत. उपग्रह सोडले जात आहेत.

आज देशात नवीन संधी निर्माण झाल्या आहेत.
मध्यमवर्गीय- मध्यमवर्गीय देशाला भरपूर काही देतो. त्यामुळे देशाची पण त्याच्याप्रती जबाबदारी आहे. 2047 पर्यंत लोकांच्या आयुष्यात सरकारचा हस्तक्षेप कमी झाला पाहिजे, हे माझं स्वप्न आहे. गरज असेल तेव्हा सरकार तिथे असेल, असं पीएम मोदी म्हणाले.

शिक्षा निती- नवीन उंची गाठण्यासाठी पुढे जायचं आहे.

आज नवीन शिक्षा निती आणली आहे, जी 21 व्या शतकाच्या अनुरुप आहे. माझ्या देशातील युवकांना शिक्षणासाठी परदेशात जायची गरज लागू नये अशी शिक्षा नितीवर काम करत आहोत, असं पीएम मोदी म्हणाले.

वैद्यकीय शिक्षण- मेडीकल शिक्षणावर लाखो रुपये खर्च होतात. यात आम्ही मागच्या 10 वर्षात मेडीकल सीट वाढवून 1 लाख केल्या आहेत. दरवर्षी 25 हजार युवांना मेडीकल शिक्षणासाठी परदेशात जावं लागतं.

पुढच्या पाच वर्षात मेडीकल क्षेत्रात 75 हजार नवीन जागा निर्माण करणार आहोत. 2047 साली विकसित भारत स्वस्थ भारत असला पाहिजे” असं पीएम मोदी म्हणाले.

गेमिंग- भारत बेस्ट क्वालिटीसाठी ओळखला गेला पाहिजे. इंडियन स्टँडर्ड हे आंतरराष्ट्रीय स्टँडर्ड बनलं पाहिजे. ते उत्पादनाच्या क्वालिटीवर अवलंबून आहे, क्वालिटीवर भर द्यावा लागेल.

डिझायनिंग क्षेत्रात बरंच काही नवीन देऊ शकतो. आज गेमिंगचं खूप मोठं मार्केट आहे. गेमिंगमध्ये नवीन टॅलेंट आहे. विश्वातील मुलांना गेमिंगकडे आकर्षित करु शकतो.

भारताचे युवा, आयटी प्रोफेशनल, AI प्रोफेशन्लसनी गेमिंगकडे लक्ष दिलं पाहिजे. आपली गेमिंग उत्पादनं जगात पोहोचली पाहिजेत, असं पीएम मोदी म्हणाले.

बांग्लादेशातील हिंदू- “बांग्लादेशात जे काही झालंय, त्याबद्दल चिंता आहे. मी आशा करतो, तिथे परिस्थिती सामान्य होईल. बांग्लादेशात हिंदू, अल्पसंख्याक समुदायाची सुरक्षा सुनिश्चित झाली पाहिजे. शेजारी देशात सुख, शांती नांदावी हीच नेहमी भारताची भूमिका राहिली आहे.

त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमचे तसे संस्कार आहेत. बांग्लादेशाच्या विकास यात्रेत आमचं शुभचिंतन राहील”, असं मोदी म्हणाले.
सेक्युलर सिव्हिल कोड- सेक्युलर सिव्हिल कोड ही वेळेची गरज आहे. धर्माच्या आधारावर भेदभावातून मुक्ती मिळाली पाहिजे. परिवारवाद आणि जातीयवादातून मुक्ती आवश्यक आहे.

चुकीच्या कायद्यांना आधुनिक समाजात स्थान नाही असं पीएम मोदी म्हणाले.

बँकिंग- आधी बँका संकटात होत्या. बँकिंग सेक्टर मजबूत बनवण्यासाठी अनेक सुधारणा केल्या. त्यामुळे बँका मजबूत झाल्या. मध्यमवर्गीयांची स्वप्न पूर्ण करण्याची ताकद बँकांमध्ये आहे.

शिक्षणासाठी, परदेशात जाण्यासाठी तसंच अन्य कामांसाठी लोन हवं असेल तर ते बँकांमुळे शक्य होतं. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. पण लोकांना मायबाप कल्चरचा सामना करावा लागला. सतत सरकारकडे मागावं लागायचं.

आज सरकार स्वत: लोकांपर्यंत जातंय”, असं पीएम मोदी म्हणाले.

नैसर्गिक आपत्ती- देशाच्या विविध भागांमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तींचाही उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात केला. “या आपत्तींमध्ये अनेकांनी आपल्या कुटुंबीयांना, प्रियजनांना गमावलंय. आज मी त्या सर्व बाधिक लोकांप्रती मनापासून सहानुभूती व्यक्त करतो. त्यांना मी आश्वासन देतो की आम्ही या कठीण प्रसंगी त्यांच्या पाठिशी उभे आहोत”, असं मोदी म्हणाले.

कोलकातामध्ये प्रशिक्षणार्थी वैद्यकीय विद्यार्थिनीवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी देशभरात झालेल्या व्यापक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील महिलांवरील अत्याचाराच्या मुद्द्यावरही व्यक्त झाले.

“मला लोकांच्या आक्रोशाची जाणीव आहे. महिलांवरील अत्याचारासाठी दिलेल्या शिक्षेचा व्यापक प्रचार करण्याची गरज आहे. जेणेकरून परिणामाची भीती आरोपींमध्ये निर्माण होईल.”(स्रोत:TV9 Marathi)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पंतप्रधान नरेंद्र मोदी

संबंधित बातम्या

सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

धक्कादायक! शिक्षिकेने ६ वर्षांच्या विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली; पुढच्याच क्षणी चिमुकल्याचा जागीच तडफडून मृत्यू

August 22, 2026
मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

August 15, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले? दिल्लीच्या राजकारणात शरद पवारांची मोठी खेळी

July 23, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; ‘या’ एका कागदपत्राची सक्ती कायमची रद्द; लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

June 27, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

भयंकर निष्काळजीपणा! डॉक्टरांच्या अनुपस्थितीत नर्सने केली प्रसूती; निष्पाप माता-बाळाचा बळी, चितेच्या राखेत पुरावा

June 22, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण..

June 9, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मोदीजी! सामान्यांनी जगायचं कसं? ​‘अच्छे दिन’ कुठे गेले? महागाईने गाठला उच्चांक; काँग्रेसची महागाई हटवण्यासाठी भाजपला आणले, पण आता जनतेवरच ‘महागाईचा सर्जिकल स्ट्राईक’

June 8, 2026
Next Post
मोठी घडामोड! मंगळवेढा बसस्थानक गेटमधील अतिक्रमण काढेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात; प्रहार संघटनेचा पाठिंबा

मोठी घडामोड! मंगळवेढा बसस्थानक गेटमधील अतिक्रमण काढेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात; प्रहार संघटनेचा पाठिंबा

ताज्या बातम्या

मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! बचत गट अन् भिशीच्या नावाखाली अडीच कोटींची फसवणूक, तिघांवर गुन्हा; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

August 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा