mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खबरदार! व्हॉट्सॲप ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट पडली तर सदस्यासह ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरून कारवाई; पोलिसांचा ग्रूप ॲडमिनला इशारा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 4, 2024
in मनोरंजन, राज्य, सोलापूर
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

टीम मंगळवेढा टाईम्स ।

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. आज निकाल जाहीर झाल्यानंतर कोणीही सोशल मीडियाद्वारे (फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप) किंवा इतर माध्यमातून कोणत्याही समाजाच्या,

जाती- धर्माच्या भावना दुखावतील, अशा पोस्ट, कमेंट, स्टोरी, स्टेटस, फोटो प्रसारित केले आणि त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्‌भवल्यास संबंधित ग्रूपच्या ॲडमिनवर देखील कारवाई होणार आहे.

भारतीय दंड विधान संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत संबंधितांवर कठोर कारवाई होवू शकते, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोणाच्याही विरोधात घोषणाबाजी करू नये, डीजे वाजणार नाहीत, फटाके फोडले जाणार नाहीत, विनापरवाना विजयी मिरवणूक निघणार नाही, याची सर्वांनीच खबरदारी घ्यायची आहे.

तसेच व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनने निकाल जाहीर होईपर्यंत ग्रुपचे सेटिंग ‘only admin’ करून घ्यावे, जेणेकरून आपल्यावर कारवाई होणार नाही, असे आवाहन पोलिसांनी व्हॉट्‌सॲप ॲडमिनला केले आहे. ग्रूपमधील कोणाताही सदस्य त्याठिकाणी वादग्रस्त पोस्ट टाकू शकणार नाही.

मात्र, ऍडमिनने ग्रुपमध्ये सेटिंग बदल नाही केला आणि कोणी त्या ग्रूपवर वादग्रस्त पोस्ट टाकल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरून त्यांच्याविरूद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ग्रूप ॲडमिनवर ‘या’ कलमांअंतर्गत कारवाई

सोशल मिडियावरील एखाद्या पोस्टमधून कोणाचे चारित्र हनन झाल्यास, कोणाचा अवमान झाल्यास किंवा त्या पोस्टमधून जातीय तेढ निर्माण होऊन काही अनुचित प्रकार घडल्यास तथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, कोणाचा खून किंवा जबर हाणामारी झाली तर निश्चितपणे ग्रूपमधील त्या सदस्यासह ग्रूप ॲडमिनलाही जबाबदार धरले जाते.

त्यांच्यावर आयपीसी कलम ३४ प्रमाणे (सामुहिक इरादा), कलम १५३ (राजकीय व सामाजिक तेढ) या कलमाप्रमाणे कायदेशीर कारवाई केली जाते. सोशल मिडियातून कोणी कोणाला शिवीगाळ केली किंवा धमकी दिल्यास कलम ५०४ व ५०६ प्रमाणे देखील कारवाई होते. या कलमाअंतर्गत संबंधितास ६ महिने ते ३ वर्षांपर्यंत शिक्षा होवू शकते, असे सायबर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ग्रूप ॲडमिननी खबरदारी घ्यावी

व्हाट्सअप ग्रुपचे अॅडमिन यांनी ०३/०६/२०२४ ते दिनांक दिनांक ०६/०६/२०२४ या कालावधीमध्ये त्यांच्या ग्रुपच्या सेटिंग मध्ये ओन्ली अॅडमिन करून बदल करून घ्यावा, जेणेकरून ग्रुप मधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुप वर टाकणार नाहीत जर ऍडमिन यांनी सेटिंग मध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप अॅडमिन ला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल .- रणजित माने, पोलीस निरीक्षक,

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: खबरदारी

संबंधित बातम्या

धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

धक्कादायक! सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज

August 19, 2026
धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

August 19, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! इन्स्टाग्रामवर ओळख झाली अन्… मंगळवेढ्यातील महिलेची मोठी फसवणूक, पोलिसांत गुन्हा दाखल

August 18, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

मोठी बातमी! ​सात वर्षांखालील शिक्षेच्या गुन्ह्यात आधी नोटीस बंधनकारक; कोल्हापूर उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

August 17, 2026
कत्तलखान्याकडे जाणारी ३१ जनावरे पकडली; मंगळवेढ्यातील दोघांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! फक्त ‘एवढ्या’ टक्के हप्त्यात जनावरांना मिळणार विमा संरक्षण; पशुधन दगावल्यास मिळणार भरपाई; आजच अर्ज करा

August 17, 2026
मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

August 15, 2026
मेजवानी! मराठी व हिंदी गाण्याच्या ‘ट्रॅक शो’; सुरसंगम ग्रुपचा आज सहावा वर्धापनदिन सोहळा

मंगळवेढ्यात आज घुमणार देशभक्तीचा सूर! ‘सुरसंगम’ व ‘माजी सैनिक संघटने’तर्फे ‘मेरे देशप्रेमियों…’ कार्यक्रमाचे भव्य आयोजन

August 15, 2026
​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

गुंतवणूक भविष्याची, बचत आजची! ​स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्राहकांसाठी ‘फ्री खरेदीखत’ ऑफर जाहीर; ‘दामाजी सिटी’ला नागरिकांचा उदंड प्रतिसाद; आजच 9890605962 बुकिंगसाठी कॉल करा

August 16, 2026
शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न सुटणार! ५ टीएमसी पाण्यासाठी सर्व्हेचे आदेश; आमदार समाधान आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

August 12, 2026
Next Post
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत 11 व्या फेरीनंतर कोण आघाडीवर? मतमोजणी कल बघा…

मोठी बातमी! टपाली मतदानात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे तर माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर

ताज्या बातम्या

धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

धक्कादायक! सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज

August 19, 2026
हक्काच्या पैशांसाठी वृद्धांची फरफट! ३ दिवस उलटले तरी चेअरमन-संचालक गायब; दामाजी कारखान्याला ‘गेट बंद’चा थेट इशारा; मंगळवेढ्यात संतापाचा भडका

​वर्षानुवर्षांचा वनवास संपणार कधी? थकीत रकमांचा निर्णय होईना; दामाजी कारखान्याचे निवृत्त कर्मचारी आक्रमक; आज कारखान्याला ठोकणार कुलूप?

August 19, 2026
धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

August 19, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

वडिलांवर रुग्णालयात उपचार, डबा घेऊन जाताना मुलावर काळाचा घाला; मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर अपघात

August 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! इन्स्टाग्रामवर ओळख झाली अन्… मंगळवेढ्यातील महिलेची मोठी फसवणूक, पोलिसांत गुन्हा दाखल

August 18, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

ॲट्रॉसिटी गुन्ह्यातून पत्रकार नवत्रे व ग्रामसेवक पाटील निर्दोष मुक्त; पुराव्याअभावी न्यायालयातून नाव वगळले;​ राजकीय सूडबुद्धीचा डाव उधळला

August 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा