mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

गणपतीपुळे समुद्रात सोलापूरचे चौघे बुडाले, पंढरपूरच्या युवकाचा मृत्यू; तिघांना वाचविण्यात यश

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 3, 2024
in सोलापूर
खड्ड्यातील पाण्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील दुर्दैवी घटना

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर व पंढरपूर येथील चार दुचाकीवर मित्र समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद लुटायला गेले असता अजित वाडेकर चौघे अंघोळ करताना खोल समुद्रात बुडाल्याची घटना रविवारी सकाळी गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) येथे घडली.

या दुर्घटनेत अजित धनाजी वाडेकर (२५, रा. इसबावे परिचारक नगर, पंढरपूर, जि. सोलापूर) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. मात्र, अन्य तिघांना वाचविण्यात  यश आले.

अजय बबन शिंदे (२३), आकाश प्रकाश पाटील (२५) आणि समर्थ दत्तात्रय माने (२४, सर्व रा. सोलापूर) अशी दुर्घटनेतून वाचलेल्या तिघांची नावे आहेत. अजित वाडेकर आणि त्यांचे मित्र रविवारी सकाळी १० वाजता दुचाकींवरून पंढरपूर येथून गणपतीपुळे येथे देवदर्शन व पर्यटनासाठी आले होते.

देवदर्शन न करता आधी समुद्रात अंघोळ करण्याचा निर्णय चौघांनी घेतला. अंघोळ करताना खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यावेळी अजित वाडेकर खोल पाण्यात अडकले. त्यांना बाहेर येता येत नसल्याचे लक्षात येताच मित्रांनी व इतर पर्यटकांनी आरडाओरड केली.

ही गोष्ट जीवरक्षक आणि गस्तीसाठी असलेले गणपतीपुळे पोलिस दूरक्षेत्राचे सहायक पोलिस उपनिरीक्षक संदीप साळवी व हेडकॉन्स्टेबल कुणाल चव्हाण यांच्या निदर्शनाला येताच त्यांनी जीवरक्षकांना बोलावून समुद्राच्या पाण्यात पाठवले.

जीवरक्षक अक्षय माने, महेश देवरुखकर, अजिंक्य रामाणी, विशाल निंबरे यांच्यासह व्यावसायिक राकेश शिवलकर यांनी समुद्राच्या पाण्यात उड्या घेऊन तिघांना पाण्याबाहेर काढले. त्यानंतर पाण्यात अडकलेल्या अजित वाडेकर यांना बेशुद्धावस्थेत बाहेर काढून देवस्थानच्या रुग्णवाहिकेने मालगुंड प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल करण्यात आले.

वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा जाधव यांनी तपासून अजित वाडेकर यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. उर्वरित तिघांची प्रकृती सुस्थितीत असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी जयगड पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.

वर्षभरापूर्वीच लग्न

अजित वाडेकर हा मागील दोन वर्षापूर्वी पंढरपूर येथे मामाच्या गावाला राहायला आला होता, त्याचे मामाच्या मुलीसोबत वर्षभरापूर्वीच लग्न झाले. तो दुचाकी वाहने दुरुस्ती करण्यात पटाईत मिस्त्री होता. यामुळे त्याला दुचाकीवर फिरण्याची आवड होती.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: समुद्र

संबंधित बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

‘उजनी’त ३० हजारांचा विसर्ग धरणातील पातळी ‘इतके’ टक्के; भीमेत विसर्ग वाढला, बंधारे पाण्याखाली जाण्याची भीती

June 24, 2025
पॉवर गेम! ‘राष्ट्रवादी’ नक्की कुणाची? आज होणार स्पष्ट; दोन्ही गटाच्या बैठकांकडे…

शरद पवार गटाच्या सोलापूर जिल्ह्यातील आमदाराकडून पेपरात अजितदादांच्या ‘घड्याळा’ची जाहिरात; पेपर वाचताच पक्षात खळबळ माजली

June 23, 2025
मंगळवेढा हादरला! एका विवाहित महिलेवर तीघांचा जबरी अत्याचार; इज्जतेपोटी ‘त्या’ विवाहितेने केली आत्महत्या; आरोपींना ठोकल्या बेड्या

संतापजनक! बापानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; हात-पाय दाबायला सांगत धरले हाताला अन्…; अत्याचारित मुलीला मंगळवेढा पोलिसांनी तत्परतेने मिळवून दिला न्याय

June 23, 2025
‘सूर्योदय’ने समाजातील प्रत्येक घटकांसोबत अतूट नाते जोडले; सेवानिवृत्त शिक्षक, सैनिक यांचा सहकुटुंब गौरव; सूर्योदय समूहाचे सर्व उपक्रमांचे नागरिकांकडून मनापासून कौतुक

‘सूर्योदय’ने समाजातील प्रत्येक घटकांसोबत अतूट नाते जोडले; सेवानिवृत्त शिक्षक, सैनिक यांचा सहकुटुंब गौरव; सूर्योदय समूहाचे सर्व उपक्रमांचे नागरिकांकडून मनापासून कौतुक

June 22, 2025
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

दुर्दैवी घटना! आषाढी एकादशीच्या तोंडावर पंढरपुरात दुर्घटना; विठ्ठलाच्या दर्शनासाठी व माळ घालण्यासाठी आलेल्या तरुण भाविकाचा बुडून मृत्यू

June 21, 2025
कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा, विवाहितेने घेतला गळफास; सोलापुरातील धक्कादायक घटना

दुहेरी आत्महत्येचे गुढ उकलले! चार मित्रांनी पोलिसांना दिलेल्या जबाबातून माहिती आली पुढे; हळव्या प्रेमाचा करुण अंत…

June 21, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

एकाच खोलीत एकाच ओढणीने तरुण-तरुणीने संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहिलं अस काही सगळेच झाले शॉक; सोलापूर जिल्ह्यातील घटनेने खळबळ

June 20, 2025
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

महापुराचा धोका टाळण्यासाठी ‘या’ ठिकाणी पाणी सोडावे लागणार; उजनीतून पाणी सोडल्यास पूरस्थितीची भीती

June 20, 2025
दामाजी महाविद्यालय, इंग्लिश स्कूलची यशाची परंपरा कायम, प्राची ओमने व निकिता आवताडे तालुक्यात प्रथम; मंगळवेढ्याचा निकाल १२ टक्क्याने घसरला, यंदा ८५.८४ टक्के उत्तीर्ण

फेरतपासणीत सोलापूर जिल्ह्यातील दहावीचा विद्यार्थी राज्यात दुसरा, पुनर्मूल्यांकनात तीन विषयात वाढले ‘एवढे’ गुण; कुठेही क्लासेस न लावता मिळवले ९९.८० टक्के गुण

June 21, 2025
Next Post
वाहनधारकांनो! मंगळवेढा-सोलापूर रोडवरील टोल नाका सुरू; ‘या’ नागरिकांना मिळणार मासिक पास

मोठी बातमी! सोलापूरच्या चार बाजूंनी प्रवास महागला; लोकसभा निवडणूक होताच 'टोल'धाड; 'या टोलनाक्यांवर दरवाढ'

ताज्या बातम्या

विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

मोठी बातमी! ‘या’ महामार्गास कॅबिनेटची मंजुरी, महाराष्ट्र GST कायद्यात सुधारणा; मंत्रिमंडळ बैठकीत ‘हे’ 8 मोठे निर्णय

June 24, 2025

कामाची बातमी! सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते होणार अधिकारी; निवडणुकीपूर्वी फडणवीस सरकारकडून खास संधी

June 24, 2025
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

‘उजनी’त ३० हजारांचा विसर्ग धरणातील पातळी ‘इतके’ टक्के; भीमेत विसर्ग वाढला, बंधारे पाण्याखाली जाण्याची भीती

June 24, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

कधी होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका? प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर; असे असणार महत्त्वाचे टप्पे

June 24, 2025
सोलापुरातील शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी; ‘कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी’ आता नव्याने ‘असा’ अर्ज करता येणार

शेतकऱ्यांसाठी खास बातमी; केंद्रीयमंत्री नितीन गडकरींची ‘ट्रॅक्टर’ बाबत मोठी घोषणा

June 24, 2025
नागरिकांनो! अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ‘खोमनाळ’मध्ये आज इंदुरीकर महाराजांचे कीर्तन; हजारोंच्या संख्येने असणार गर्दी

नागरिकांनो! अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ‘खोमनाळ’मध्ये आज इंदुरीकर महाराजांचे कीर्तन; हजारोंच्या संख्येने असणार गर्दी

June 24, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा