टीम मंगळवेढा टाईम्स ।
लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातले मतदान शनिवारी पार पडले. यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गावरील टोलचे नवे दर जाहीर केले.
सोलापूर- पुणे, सोलापूर-सांगली, सोलापूर-विजापूर, सोलापूर- अक्कलकोट, सोलापूर-येडशी या मार्गावर कारचा, जीपचा प्रवास पाच रुपयांनी महागला आहे. गेल्या दहा वर्षांत टोलचे दर दुप्पट झाल्याचे दिसून येत आहेत.
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणकडून दरवर्षी मार्च अथवा एप्रिल महिन्यात टोलनाक्यांची दरवाढ जाहीर केली जाते. यंदा या महिन्यांमध्ये लोकसभेची आचारसंहिता लागू होती.
नवी दरवाढ आज सोमवार, तीन जूनपासून लागू होणार आहे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर एकूण चार टोलनाके – आहेत.
सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत वरवडे आणि सावळेश्वर हे दोन – टोलनाके आहेत. सोलापूर-येडशी महामार्गावर जिल्ह्याच्या लगत तामलवाडी टोलनाका आहे.
सोलापूर-सांगली महामार्गावर मोहोळ तालुक्यातील इचगाव, सांगोला तालुक्यातील अनकढाळ येथे टोलनाका आहे.
सोलापूर-पंढरपूर महामार्गावर पेनूर येथे टोलनाका आहे. सोलापूर- अक्कलकोट महामार्गावर वळसंग येथे टोलनाका आहे. सोलापूर-विजयपूर महामार्गावर नांदणी येथे टोलवसुली होते. या टोलनाक्यांवर दरवाढ झाली आहे.
पुण्यासाठी पूर्वी ३००, आता ३२० लागतील
■ सोलापूर-पुणे महामार्ग दहा वर्षांपूर्वी पूर्ण झाला. त्यावेळी कार, जीपसाठी २५ ते ३० रुपये घेतले जायचे. २ जून २०२४ पर्यंत सावळेवश्वर, वरवडे, इंदापूर टोलनाक्यावर कार व जीपसाठी प्रत्येकी ७० रुपये द्यावे लागायचे. पाटस टोलनाक्यावर ९० रुपये असे एकूण चार टोलनाक्यांवर ३०० रुपये लागायचे. आता ३२० रुपये द्यावे लागतील.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज