mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर व माढ्याची मतमोजणी एकाचवेळी स्वतंत्रपणे होणार; प्रत्येक विधानसभानिहाय १४ टेबलवरून ‘एवढ्या’ फेऱ्याद्वारे मोजणी केली जाणार; दुपारपर्यंत निकाल हाती येणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 14, 2024
in सोलापूर
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत 11 व्या फेरीनंतर कोण आघाडीवर? मतमोजणी कल बघा…

टीम मंगळवेढा टाइम्स ।

सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघातील मतदानाची मतमोजणी येत्या ४ जून रोजी सकाळी आठ वाजल्यापासून रामवाडी गोदामात करण्यात येणार आहे. निकालाची उत्सुकता सर्वांनाच लागली असून मोजणीच्या नियोजनाची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे.

सोलापूर व माढ्याची मोजणी एकाचवेळी स्वतंत्रपणे वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभानिहाय १४ टेबलवरून २४ फेऱ्याद्वारे ही मैतमोजणी केली जाणार आहे. मतमोजणीचे नियोजन पाहता दुपारी एक वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याचा अंदाज आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात १२ लाख १ हजार ५८६ तर माढा लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात १२ लाख ६७ हजार ५३० जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

मतदानानंतर दोन्ही मतदारसंघातील इव्हीएम रामवाडी गोदामात स्ट्रॉगरुममध्ये कडक बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत. या इव्हीएमसाठी पोलिसांचा खडा पहारा आहे. याशिवाय सीसीटीव्हीचीही नजर आहे.

निकालाची उत्सुकता दिवसागणिक वाढत असून अनेक ठिकाणी पैजा लागत आहेत. सोलापूर मतदारसंघात १ हजार ९६८ तर माढा मतदारसंघात २ हजार ३० मतदान केंद्रे होती. प्रत्येक विधानसभा क्षेत्राची १४ टेबलवर मोजणी करण्यात येणार आहे.

त्यानुसार एका फेरीत ८४ केंद्रांची मोजणी होईल. यानुसार सुमारे २३ ते २४ फेरीत मतमोजणी पूर्ण होईल. प्रत्येक फेरीची आकडेवारी त्या त्या वेळी स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

सुरूवातीला पोस्टल मते मोजली जाणार आहेत. यात ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, सैनिक व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या मतदानाचा समावेश आहे.

सोलापुरात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे व भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यात तर माढ्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते-पाटील व भाजपचे विद्यमान खासदार स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात लढत होत आहे. यात कोण बाजी मारणार, याबाबत पैजा लागल्या आहेत.

सोलापूरची मोजणी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या नेतृत्वाखालो तर माढ्याची अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे. मतमोजणी कर्मचाऱ्यांना एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

वाढीव मतदानाबद्दल काँग्रेसची तक्रार

मतदान संपल्यानंतर प्रशासनाने मतदानाची प्राथमिक आकडेवारी जाहीर केली. पुन्हा दुसऱ्या दिवशी अंतिम आकडेवारी जाहीर केली. या दोन्ही संख्येत तफावत असून याविषयी संशय आल्याने काँग्रेसचे निवडणूक प्रमुख, माजी आमदार प्रकाश यलगुलवार व शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निहऱ्हाळी यांची भेट घेऊन तक्रार केली.

यावेळी निहाळी यांनी काँग्रेस नेत्यांच्या शंकेचे निराकरण केले असून त्यांना विधानसभानिहाय मतदान केंद्रावरील मतदानाची आकडेवारीही दिली. तसेच काँग्रेसच्या मागणीनुसार सीसीटीव्ही फुटेजही देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर लोकसभा मतमोजणी

संबंधित बातम्या

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

दोन पावले मागे, की मोठ्या झेपची तयारी? समर्थक निराश, जाणकार खूश; प्रशांत परिचारकांच्या शांत भूमिकेमागे दडलंय काय?

June 7, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळेची भीती संपणार! सोलापूर जिल्ह्यात ‘या’ शाळेतच अंगणवाडी भरणार; बालवयात शाळेची गोडी लागणार; ग्रामीण शिक्षणाला मिळणार नवी दिशा

June 6, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

मालक, आता निर्णय घ्या! परिचारक समर्थकांचा भाजपला थेट इशारा, बंडखोरी की पेल्यातील वादळ? पक्षाने शब्द पाळला नाही; प्रशांत परिचारकांकडून मात्र ‘सबुरी’चा सल्ला

June 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मदरशात धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली अश्लील चाळे; सोलापूरच्या नराधम मौलानाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पीडितांचा आकडा वाढण्याची भीती

June 2, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! जन्म दाखल्याच्या ऑर्डरसाठी २ हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

June 2, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

सोलापूर विधानपरिषदेत भाजपचा मोठा डाव; प्रशांत परिचारकांना डावलून राजेंद्र राऊतांना उमेदवारी, परिचारक गट नाराज?

June 1, 2026

तरुणांनो सावधान! बॉडी फुगवण्यासाठी वापरले जाणारे घातक इंजेक्शन विकणारे रॅकेट जेरबंद; २ लाखांचा मुद्देमाल जप्त; सोलापूर जिल्ह्यात अवैध नशिल्या इंजेक्शनचा काळा बाजार उघड

June 1, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

ब्रेकिंग न्यूज! सोलापूर विधान परिषदेसाठी प्रशांत परिचारक फायनल? अधिकृत घोषणा बाकी; मात्र भाजपच्या ‘त्या’ नेत्याच्या एन्ट्रीने सस्पेन्स वाढला

May 30, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धडाधड गोळीबार, सहा जणांचा मर्डर! मंगळवेढा तालुक्याच्या शेजारील राज्यात साऊथ सिनेमाला लाजवेल असं मन विचलित करणारं हत्याकांड; रस्ता रक्ताने माखला, हत्येचं कारण समोर

May 30, 2026
Next Post

बाप लेकाची करामत! पिता-पुत्राने केला विवाहितेचा विनयभंग; महिलेला अर्वाच्य भाषेत केली शिवीगाळ

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

जनगणनेच्या कर्तव्यावर निघालेल्या ‘आदर्श शिक्षका’चा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू; कुटुंबाचा एकमेव आधारस्तंभ हरपला

June 7, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

दोन पावले मागे, की मोठ्या झेपची तयारी? समर्थक निराश, जाणकार खूश; प्रशांत परिचारकांच्या शांत भूमिकेमागे दडलंय काय?

June 7, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळेची भीती संपणार! सोलापूर जिल्ह्यात ‘या’ शाळेतच अंगणवाडी भरणार; बालवयात शाळेची गोडी लागणार; ग्रामीण शिक्षणाला मिळणार नवी दिशा

June 6, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

मंगळवेढा बस स्थानकावर प्रवास करताय? तर सावधान! गर्दीच्या ठिकाणी स्वतःच्या साहित्याची आणि पैशांची काळजी घ्या; वृद्ध शेतकऱ्याची पुंजी चोरट्याने उडवली

June 6, 2026

मराठा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; ओबीसींप्रमाणे ‘या’ 8 सवलती लागू; जीआर देखील निघाला

June 6, 2026
मंगळवेढ्यात आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय! ‘नूतन महिला अर्बन’चा आज दिमाखदार शुभारंभ; महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांची मेजवानी

मंगळवेढ्यात आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय! ‘नूतन महिला अर्बन’चा आज दिमाखदार शुभारंभ; महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांची मेजवानी

June 6, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा