टीम मंगळवेढा टाईम्स ।
सासू-सासऱ्यांनी पोलिसांत दाखल केलेल्या गुन्ह्याचा राग मनात धरून पिता-पुत्राने विवाहित महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून तिचा विनयभंग केला. ही घटना ९ मे रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घडली.
याबाबत पीडित विवाहितेने शनिवारी रात्री पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बाबूराव ज्ञानू आलदर व रवींद्र बाबूराव आलदर पिता पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की, पीडिता घटनेदिवशी त्यांच्या डाळिंबाच्या बागेत जनावरांसाठी गवत काढत होती. त्यादरम्यान आरोपांनी बागेत येऊन तुझे सासू-सासरे कुठे आहेत.
त्यांनी आमच्यावर लय केसेस केले आहेत. असे म्हणून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करू लागले. त्यावेळी पीडितेने त्यांना शिवीगाळ करू नका, असे म्हणत असताना आरोपींनी तिच्या गालावर चापट मारले.
तिला खाली पाडून अंगावर बसून पीडितेच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. त्याने एवढ्यावरच न थांबता तुझ्या सासू-सासरे यांनी केसेस केल्यामुळे
माझे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले असे म्हणून पीडितेच्या गळ्यातील १ तोळे सोन्याचे मणी-मंगळसूत्र हिसका मारून तोडून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज