टीम मंगळवेढा टाईम्स ।
वंचित-दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी पूर्वीप्रमाणे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ३०० शाळांमधून पुन्हा प्रवेश मिळेल, असे शैक्षणिक क्षेत्रातून बोलले जात आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रिया पूर्वीच्या नियमानुसार राबविली जाणार आहे. त्यासाठी आरटीई संकेतस्थळावर आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत.
त्यामुळे आता पूर्वीच्याच पद्धतीने आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. वंचित आणि दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिले जातात.
मात्र, राज्य शासनाने त्यात सुधारणा करून विद्यार्थ्याच्या घरापासून एक किलोमीटर परिसरातील शासकीय, खासगी अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये आरटीई प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे खासगी शाळा आरटीई प्रवेशातून वगळल्या गेल्या.
मात्र, या निर्णयाला आव्हान देणारी याचिका न्यायालयात सादर करण्यात आली होती. न्यायालयाने राज्य शासनाच्या ९ फेब्रुवारी २०२४ च्या अधिसूचनेला स्थगिती दिली. त्यामुळे शिक्षण विभागाला आता पूर्वीप्रमाणे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवावी लागणार आहे.
शासनाकडून परिपत्रक प्रसिद्ध करण्याचे निर्देश
या पार्श्वभूमीवर जनहित याचिकेवरील आदेश विचारात घेऊन ६ मार्च २०१४ आणि ३ एप्रिल २०२४ रोजीचे परिपत्रक रद्द करून स्वयंअर्थसहाय्यित शाळा, पोलिस कल्याणकारी शाळा, विनाअनुदानित शाळा आणि महानगरपालिका शाळा (स्वयंअर्थसहाय्यित शाळा) यांचा समावेश करून आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी नव्याने परिपत्रके प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य शासनाने प्राथमिक शिक्षण संचालकांना दिले आहेत.
शिक्षण संचालकांकडून सूचना
राज्य शासनाच्या निर्देशानुसार, राष्ट्रीय माहिती केंद्रातर्फे (एनआयसी) राबविल्या जात असलेल्या ऑनलाइन आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये आवश्यक बदल करण्याबाबत प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच सुधारित आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे.
पूर्वीप्रमाणेच शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) अंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत अद्याप आम्हाला आदेश प्राप्त झालेला नाही. दोन दिवसांमध्ये आदेश मिळेल. तो प्राप्त झाल्यानंतर त्याप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल.- कादर शेख, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग (जिल्हा परिषद) (स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज