mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Breaking! मनोज जरांगे पाटील आज सोलापुरात; कोणाला पाडायचा संदेश देणार? याची उत्सुकता असणार सर्वांना

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 29, 2024
in सोलापूर
एक मराठा कोट मराठा! सरकारला एक तासही देणार नाही, जरांगे पुन्हा कडाडले; अकलूजमध्ये मनोज जरांगेंची विराट सभा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

लोकसभा निवडणुकीमुळे सर्वत्र सर्वपक्षीय राजकारण्यांच्या तोफा सभांमधून धडाडत आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभा एकाच दिवशी म्हणजे आज होणार आहेत.

https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2024/04/VID-20240429-WA0043.mp4

त्यातच आता मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील हेही आज सोमवारी सोलापूरमध्ये येत आहेत, अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे आज सोमवारी सोलापूर हा सभांचा हॉटस्पॉट होणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांचे आज सोमवारी सायंकाळी पाच वाजता मरिआई चौक येथे आगमन होणार आहे. मराठा समाजाच्या वतीने त्यांचे त्या ठिकाणी भव्य असे स्वागत करणार आहोत.

स्वागत स्वीकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे पुढे मंगळवेढा, सांगोला, सांगली मार्गे बेळगाव येथे जाणार आहेत. त्या ठिकाणी ते जाहीर सभा घेणार आहेत, अशी माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिली.

मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच ज्यांना पाडायचे आहे, त्यांना पाडा, असा सूचक संदेश मराठा समाजाला दिलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये येत असलेले मनोज जरांगे पाटील हे सोलापूरमध्ये मराठा समाजाला कोणाला पाडण्याचा संदेश देणार आहेत, याची उत्सुकता सर्वांना असणार आहे.

दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सोमवारी दुपारी सोलापूरच्या होम मैदानावर भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्यासाठी सभा घेत आहेत. मोदी यांच्या सभेसाठी सुमारे एक लाख लोक बसतील, अशी आसनव्यवस्था करण्यात आलेली आहे.

तसेच, उन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठी मंडपही उभारण्यात आलेला आहे. मोदी आपल्या सभेतून कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशिल मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांची आज सोमवार दिनांक 29 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता महुद बुद्रुक येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या असून त्यांच्या बेधडक वक्तव्यामुळे, संवाद कौशल्यामुळे आणि वक्तृत्वामुळे त्या प्रत्येक सभा गाजवत असतात. प्रत्येक सभांमधून त्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवर तुटून पडतात. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर जहरी टीका करतात.

महाविकास आघाडीच्या सोलापूरच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संयुक्तपणे सभा घेणार आहेत. ठाकरे आणि पवार यांची कर्णिकनगरमध्ये सोमवारी सायंकाळी सभा होणार आहे. पवार आणि ठाकरे हे भाजपचा कोणत्या शब्दांत समाचार घेणार, याची उत्सुकता सोलापूरकरांना लागली आहे.

 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मनोज जरांगे पाटील

संबंधित बातम्या

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आत्याच्या मुलाशी लग्न, पदरात 2 मुली, सुखाचा संसार सुरू असतानाच महिलेनं मुलीसह संपवलं जीवन, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

July 29, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

मोजकेच प्लॉट शिल्लक! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

August 3, 2026
Next Post
रोहित पवारांनी घेतला सोलापूर जिल्ह्यातील ‘हा’ साखर कारखाना चालविण्यास

कपटी कारस्थानं! देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटलांवर केलेल्या टीकेला रोहित पवारांनी दिले जशास तसे उत्तर

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मुलीचा संसार वाचवण्यासाठी सासू सरसावली; जावयाला किडनी दान करून दिले नवजीवन

August 4, 2026

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा