mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

एका बाजूला यांची मोदींची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला दर दिवसाला शेतकरी आत्महत्या करतोय; ही स्थिती किती दिवस चालू द्यायची; शरद पवारांनी साधला निशाणा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 22, 2024
in राज्य
एका बाजूला यांची मोदींची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला दर दिवसाला शेतकरी आत्महत्या करतोय; ही स्थिती किती दिवस चालू द्यायची; शरद पवारांनी साधला निशाणा

टीम मंगळवेढा टाईम्स। 

लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी आता राज्यातील पक्षांनीही सुरूवात केल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादीमध्ये आता दोन गट पडल्यावर शरद पवार गटाने प्रचाराला सुरूवात केली आहे. अजित पवार गटातील नेते दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात शरद पवार यांची महासभा झाली.

या सभेमध्ये बोलताना शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना मोठं वक्तव्य केलं आहे. एका राज्याचे मुख्यमंत्री जेलमध्ये जाणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांच्या पदरात काही पडत नाही. अनेक पीकं घेतली जातात. पण त्या पिकाची किंमत शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही. खर्च अधिक उत्पन्न कमी ही स्थिती झाली तर तो कर्जबाजारी होतो.

कधी कधी ते कर्ज डोक्यावर एवढं बसतं की सावकार घरातील भांडीकुंडी घेऊन जातात. अशीवेळ आल्यावर सन्मानाने जगायची इच्छा ज्याच्या मनात आहे, तो शेतकरी आत्महत्या करतो. हे चित्र फक्त राज्यात नाही, देशात असल्याचं शरद पवार म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांचा अस्था ही पक्ष फोडणं आणि लोकांना तुरुंगात टाकण्यात आहे. झारखंड हे आदिवासींचं राज्य आहे. त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल चांगलं राज्य चालवतात, पंतप्रधानांना आवडत नाही, म्

हणून त्यांच्या दोन चार मंत्र्यांना अटक केली. केजरीवाल यांना 16 नोटीस पाठवल्या. आज ना उद्या केजरीवाल यांनाही अटक होईल, हे काय चाललंय? असा सवाल करत पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रोज एक जाहिरात आहे. मी तुम्हाला गॅरंटी देतो. मोदीची गॅरंटी, एका बाजूला यांची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला दर दिवसाला कोणी ना कोणी शेतकरी आत्महत्या करतोय हे चित्र पाहायला मिळत आहे. ही स्थिती किती दिवस चालू द्यायची. यात बदल करायचा की नाही, ठरवलं तर आपण करू शकत असल्याचं पवार यांनी सांगितलं.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शरद पवार

संबंधित बातम्या

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महिला शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! जमीन नसतानाही शासकीय योजनांचा लाभ मिळणार

June 27, 2026
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

न्यायालयीन लढा, सारथीच्या योजना अन् कुणबी दाखले; ‘मराठा आरक्षण कक्ष’ सांभाळणार ही ५ महत्त्वाची कामे; सरकारचे मोठे पाऊल; मंत्रालयात स्वतंत्र कक्षाची स्थापना

June 26, 2026
मर्चंट नेव्हीतील अधिकार्‍यावर हल्ला; माजी सरपंचासह 5 जणांना पोलिस कोठडी

भक्तांना मोठा धक्का! करणी-बाधा उतरवणारा मंगळवेढ्यातील ‘बिरा महाराज’ निघाला गांजा तस्कर; एनडीपीएस कायद्यान्वये पोलिसांची मोठी कारवाई

June 26, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

नागरिकांनो! बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेवर वधू-वराची ‘ही’ माहिती छापणे बंधनकारक होणार

June 27, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मम्मी माफ कर, पुढील जन्मी तुझ्या पोटी जन्म घेणार, व्हिडिओ काढून आत्महत्या; नीटचा पेपर कठीण गेल्याने विद्यार्थ्यांचे टोकाचे पाऊल

June 27, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यांना सर्वात मोठा दिलासा; NA परमिशनची कटकट संपली; तुकडे बंदी कायद्यातही मोठा बदल

June 25, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

गुटखा मिळत नसल्याने संतापला; सोशल मीडियावर तुकाराम मुंढेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला बेड्या

June 24, 2026
धनश्री अर्थकारणाच्या यशस्वी परंपरेचा तीन दिवस दिमाखदार सोहळा; शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थीत संपन्न होणार प्रा.शिवाजीराव काळुंगे सर यांचा अमृतमहोत्सव

दुष्काळाचा बिमोड करण्यासाठी शेतकऱ्यांची वज्रमुठ; मंगळवेढ्यात गाजणार ३४ वी ‘पाणी संघर्ष परिषद; २६ जूनला दुष्काळग्रस्तांचा हुंकार

June 23, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा! राजकारण की समाजकारण? मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना थेट आव्हान; नेमका प्लॅन काय?

June 22, 2026
Next Post
मोठी खळबळ! मंगळवेढ्यात पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या विरोधात बेमुदत उपोषण सुरू; तात्काळ निलंबन करण्याची मागणी; नेमकं काय आहे प्रकरण?

मोठी खळबळ! मंगळवेढ्यात पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या विरोधात बेमुदत उपोषण सुरू; तात्काळ निलंबन करण्याची मागणी; नेमकं काय आहे प्रकरण?

ताज्या बातम्या

पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

शेतात पाणी पोहोचेपर्यंत संघर्ष; चळवळीचा लढा थांबणार नाही; मंगळवेढ्यातील पाणी परिषदेत संघर्ष समितीचे शिवाजीराव काळुंगे यांनी दिला नारा

June 27, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महिला शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! जमीन नसतानाही शासकीय योजनांचा लाभ मिळणार

June 27, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; ‘या’ एका कागदपत्राची सक्ती कायमची रद्द; लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

June 27, 2026
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

न्यायालयीन लढा, सारथीच्या योजना अन् कुणबी दाखले; ‘मराठा आरक्षण कक्ष’ सांभाळणार ही ५ महत्त्वाची कामे; सरकारचे मोठे पाऊल; मंत्रालयात स्वतंत्र कक्षाची स्थापना

June 26, 2026
मर्चंट नेव्हीतील अधिकार्‍यावर हल्ला; माजी सरपंचासह 5 जणांना पोलिस कोठडी

भक्तांना मोठा धक्का! करणी-बाधा उतरवणारा मंगळवेढ्यातील ‘बिरा महाराज’ निघाला गांजा तस्कर; एनडीपीएस कायद्यान्वये पोलिसांची मोठी कारवाई

June 26, 2026
मंगळवेढ्यात भव्य ओपन जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचा थरार; ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना मिळणार हक्काचे व्यासपीठ; साप्ताहिक रणयुग टाईम्सचा पुढाकार

मंगळवेढ्यात भव्य ओपन जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचा थरार; ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना मिळणार हक्काचे व्यासपीठ; साप्ताहिक रणयुग टाईम्सचा पुढाकार

June 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..