mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नीट समजून घ्या! मराठा समाजाला आरक्षणातून नेमकं काय मिळणार? तुमच्या मनातील 10 प्रश्नांची उत्तरं; सविस्तर पाहा…

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 23, 2024
in राज्य
मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, विशेष अधिवेशनापूर्वी महत्वाची घडामोड; किती टक्के आरक्षण मिळणार?

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर झालं आहे, त्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मराठा आरक्षण विधेयक मंजूर करून घेताना विधानसभेत काय झालं?

मराठ्यांना काय मिळालं? काय नाकारण्यात आलं? सोप्या शब्दांत समजून घेऊया मराठा आरक्षणासंदर्भातली तुमच्या मनातील 10 प्रश्नांची उत्तरं.

1) मराठा समाजाला आरक्षण मिळालं आहे का?

हो, मराठा समाजाच्या लढ्याला यश आलं आहे. जरांगे पाटलांची मागणी सरकारने मान्य केली आहे. विशेष अधिवेशन घेऊन राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्याची घोषणा केली आहे.

2) किती टक्के आरक्षण मराठ्यांना मिळालं आहे?

मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला आहे.

3)मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यात आलं आहे का?

हा प्रश्न महत्वाचा आहे. कारण जरांगे पाटील पहिल्यापासून ओबीसीमधून आरक्षणाची मागणी करतायत. नाही. मराठ्यांना OBC तून आरक्षण मिळणार नाही. OBC ला धक्का न लावता आरक्षणाचा निर्णय सरकारने घेतला आहे. मराठ्यांना मागास प्रवर्गातील नाही तर SEBC या स्वतंत्र संवर्गातील आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

ज्याप्रकारे सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यावर ठाम होतं त्याप्रकारे OBC ना धक्का लावणार नाही, असंही वारंवार सरकारकडून आश्वासित करण्यात येत होतं. सरकारने हा शब्दही पाळल्याचं यातून दिसतंय. OBC च्या आरक्षणावर कोणताही फरक पडणार नाही याची दक्षता सरकारने घेतली आहे.

4)कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये हे आरक्षण दिलं जाईल?

शिक्षण आणि नोकरी या दोन क्षेत्रांमध्ये मराठ्यांना आरक्षणाची सुविधा मिळणार आहे. शिक्षणाबद्दल सांगायचं तर राज्यातील सर्व सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा विद्यार्थ्यांसाठी 10 टक्के आरक्षण लागू होईल. आणि नोकरीमध्ये सरकारी शाळा, मंत्रालय, क्षेत्रीय कार्यालये, जिल्हा परिषद, विद्यापीठे आणि इतर सरकारी कार्यालयांमधील नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू होईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरल्या जाणाऱ्या पदांमध्येही आरक्षणाचा लाभ मिळेल.

5) राजकीय आरक्षणाचं काय?

मराठ्यांना राजकीय आरक्षण नाकारण्यात आलं आहे. कोणत्याही प्रकारचं राजकीय आरक्षण मराठ्यांना देण्यात आलेलं नाही. का? कारण राज्यातील मराठ्यांच्या संख्याबळानुसार या समाजाला पुरेसं प्रतिनिधित्व आहे, आणि त्यामुळे या समाजाला राजकीय क्षेत्रात आरक्षण देण्याची गरज नाही, असं राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात म्हटलं आहे.

6) या आरक्षणाने राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली आहे का?

अर्थातच ओलांडली आहे. न्यायालयाने आरक्षणासाठी 50 टक्क्यांची मर्यादा घालून दिली आहे. पण ती आधीच ओलांडली गेली आहे. महाराष्ट्रात आधीच 52 टक्के आरक्षण आहे, त्यामध्ये आता या 10 टक्के आरक्षणाची भर पडली आहे. म्हणजे एकूण टक्का झाला आहे 62 टक्के.

7) आता न्यायालयात हे आरक्षण टिकणार का?

हे आरक्षण कोर्टात टिकावं यासाठी राज्य सरकार खास स्ट्र्रॅटजी वापरणार आहे. मराठा समाजाला ‘अपवादात्मक परिस्थितीत’ आरक्षण लागू करण्याची शिफारस केली आहे. त्यासाठी मागास आयोगाने इंद्रा साहनी खटल्याचा आधार घेतला आहे.

इंद्रा साहनी खटल्यानुसार, 22 राज्यांत आरक्षण 50 टक्क्यांहून अधिक आहे. बिहारने 69 टक्के आरक्षण दिलं आहे. तोच पॅटर्न महाराष्ट्रात लागू करण्याचा सरकारचा मानस आहे.

विधीमंडळात मांडण्यात आलेल्या विधेयकात असं म्हटलंय की, मराठा समाजाचा उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेला वर्ग 84 टक्के इतका आहे. आणि तो इंद्रा सहानी प्रकरणात निर्णय दिल्याप्रमाणे, नोक-यांमध्ये व शिक्षणामध्ये आरक्षण देण्यास मराठा समाजही पात्र ठरतो. अपवादात्मक परिस्थितीत आरक्षणाची 50 टक्के मर्यादा ओलांडता येते. त्यानुसारच मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिलं आहे.

8) मनोज जरांगेंची सगेसोयरेची मागणी मान्य झाली का? काय होणार? कारण याच मागणीसाठी जरांगे आणि मराठा समाज आंदोलनावर अजूनही ठाम आहे.

सगेसोयरेबाबत अजून स्पष्टता देण्यात आलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सगेसोयरे अधिसूचनेवर आतापर्यंत 6 लाख हरकती आल्या आहेत. या हरकती तपासण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांना दिली आहे. त्याची वर्गीकरण आणि छाननी केली जाईल आणि मग पुढची कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

9) आरक्षण कधीपासून लागू होईल?

विधानसभा आणि विधानपरिषेद मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर ते सहीसाठी राज्यपालांकडे पाठवलं जाईल. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचं कायद्यात रुपांतर होईल आणि राज्यात मराठा आरक्षण तातडीने लागू होईल.

10) मराठा आरक्षण केंद्रात लागू असेल का?

नाही. राज्य विधिमंडळाने मंजूर केलेलं मराठा आरक्षण हे केंद्रात लागू नसेल. फक्त राज्यापुरतं मर्यादीत असेल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मराठा आरक्षण जाहीर

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

March 20, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! पत्नी पोलीस दलात स्वत: एसआरपीएफ, जवानाने स्वत:लाच संपवलं, दोन चिमुकल्यांचा आधार हिरावला; सोलापूर जिल्हा हादरला

March 15, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मुलींच्या मोफत शिक्षणात अडथळा? मंत्र्यांनी बजावला इशारा; होणार कारवाई; मुलींच्या शुल्काची लूट थांबणार; विधानसभेत मोठी घोषणा

March 15, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

कामाची बातमी! अ‍ॅट्रोसिटी कायद्यात महत्त्वाचा बदल; आता एफआयआर दाखल होताच अटक नाही, ‘या’ नंतरच कारवाई

March 14, 2026
शेतकऱ्यांनो! राज्यात तीन दिवस यलो अलर्ट, ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस अन् गारपिटीचीही शक्यता; नागरिकांना सतर्केतेच्या सुचना

शेतकऱ्यांना चिंता! ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार; ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्वाचे

March 13, 2026
सांगोल्यात धमकी देत मारहाण करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रसिद्ध कीर्तनकारला घरात घुसून बेदम मारहाण; धक्कादायक कारण समोर; काय आहे नेमकं प्रकरण?

March 14, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; जिल्हा परिषद सीईओंनी काढला आदेश; ‘या’ सत्रात वाजणार घंटा

March 12, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! पाऊस पुन्हा कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांवर संकट; थेट विजांच्या कडकडाटासह

March 11, 2026

धक्कादायक! 50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक

March 10, 2026
Next Post
टंचाई! सोलापूर जिल्ह्यात पहिला पाण्याचा टँकर मंगळवेढ्यातील ‘या’ गावात सुरू; सरपंचाच्या पाठपुराव्याने नागरिकांना मिळाला मोठा आधार

टंचाई! सोलापूर जिल्ह्यात पहिला पाण्याचा टँकर मंगळवेढ्यातील 'या' गावात सुरू; सरपंचाच्या पाठपुराव्याने नागरिकांना मिळाला मोठा आधार

ताज्या बातम्या

सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

काय झाडी, काय डोंगर… अन काय तो पेपर! भूगोलाच्या पेपरात ‘नापास’ होण्याची भीती, पठ्ठ्यानं थेट प्रश्नपत्रिकाच केली चोरी

March 20, 2026
वृक्षारोपणाने गुंफले सामाजिक उत्तरदायित्व! श्री वैभवलक्ष्मी महिला पतसंस्थेचा ३रा वर्धापनदिन दिमाखात साजरा

वृक्षारोपणाने गुंफले सामाजिक उत्तरदायित्व! श्री वैभवलक्ष्मी महिला पतसंस्थेचा ३रा वर्धापनदिन दिमाखात साजरा

March 20, 2026
विश्वासार्हता आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर ‘श्रीकृपा अर्बन’ प्रगतीपथावर राहील: आमदार समाधान आवताडे यांचे गौरउद्गार

विश्वासार्हता आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर ‘श्रीकृपा अर्बन’ प्रगतीपथावर राहील: आमदार समाधान आवताडे यांचे गौरउद्गार

March 20, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

March 20, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! आता ‘तारीख पे तारीख’ नाही; कोर्टाच्या तारखांनी हैराण झाला असाल तर ही बातमी वाचाच

March 20, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून कालवा आणि बोगद्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात; ‘एवढ्या’ लाभक्षेत्राला पाणी मिळणार; ‘या’ अखेरपर्यंत पाणी चालू राहणार

March 19, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा