टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यासह मंगळवेढा तालुक्यात उन्हाचा तडाखा अलीकडे वाढला असला तरी, कमी पर्जन्यमान झालेल्या ग्रामीण भागात फेब्रुवारी महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असताना येड्राव गावच्या सरपंचांनी जिल्ह्यात पहिला टँकर सुरू करून गावातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.
मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील गावात यावर्षी पिण्याच्या पाणीटंचाईवर या गावचे विद्यमान सरपंच संजय पाटील यांनी सततचा पाठपुरावा करून मंगळवेढा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासन दरबारी टँकर मंजूर करून यश मिळवले,
उन्हाचा कडाका वाढला असून पाणी पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे टंचाईची तीव्रता पुढे अधिक वाढण्याची शक्यता आहे.
सरपंच संजय पाटील यांनी यापूर्वी गावाच्या अडचणीसाठी पद, प्रतिष्ठा बाजूला ठेवून गावातील अडी -अडचणी सोडवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नशील असून येड्राव हे गाव दक्षिण भागातील पाणीटंचाईत मागासलेले गाव असल्यामुळे फेब्रुवारी,मार्च, एप्रिल, मे या कालावधीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी
या गावातील महिलांची वन वन होऊ नये म्हणून कर्तव्यदक्ष महसूल अधिकारी असलेले मंगळवेढा तालुक्याचे उपविभागीय अधिकारी बी आर माळी तसेच तहसीलदार मदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली येड्राव तालुका मंगळवेढा गावात पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करण्यात आल्याचा आनंद सरपंच संजय पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना सांगितले.
येड्राव गावात प्रशासनाने सुरू केलेल्या पिण्याच्या पाण्याचे टँकरचे स्वागत मंगळवेढा तालुक्याचे सहाय्यक गटविकास अधिकारी विनायक तवटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच संजय पाटील, उपसरपंच संजय किसन पाटील, ग्रामसेवक अशोक पाटील, पोलीस पाटील दत्तात्रय पाटील, माजी उपसरपंच सचिन पाटील, ग्रामपंचायतीचे सदस्य श्रीमंत पाटील, चेअरमन महेश पाटील, बाबुराव केंगार, दत्तात्रय वाघ गुरुजी,
शरद शेवतकर, बचत गट प्रमुख स्वप्निला खांडेकर व इतर अनेक महिला वर्ग या प्रसंगी उपस्थित होते. गावातील पिण्याच्या पाण्याची अडचण सोडविण्यात सरपंच संजय पाटील यांना सोलापूर जिल्ह्यात सर्वप्रथम मान मिळाला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज