टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. त्यात १९ मार्चपर्यंत चालणार आहेत. तसेच १ मार्चपासून सुरू होणारी दहावी परीक्षा २६ मार्चपर्यंत चालणार आहे.
परीक्षेसंदर्भात काही ताण किंवा भीती जाणवल्यास समुपदेशक मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी मंडळाने टोल फ्री फोन क्रमांक जाहीर केले आहेत. यासाठी राज्यस्तरावर दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली.
हे समुपदेशक सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत विद्यार्थी आणि पालकांसाठी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून उपलब्ध राहणार असल्याचे वृत्त दिव्य मराठीने आज प्रसिध्द केले आहे.
इयत्ता दहावी- बारावीची लेखी परीक्षा नाशिकसह पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात.
अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी तसेच ऑनलाइन समुपदेशन करण्यासाठी राज्य मंडळस्तरावरून दहा समुपदेशकाची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक प्रसिद्धिपत्रकाद्वार जाहीर केले आहे. या ठिकाणी मोफत समुपदेशन केले जाणार आहे.
कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी भरारी पथके
जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुखांचा समावेश विशेष भरारी पथकात • तालुकास्तरावर तहसीलदार व गटशिक्षणाधिकारी यांचे भरारी पथक • शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, प्राचार्य डायट यांचेही पथक • महापालिका शिक्षण मंडळ प्रशासन अधिकाऱ्यांचे शहरी भरारी पथक
• जिल्ह्यातील उपद्रव असणाऱ्या परीक्षा केंद्रांवर बैठे पथकांची नियुक्ती विद्याध्यर्थ्यांनी स्वतः पाण्याची पारदर्शक पाण्याची बॉटल सोबत ठेवावी
बारावीचे ५५ हजार ५४१ परीक्षार्थी
यंदा बारावी परीक्षा ५५ हजार ५४१ विद्यार्थी देणार आहेत. बुधवारी बारावीच्या परीक्षा सुरू होत आहे. लेखी परीक्षेसाठी आसन व्यवस्था सरमिसळ पद्धतीने होणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांमध्ये वाढ झाली आहे.
दरम्यान, मंगळवारी शहरातील काही परीक्षा केंद्रावर विद्यार्थी व पालकांनी परीक्षा क्रमांक पाहण्यासाठी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांनी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, अशी सूचना केली आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेत
गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल ९ हजार विद्याथ्यांची वाढ झाली आहे. दहावीसाठी ६५ हजार ७४९ परीक्षार्थी आहेत.
कोणत्याही एका क्रमांकांवर संपर्क साधता येईल
७०३८७५२९७२, ७३८७४००९७०, ९०१११८२४२, ८४२९५०५२८ ८२६३८७६८९६, ८३६९०२११९४४, ९८८१४९८२३६, ९३५९९७८३१५, ७३८७६४७९०२
कॉपीचे प्रकार आढळल्यास शाळेवरच कारवाई करणार : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. ज्या केंद्रावर कॉपी सापडतील त्या शाळेवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शाळा व्यवस्थापन दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसा शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे हे सयुंक्तपणे परीक्षा केंद्रास अचानक भेट देतील. १७ नंबरचे विद्यार्थी जास्त असतील तेथे पथके जातील.(स्रोत:दिव्य मराठी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज