टीम मंगळवेढा टाईम्स।
स्वाभिमान विकून जिंकण्यापेक्षा हार मानणे कधीही चांगलं हे शिकवणारे शिक्षण”आणि शिक्षण फक्त नोकरीसाठी नसून दुसऱ्यांचे जीवन सार्थक करण्यासाठी असते हे आपल्या कृतीतून दाखविणारे शिक्षण क्षेत्रातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे श्री.दयानंद गोरख चव्हाण गुरुजी होय.
मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी या छोट्याशा गावात 21 फेब्रुवारी 1970 रोजी त्यांचा जन्म झाला.ते लहानपणापासूनच अत्यंत हुशार व प्रेमळ स्वभावाचे असल्याकारणाने समाजाशी संपर्क वाढत गेला.आणि ते एक आदर्श शिक्षक म्हणून नावारूपास आले.गेली 31 वर्षे अत्यंत प्रामाणिकपणे शिक्षण क्षेत्रामध्ये आपली सेवा बजावत आहेत.
शिक्षणाबरोबरच सामाजिक कार्याचाही त्यांचा हतखंड आहे. त्यांच्या कार्यामध्ये त्यांच्या पत्नी सौ विजयमाला दयानंद चव्हाण यांचाही तितकाच मोठा वाटा आहे कारण एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचे तितकेच मोठे योगदान असते.
” अमर्यादित जागेत मर्यादित काम करण्यापेक्षा, मर्यादित जागेत अमर्यादित काम फक्त शिक्षक करू शकतो हे त्यांनी ओळखले, म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे कार्य हाती घेतले.विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार रुजवण्याचे काम केले .
गेली पाच वर्षे जि.प.प्राथमिक शाळा बंडगरवाडी,नंदेश्वर या ठिकाणी ते आपले शिक्षणाचे कार्य करत आहेत .संपूर्ण बंडगरवाडी परिसरात दयानंद गुरुजी या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या चव्हाण गुरुजींना लोक देव मानतात.सर्व विद्यार्थी त्यांना एक आदर्श शिक्षक म्हणून ओळखतात.
शैक्षणिक कार्यातील योगदान- सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांमध्ये श्रीमंत गरीब असा भेदभाव न करता सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य त्यामध्ये स्कूल बॅग,कंपास,वह्या ,पेन असे 70 हजार रुपयांचे साहित्य वाटप केले. इयत्ता तिसरी ते सातवी विद्यार्थ्यांसाठी त्यांना घड्याळाची ओळख व्हावी, वेळेचे महत्व पटवून देण्यासाठी प्रत्येकी चारशे पन्नास रुपये किमती ची एकूण 36000 रुपयांची 80 घड्याळ वाटप केली.
इयत्ता पाचवी ते सातवी च्या 45 विद्यार्थ्यांसाठी खेळाचे महत्व पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यवस्थित खेळ खेळता यावा यासाठी 13500 किमतीचे स्पोर्ट किट वाटप करण्यात आले. शाळा हे विद्येचे मंदिर आहे त्यामुळे शाळा सुशोभीकरण हा एक महत्त्वाचा विषय आहे.त्यासाठी शाळेभोवती वृक्षारोपण करण्यासाठी 5500 रुपये किमतीची विविध प्रकारचे रोपे लावण्यात आली.
शालेय परिसर हा बंदिस्त असावा.यासाठी वॉल कंपाऊंड करून त्यावर बोलक्या भिंती करून वर्गाच्या बाहेरील बाजूस नकाशे रंगरंगोटी करण्यासाठी 45000 रुपये शाळेसाठी देणगी म्हणून देण्यात आली. शिक्षक माता -पालक यांच्यामध्ये स्नेहीचे संबंध असावेत .
विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा आलेख पालकांना समजावा यासाठी सभामंडप तसेच स्टेज, पालकांसाठी खुर्च्या, भोजन इत्यादीसाठी 85000 रुपये शाळेसाठी खर्च करण्यात आला. गतवर्षी शाळेमध्ये राबवल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा त्यामध्ये सांगली शिक्षण संस्था, सांगलीव्या परीक्षेसाठी सर्व मुलांची फी भरून त्यामध्ये 117 विद्यार्थी बक्षीस पात्र झाले
यासाठी 37000 रुपये शाळेमध्ये देणगी स्वरूपात देण्यात आले.विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून याही वर्षी मंथन प्रज्ञाशोध परीक्षा यासाठी 62 विद्यार्थ्यांना परीक्षेस बसवून 30000 रुपये खर्च मोफत केला. 1998 साली जिल्हा परिषद शाळा भोसे(मंगळवेढा) येथे साडेतीनशे विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स बूट स्वखर्चातून दिले बंडगरवाडी गावातील माता पाल्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला त्यामुळे तालुका आरोग्याच्या प्रमुख डॉक्टर सुलोचना जानकर यांनी शाळेत भेट देऊन मोफत तपासणी केली.
शाळेमध्ये प्रसंगी मुक्कामी राहून अप्रगत विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी त्यांना वेळ दिला व त्यांच्याकडून तयारी करून घेतली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबर त्यांच्या आरोग्याचाही विचार करून विद्यार्थ्यांसाठी शाळेवर पहाटे सहा वाजता जाऊन विद्यार्थ्यांची रनिंग, सूक्ष्म हालचाली, प्राणायाम, सूर्यनमस्कार याचा सराव घेतात.
असे हे सर्वांचे आदरणीय दयानंद चव्हाण गुरुजी यांना 54 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा तसेच त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांचे हे शैक्षणिक व समाजिक कार्य असेच चालू राहू दे यासाठी मनापासून शुभेच्छा देतो.-एक पालक, बंडगरवाडी.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज