mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नागरिकांनो! सोनें खरेदी करताना सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास? अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास ‘हे’ काम करा; संपूर्ण माहिती समोर येईल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 30, 2024
in मनोरंजन, राज्य
सोन्या-चांदीच्या दरात कमालीची घसरण; आज मंगळवेढ्यातील सराफ दुकाने सुरू असणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता.

तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

सोने झाले स्वस्त, तर चांदी झाली महाग; किंमतीतील अपडेट काय

सोने-चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. जानेवारी महिन्यात सोने 2200 रुपयांनी तर चांदी 4400 रुपयांनी स्वस्त झाली. डिसेंबरच्या अखेरपासून आठवड्याच्या शेवटी किंमती वधारण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे.

तो या आठवड्यात पण दिसून आला. सोने शंभर रुपयांनी स्वस्त झाले तर चांदी 1000 रुपयांनी महागली. बजेटपूर्वी सोने-चांदीत नरमाईचे सूर असले तरी बजेटनंतर किंमतीत किती वाढ होते, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. काय आहेत आता सोने-चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 28 January 2024)

सोन्यात किंचित वाढ

या महिन्यात सोन्यात घसरणीचे सत्र होते. तर काही दिवस किंमतीत वाढ झाली. या महिन्यात सोने 2200 रुपयांनी उतरले. या आठवड्यात पण सोन्याच्या किंमतीत नरमाई होती. 24 आणि 25 जानेवारी रोजी 50 रुपयांची घसरण झाली. तर 26 जानेवारी रोजी सकाळी दरवाढ झाली तर संध्याकाळी किंमतीत 100 रुपयांची घसरण दिसली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीने गाठला मोठा पल्ला

जानेवारीत चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. या आठवड्यात पण चांदीत घसरण झाली. 23 जानेवारी रोजी 500 रुपयांची स्वस्ताई आली. तर 24 जानेवारी रोजी किंमतीत 300 रुपयांची वाढ झाली. 25 जानेवारी रोजी चांदीची किंमत 700 रुपयांनी वाढली. 26 जानेवारी रोजी किंमतीत बदल दिसला नाही. तीन दिवसांत एकूण 1000 रुपयांनी चांदी महागली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने उतरले तर चांदीच्या दरात वाढ झाली. 24 कॅरेट सोने 62,312 रुपये, 23 कॅरेट 62,062 रुपये, 22 कॅरेट सोने 57,078 रुपये झाले. 18 कॅरेट 46,734 रुपये, 14 कॅरेट सोने 36,453 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,299 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोने शुद्धता

संबंधित बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

रुग्णालयांची मनमानी खपवून घेणार नाही! औषध खरेदीच्या सक्तीवर तुकाराम मुंढेंचा कडक प्रहार; रुग्णांची आर्थिक लूट थांबणार

June 14, 2026
वाढदिवसाचे अनोखे कौतुक! हजारोंची उपस्थिती, ५११ रक्तदाते अन् संतांच्या वेशात सत्कार; उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस ठरला ऐतिहासिक

वाढदिवसाचे अनोखे कौतुक! हजारोंची उपस्थिती, ५११ रक्तदाते अन् संतांच्या वेशात सत्कार; उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस ठरला ऐतिहासिक

June 12, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ नको! शिक्षण विभागाचे ‘ते’ दोन्ही आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द; विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात मोठा दिलासा; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

June 12, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावध व्हा! ‘फ्री गिफ्ट व्हाउचर’च्या आमिषाने ४० हून अधिक जोडपे फसले; ​परदेशवारीच्या नावाखाली दाम्पत्यांना लाखोंचा चुना

June 12, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

डोक्यावरून पाणी गेलं अन् गोरेंनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केला, अनिल सावंतांच्या नेतृत्वात पंढरपुरात मोठा राजकीय भूकंप; भगीरथ भालकेंना मोठा धक्का

June 11, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो लक्ष द्या! राज्यातील शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार; मात्र विदर्भासाठी नवी तारीख, वाचा..

June 11, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

विद्यार्थ्यांनो..! १० वी, १२ वी नंतर पुढे काय? आमदार समाधान आवताडेंच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढ्यात रंगणार ‘गुणगौरव व करिअर मंत्र सोहळा

June 10, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

नागरिकांनो! पहिल्या लग्नाचा खर्च सरकारचा, अनेकांना ही योजना माहीतच नाही; कसा करायचा अर्ज?

June 9, 2026
राज्यात साडे सहा लाख शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोचवले खते आणि बियाणे : कृषिमंत्री दादाजी भुसे

शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको! मुख्यमंत्र्यांचे आवाहन, ‘या’ तारखेनंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

June 8, 2026
Next Post
मंगळवेढ्यात शेतकऱ्यांची कामे ठप्प; मंडल अधिकारी व तलाठी संघाने पुकारले बेमुदत रजा आंदोलन

शेतकऱ्यांची दिशाभूल! मंगळवेढ्यात पाच दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू; आज निघणार धडक मोर्चा; नेमकं काय आहे प्रकरण?

ताज्या बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

रुग्णालयांची मनमानी खपवून घेणार नाही! औषध खरेदीच्या सक्तीवर तुकाराम मुंढेंचा कडक प्रहार; रुग्णांची आर्थिक लूट थांबणार

June 14, 2026
मंगळवेढ्यात जुगार खेळणाऱ्या 17 जणांसह 21 जण पॉझिटिव्ह; रुग्णांची प्रशासनासोबत हुज्जत

​’डायल ११२’ वर एक कॉल अन् खेळ खलास! मंगळवेढ्यात चालणाऱ्या जुगारावर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; ७ आरोपींसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

June 14, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

काळजाचा थरकाप! आधी पत्नी अन् २ पोटच्या मुलांना आयस्क्रीममधून विष दिलं, नंतर मुख्याध्यापकाची आत्महत्या; पोलिसांना सापडली २२ पानांची सुसाईड नोट

June 13, 2026
वाढदिवसाचे अनोखे कौतुक! हजारोंची उपस्थिती, ५११ रक्तदाते अन् संतांच्या वेशात सत्कार; उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस ठरला ऐतिहासिक

वाढदिवसाचे अनोखे कौतुक! हजारोंची उपस्थिती, ५११ रक्तदाते अन् संतांच्या वेशात सत्कार; उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस ठरला ऐतिहासिक

June 12, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

धक्कादायक! खताच्या नावाखाली शेतकऱ्यांना विकले मीठ; मंगळवेढ्यात नामवंत कृषी केंद्राचा बोगस कारभार उघड; कृषी चालक व कंपनी संचालकावर गुन्हा दाखल

June 12, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

​राजेंद्र राऊतांच्या बैठकीला मविआचे आमदार हजर, पण भाजपचेच ‘परिचारक’ गैरहजर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा