mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मी पुन्हा येईन! महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या भूकंपाचे संकेत? भाजपकडून व्हिडीओ ट्विट

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 28, 2023
in राजकारण, राज्य
शेतकऱ्यांसाठी व महिलांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; केंद्राच्या धर्तीवर राज्याचाही सहा हजारांचा कृषी सन्मान निधी; एसटी प्रवासात 50 टक्के सूट

टीम मंगळवेढा टाईम्स। 

भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ ट्विट करण्यात आलाय. या व्हिडीओत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन, असं बोलताना दिसत आहेत.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2019 च्या निवडणुकीआधी त्यांनी विधानसभेत अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ‘मी पुन्हा येईन’, अशी कविता म्हटली होती. त्याच घटनेचा व्हिडीओ भाजपकडून ट्विट करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा मोठा भूकंप घडणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच दिल्ली दौऱ्यावर जावून आले आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काल शिर्डी दौऱ्यावर आले होते. त्यानंतर आता भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचा मी पुन्हा येईन बोलतानाचा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांपूर्वीच दिल्ली दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यावेळी दिल्लीत गुप्त बैठक झाली होती. या बैठकीचे तपशील समोर येऊ शकले नव्हते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर आले होते.

त्यानंतर भाजपकडून हे ट्विट करण्यात आलंय. त्यामुळे भाजपला या ट्विटच्या माध्यमातून नेमकं काय म्हणायचं आहे? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय.

आम्हाला निश्चितच आवडेल– प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया

भाजप नेते प्रसाद लाड यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली. पक्षाचा एक कार्यकर्ता, पदाधिकारी आणि आमदार म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर मला निश्चितच आवडेल. आम्ही त्याचं स्वागत करु, अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिलीय. भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ ट्विट करण्यात आलाय. त्यामुळे आम्हाला स्वागतच करावं लागेल आणि आनंद सुद्धा होईल, असं प्रसाद लाड म्हणाले.

शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया

शिवसेना नेते उदय सामंत यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली. “देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा आलेले आहेत आणि एकनाथ शिंदे यांना सोबत येऊन आले आहेत. राजकीय भूकंपाची कुठे शक्यता आहे, असं मला वाटत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी अनेकवेळा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या कशा होतील याचं विश्लेषण केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेलेच आहेत. सोबत आम्हाला घेऊन आले आहेत”, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.

‘चंद्रशेखर बावनकुळे उत्तर देतील’, प्रविण दरेकर यांची प्रतिक्रिया

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी देखील या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली. “आमच्या तीनही पक्षांमध्ये योग्य समन्वय आहे. सर्वांना विश्वासात घेऊन आमची वाटचाल सुरु आहे. असा कुठलाही विषय ट्विटर हँडलवरुन होत नसतो. याबाबतचे अधिकृत उत्तर आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देतील. तसेच आमच्या राज्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यावर बोलू शकतात.

पण आमच्या तीनही पक्षांत कोणताही बेबनाव नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्रित काम करत आहेत. हे ट्विट का केलं आणि कुणी केलं? याची वस्तुस्थिती समोर येईल”, असं प्रविण दरेकर म्हणाले.

‘लवकरच निवडणूक होणार आहे’, दीपक केसरकर यांचं सूचक वक्तव्य

मंत्री दीपक केसरकर यांनीदेखील या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली. “हे बघा, देवेंद्र फडणवीस सध्या सुद्धा सत्तेत आहेत. तसेच सत्तेत ते समान भागीदार आहेत. आता लवकरच निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत आपण नव्या ताकदीने येऊन महाराष्ट्राची सेवा करु. हा त्याचा अर्थ आहे”, अशी प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी असे व्हिडीओ ट्विट केले जातात, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किशोर उपाध्याय यांनी दिलीय(स्रोत;tv9मराठी)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: देवेंद्र फडणवीस

संबंधित बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 22, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 20, 2026

​पावसाचा खंड पडल्याने सरकार अलर्ट! विहिरी खोदण्यावर बंधने, पाणी चोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके सज्ज; शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

September 20, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 19, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
Next Post
एक मराठा कोट मराठा! सरकारला एक तासही देणार नाही, जरांगे पुन्हा कडाडले; अकलूजमध्ये मनोज जरांगेंची विराट सभा

मोठी बातमी! मराठा समाज कुणबी असण्याबाबतचे 'ते' पुरावे शिंदे समितीला सापडल्याची माहिती

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

गुगलवरून नंबर शोधणं पडलं महागात! पाच रुपये ऑनलाइन पाठवायला सांगून पाच लाख खात्यातून लुटले; हॉस्पिटल अपॉइंटमेंटच्या नावाखाली सायबर दरोडा

October 1, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकऱ्यांनो आणि व्यापाऱ्यांनो सावधान! जिल्ह्याची वेस ओलांडण्यापूर्वी ‘हा’ नियम नाही वाचला तर थेट पोलीस कारवाई; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा मोठा निर्णय

October 1, 2026
स्व.जनाबाई आवताडे यांचे आज व्दितीय पुण्यस्मरण; भजन, पुष्पवृष्टीचे आयोजन

स्व.जनाबाई आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मंगळवेढ्यात कीर्तन सोहळा; हिंदूभूषण सुनिताताई आंधळे यांची उपस्थिती

September 29, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा