mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेला महत्त्व, परीक्षा द्या आता मराठी भाषेतही; इंग्रजीसह पर्याय; शिक्षणमंत्र्यांची माहिती

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 16, 2023
in राज्य, शैक्षणिक
ढकलपास बंद! पाचवी, आठवीसाठी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे आता बंधनकारक; पास न झाल्यास पुढल्या वर्गात प्रवेश मिळणार नाही

टीम मंगळवेढा टाईम्स। 

“नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेला महत्त्व दिले असून राज्यात मराठीतून व्यवसाय अभ्यासक्रम सुरू केले आहेत. तंत्रविद्यानिकेतन (पॉलिटेक्निक) आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका आता मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत.

तसे स्वतंत्र्य विद्यापीठांना दिले आहे. एवढंच नव्हे तर विद्यार्थ्यांना उत्तरे देखील दोन्ही भाषेत लिहिता येणार आहेत,” अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित ‘डीईएस पुणे विद्यापीठा’चे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष छत्रपती शाहू महाराज,

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे, डीईएस विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रसाद खांडेकर उपस्थित होते.

डॉ. जेरे म्हणाले, “आपल्याकडे असणाऱ्या कौशल्यांतील नवे बदल आणि आणखी उच्च कौशल्ये शिकण्यासाठी पुढील काळात दर दहा वर्षांनी तरुण शिक्षण संस्थांकडे वळणार आहेत. त्यासाठी विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांनी तयार असावे. “

छत्रपती शाहू महाराज म्हणाले, “नव्याने सुरू केलेले विद्यापीठ . केवळ अध्ययन केंद्र न राहता येथील विद्यार्थी भविष्यातील नेतृत्व घडविणारे असतील. “

शिकवा कोणत्याही भाषेत, ऐका आपल्या मातृभाषेत !

■ प्राध्यापकाने कोणत्याही भाषेत शिकवावे आणि विद्यार्थ्यांना ते आपल्या भाषेत ऐकू येईल, असे सॉफ्टवेअर तयार करण्यात येत आहे.

अभ्यासक्रमातील संकल्पना विद्यार्थ्यांना मातृभाषेतून अधिक चांगल्याप्रकारे समजतात, हे लक्षात घेऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेला आणि भारतीय संस्कृती, परंपरेला महत्त्व दिले आहे. त्यामुळे देशाची परंपरा, संस्कृती हा विषय विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांनी अभ्यासक्रमात आणावा, यासाठी सरकार आग्रही राहणार आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

उच्च शिक्षण संस्थांनी पुढील शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी न केल्यास अशा संस्थांना जगातील कोणत्याही विद्यापीठांची संलग्न होण्याची दारे खुली राहतील. परंतु या शिक्षण संस्था कोणत्याही भारतीय विद्यापीठांशी संलग्न राहणार नाहीत. चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अभियांत्रिकी परीक्षा मराठीत

संबंधित बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ वर्गाची शिकण्याची पद्धतच बदलणार; नव्या अभ्यासक्रमाचं गुपित काय?

May 8, 2026
पिकांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, ‘या’ तालुक्यात वीज पडून महिला व तरुण ठार; ४ शेळ्या दगावल्या

वादळी वारा अन् विजांचा कडकडाट; राज्यात पुढील ५ दिवस पावसाची शक्यता, ‘या’ चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

May 4, 2026
मर्चंट नेव्हीतील अधिकार्‍यावर हल्ला; माजी सरपंचासह 5 जणांना पोलिस कोठडी

किळसवाणी! भोर प्रकरणातल्या विकृत नराधमाचं हादरवणारं सत्य; वाचून येईल संताप

May 4, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

पुढील 48 तास अत्यंत धोक्याचे! अवकाळीचं मोठं संकट, घराबाहेर पडू नका; आयएमडीकडून हाय अलर्ट

May 1, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

ऑल द बेस्ट! बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, HSC बोर्डाकडून निकालाची तारीख जाहीर; निकाल कुठे पाहायचा?

May 1, 2026
सोलापूर ग्रामीण भागात पुन्हा 266 जण कोरोना पॉझिटिव्ह; 22 वर्षीय तरुणाचा बळी

मोठी बातमी! कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात गूढ अधिक वाढलं; डॉक्टरांनी सांगितली हादरवणारी माहिती

April 30, 2026
पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

पंढरपुरात रंगणार भक्तीचा सोहळा! धनश्री परिवारातर्फे ५ दिवसीय ‘धनश्री प्रवचनमाले’चे आयोजन

April 30, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

महत्त्वाची बातमी! दहावी-बारावी निकालाची प्रतीक्षा संपली; यंदा गुणपत्रिकेवर असणार फोटो आणि QR कोड; ‘या’ तारखेला निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता

April 30, 2026
मोठी बातमी! कृषिभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवून केली जबर मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण; जाणून घ्या..

धक्कादायक! 16 वर्षांच्या मुलगा मोबाईलमध्ये गुंग झाला अन् तोल जाऊन चौथ्या मजल्यावरुन पडला, पण…

April 28, 2026
Next Post
आतिशबाजी तुमने शुरू की खत्म मैं करूंगा; ‘टायगर 3’ सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलर एकदा बघाच…

आतिशबाजी तुमने शुरू की खत्म मैं करूंगा; 'टायगर 3' सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलर एकदा बघाच...

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ वर्गाची शिकण्याची पद्धतच बदलणार; नव्या अभ्यासक्रमाचं गुपित काय?

May 8, 2026
मंगळवेढ्यात भीषण आग! ‘श्री जिजामाता कृषी केंद्र’ खाक, लाखोंची राखरांगोळी; आगीचे कारण…

मंगळवेढ्यात भीषण आग! ‘श्री जिजामाता कृषी केंद्र’ खाक, लाखोंची राखरांगोळी; आगीचे कारण…

May 8, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

जळालेला ट्रान्सफॉर्मर ३ दिवसांत द्या, अन्यथा गाठ माझ्याशी आहे; आमदार समाधान आवताडे यांचा महावितरणला ‘खणखणीत’ इशारा; शेतकऱ्यांच्या विजेसाठी आमदार मैदानात

May 8, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! बेपत्ता तरुणाचा जंगलात सापडला मृतदेह; रागाच्या भरात उचलले टोकाचे पाऊल; मंगळवेढ्यातील तरुणाची हृदयद्रावक आत्महत्या

May 7, 2026
मंगळवेढ्यात थरकाप! पहाटेच्या अंधारात ATM वर दरोडा; पोलिसांना पाहताच दरोडेखोरांचा ‘धूम’ स्टाईलने पोबारा

मंगळवेढ्यात थरकाप! पहाटेच्या अंधारात ATM वर दरोडा; पोलिसांना पाहताच दरोडेखोरांचा ‘धूम’ स्टाईलने पोबारा

May 7, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नका, अन्यथा गाठ आमच्याशी आहे; मनोज जरांगे-पाटील यांचा सरकारला थेट इशारा; ‘त्या’ विजयावरही संशय व्यक्त करत थेट निशाणा

May 6, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा