मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा युवा महोत्सव सप्टेंबरमध्ये पंढरपूरच्या स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयात होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने दरवर्षी विद्यापीठातर्फे युवा महोत्सव आयोजित केला जातो.
संगीत, कला, नाट्य, ललित कला व वाड;मय याअंतर्गत एकूण २७ कलाप्रकाराचे सादरीकरण युवा महोत्सवात केले जाते. गतवर्षी कथाकथन, काव्यवाचन विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांना व सजृनशिलतेला वाव मिळावा हा त्यामागील हेतू असतो.
यंदाच्या युवा महोत्सवाचे यजमानपद डॉ. बी. पी. रोंगे यांच्या स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाने स्वीकारले आहे. त्याठिकाणी चार दिवस हा युवा महोत्सव रंगणार आहे.
या महोत्सवासाठी विद्यापीठाकडून यजमान महाविद्यालयास १२ लाख रुपये दिले जातात. त्यातून स्पर्धक विद्यार्थ्यांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. सध्या महोत्सवाच्या अनुषंगाने विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी तयारी सुरु केली आहे.
राजभवनातर्फे आयोजित इंद्रधनुष्य व अखिल भारतीय पश्चिम विभागीय व राष्ट्रीय युवा महोत्सवात (एआययु) समाविष्ट असलेल्या कला प्रकारांचाही विद्यापीठाच्या युवा महोत्सवात समाविष्ट करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
जेणेकरून भविष्यात राज्य, राष्ट्रीय स्तरावर आपल्या विद्यार्थ्यांना त्याठिकाणी सहभागी होऊन प्रथम क्रमांक पटकावणे सोयीचे होईल, हा त्यामागील हेतू आहे. कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या अंतिम मान्यतेनंतर कोणते कलाप्रकार वाढतील, हे निश्चित होणार आहे.
विद्यार्थ्यांसह महाविद्यालयांच्या सोयीनुसार युवा महोत्सवाची तारीख अंतिम केली जाणार आहे. सप्टेंबरच्या मध्यावधीत हा महोत्सव सुरु करण्याचे नियोजन सुरु असून महोत्सव चार दिवस चालणार आहे. स्वेरी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या स्वागताची व महोत्सवाच्या नियोजनाला सुरवात केली आहे.
जास्तीत जास्त महाविद्यालयांनी या महोत्सवात सहभागी व्हावे, जेणेकरून त्यांच्या विद्यार्थ्यांना कलागुण सादर करण्याची संधी मिळेल, असे आवाहन कुलगुरूंनी केले आहे.(स्रोत:सकाळ)
यंदाचा युवा महोत्सव पंढरपूर येथील स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयात होणार आहे. त्यादृष्टिने विद्यापीठाशी संलग्नित सर्वच महाविद्यालयांनी तयारी करावी आणि विद्यार्थ्यांना महोत्सवात पाठवावे.- डॉ. राजनीश कामत, प्रभारी कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज