mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यातील तब्बल २५ हजार शासकीय व निमशासकीय कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर; ‘हे’ विभाग सलाईनवर; योजनांचा बोजवारा उडणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 14, 2023
in सोलापूर
मंगळवेढ्यात शेतकऱ्यांची कामे ठप्प; मंडल अधिकारी व तलाठी संघाने पुकारले बेमुदत रजा आंदोलन

टीम मंगळवेढा टाईम्स ।

जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी महापालिका, महसूल, नगरपालिका, आरटीओ कार्यालय, जीएसटी, राज्य विमा कामगार, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, कृषी, जलसंपदा, अशा सर्वच विभागातील

तब्बल २५ हजार शासकीय व निमशासकीय कर्मचारी आजपासून बेमुदत संपात सहभागी होतील, अशी माहिती शासकीय-निमशासकीय कर्मचारी समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष शंतनू गायकवाड यांनी दिली.

या संपामुळे शिक्षण, कृषी, आरोग्य या विभागाची पंचाईत होणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांनी आपापल्या खातेप्रमुखांना संपाची नोटीस दिली.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांवरील ‘प्रशासकराज’मध्ये त्या त्या खातेप्रमुखांना संप मिटेपर्यंत संबंधित कार्यालयाचे कामकाज हाताळाव लागणार आहे.

जलसंपदा, कृषी, आरटीओ, जिल्हा परिषद व महसूल यासह बहुतेक विभाग, ज्याच्याशी सर्वसामान्य जनतेचा थेट संबंध आहे अशा विभागातील कामाचा खोळंबा होणार आहे.

संप किती दिवस चालेल, याचा अंदाज नसल्याने खातेप्रमुखांनी पर्यायी व्यवस्था देखील केलेली नाही. त्यामुळे राज्य सरकार आता या संपाबाबत काय ठोस भूमिका घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची सध्या बोर्डाची परीक्षा सुरु आहे. शिक्षण विभागासह सर्वच शासकीय विभागातील कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेसाठी बेमुदत संपावर जात आहेत. पण, जिल्ह्यातील सर्वच केंद्र संचालकांनी परीक्षेसंदर्भात काहीच अडचण नसल्याचे स्पष्ट केले आहे.

संपामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असा विश्वास माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

जुन्या पेन्शन योजनेसह इतर मागण्यांसाठी आजपासून पुकारलेल्या बेमुदत संपात शहर व जिल्ह्यातील उच्च महाविद्यालयातील शिक्षकेतरही सहभागी होतील.

सर्व कर्मचारी मंगळवारी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित राहतील, असे सोलापूर जिल्हा कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले, सचिव राजेंद्र गिड्डे, कार्याध्यक्ष अण्णा गवळी, खजिनदार राहुल कराडे, उपाध्यक्ष आनंद व्हटकर व सिद्धेश्वर स्वामी यांनी कळविले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी (वर्ग तीन व चार) सध्या तांत्रिक अडचणीमुळे मंगळवारपासून पुकारलेल्या संपात सक्रिय सहभागी होवू शकणार नाहीत. तरीपण, त्यांनी संपाला तुर्तास बाहेरून पाठिंबा दिला आहे. या कर्मचाऱ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला नोटीस दिली असून ते २० मार्चनंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कर्मचारी संघटना या बेमुदत संपात सहभागी होतील.

आरोग्य विभाग सलाईनवर

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय आणि राज्य कामगार विमा रुग्णालयातील जवळपास साडेतीन हजार कर्मचारी (वर्ग तीन-चार) मंगळवारपासूनच्या बेमुदत संपात सहभागी होणार असल्याचे शासकीय-निमशासकीय कर्मचारी समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष शंतनू गायकवाड यांनी सांगितले.

रुग्णसेवा करणारे आरोग्य विभागातील कर्मचारी या संपात सहभागी होणार असल्याने यंत्रणा कोलमडणार आहे. अधिकाऱ्यांनी त्यासाठी पर्यायी व्यवस्था केली नसल्याची स्थिती आहे.

लाभक्षेत्र विकास प्राधिकरण व भीम कालवा मंडळातील (जलसंपदा विभाग) बहुतेक कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेसाठी बेमुदत संपात सहभागी होणार आहेत. सध्या कॅनॉल, कालवा, बोगदा व सीना-माढा, दहिगाव उपसा सिंचन योजनेतून शेतीसाठी पाणी सोडले आहे.

अशा स्थितीत पाण्यावर देखरेख ठेवणारे कर्मचारीच संपावर जात असल्याने अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. आता कर्मचाऱ्यांची सगळी कामे संप मिटेपर्यंत अधिकाऱ्यांनाच करावी लागणार आहेत.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील सर्वच कृषी कार्यालयातील वर्ग तीन व चारचे तब्बल ४५० पेक्षा अधिक कर्मचारी बेमुदत संपात सहभागी होणार आहेत.

त्यांनी तशाप्रकारची नोटीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांना दिली आहे. कृषी विभागातील बहुतेक कर्मचारी संपावर जाणार असल्याने कृषी विभागातील शेतकरी हिताच्या योजनांचा बोजवारा उडणार आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: बेमुदत उपोषण

संबंधित बातम्या

डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

काळीज पाषाणाचं! जन्म देताच माता-पित्यांचे पलायन; सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

March 15, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

प्रेमाचा ‘बुरखा’ फाटला! खरी ओळख लपवून तरुणीला प्रेमजाळ्यात ओढले, जात-धर्म लपवून तरुणीची फसवणूक; संशयास्पद तरुणाला सोलापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

March 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

मंगळवेढ्यात ‘सोन्या’चा नवा खेळ! बँकांना गंडा घालणारी टोळी सक्रिय?; बँकांचे धाबे दणाणले; बँका, पतसंस्थांनी सावध राहणे गरजेचे

March 15, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! पत्नी पोलीस दलात स्वत: एसआरपीएफ, जवानाने स्वत:लाच संपवलं, दोन चिमुकल्यांचा आधार हिरावला; सोलापूर जिल्हा हादरला

March 15, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मंगळवेढेकर सावधान! घरगुती गॅस सिलेंडर वापरताना ‘ही’ चूक पडेल महागात; व्यावसायिक वापर आढळल्यास थेट गुन्हे दाखल होणार

March 14, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

पालकांनो मुलांकडे लक्ष द्या! पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा खाणीत बुडून मृत्यू; वर्गातील सवंगड्यांसोबत गेला असताना घडली घटना

March 13, 2026
चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

March 12, 2026
कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा, विवाहितेने घेतला गळफास; सोलापुरातील धक्कादायक घटना

सुनेच्या जाचाला कंटाळून सासऱ्याचं टोकाचं पाऊल; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

March 11, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

मोठी बातमी! मंगळवेढ्यात तब्बल ८ कोटींचा ‘शेअर’ बाजार! ‘बाळू’ने शेकडो जणांना घातली टोपी; शिक्षक अन् व्यावसायिकांचे कष्टाचे पैसे पाण्यात?”तक्रार अर्ज दाखल, तालुक्यात एकच खळबळ

March 10, 2026
Next Post
खळबळ! मंगळवेढ्यात अल्पवयीन मुलीचा बालविवाह; नवरदेवासह अन्य ५० ते ६० वऱ्हाडी मंडळीवर गुन्हा दाखल

दहावीच्या परीक्षेला जाऊ न देता अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याप्रकरणी 50 व्यक्तींवर पोलिसांनी कारवाई

ताज्या बातम्या

डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

काळीज पाषाणाचं! जन्म देताच माता-पित्यांचे पलायन; सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

March 15, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

प्रेमाचा ‘बुरखा’ फाटला! खरी ओळख लपवून तरुणीला प्रेमजाळ्यात ओढले, जात-धर्म लपवून तरुणीची फसवणूक; संशयास्पद तरुणाला सोलापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

March 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

मंगळवेढ्यात ‘सोन्या’चा नवा खेळ! बँकांना गंडा घालणारी टोळी सक्रिय?; बँकांचे धाबे दणाणले; बँका, पतसंस्थांनी सावध राहणे गरजेचे

March 15, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! पत्नी पोलीस दलात स्वत: एसआरपीएफ, जवानाने स्वत:लाच संपवलं, दोन चिमुकल्यांचा आधार हिरावला; सोलापूर जिल्हा हादरला

March 15, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मुलींच्या मोफत शिक्षणात अडथळा? मंत्र्यांनी बजावला इशारा; होणार कारवाई; मुलींच्या शुल्काची लूट थांबणार; विधानसभेत मोठी घोषणा

March 15, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

कामाची बातमी! अ‍ॅट्रोसिटी कायद्यात महत्त्वाचा बदल; आता एफआयआर दाखल होताच अटक नाही, ‘या’ नंतरच कारवाई

March 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा