mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सर्दी, ताप, खोकला वाढला; मास्कचा वापर अन् गर्दीत न जाण्याचा सल्ला, सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे ‘इतके’ ॲक्टिव्ह रुग्ण; पावणेदोन लाख व्यक्तींनी लस घेतलीच नाही

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 13, 2023
in सोलापूर
नवे संकट! घरोघरी खो खो खोकला; कोरोनानंतर आता नवी डोकेदुखी, रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली; काळजी घेण्याचे आवाहन

टीम मंगळवेढा टाईम्स। 

दोन-अडीच महिने हद्दपार झालेला कोरोना पुन्हा एकदा वाढण्याच्या तयारीत असल्याची स्थिती आहे. सध्या सोलापूर शहरात १७ तर ग्रामीणमध्ये चार सक्रिय रुग्ण आहेत.

माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर व पंढरपूर तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, सर्वच रुग्णांमध्ये तीव्र किंवा मध्यम लक्षणे नसल्याने ते होम आयसोलेशनमध्ये आहेत.

सध्या मुंबई, ठाणे, पुणे, वाशिम व धाराशिव जिल्ह्यामध्ये अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण जास्त आहेत. दुसरीकडे मुंबई, ठाणे, पुणे या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून

रायगड, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, धाराशिव व अमरावती या जिल्ह्यांमध्ये दहापेक्षा अधिक रुग्ण सक्रिय आहेत. पण समाधानकारक बाब म्हणजे, त्यांच्यात तीव्र किंवा माध्यम स्वरूपाची लक्षणे नसल्याने ते वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्यांच्या स्वतःच्या घरी उपचार घेत आहेत.

कोरोना टेस्ट करून वेळेत उपचार घ्या

दरम्यान, रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होत असल्यास किंवा दोन दिवसांपेक्षा अधिक दिवस १०० पेक्षा अधिक ताप असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने कोरोना टेस्ट करून वेळेत उपचार घ्यायला हवेत.

दरम्यान, आतापर्यंत सोलापूर शहरात ३४ हजार ५६१ व्यक्तींना कोरोना होऊन गेला आहे. सद्य:स्थितीत शहरातील नऊ पुरुष व आठ महिला कोरोना बाधित असून ते होम आयसोलेशनमध्ये आहेत.

दुसरीकडे, सोलापूर ग्रामीणमधील एक लाख ८७ हजार ४१२ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली. होती. त्यातील चार रुग्ण (एक पुरुष व तीन महिला) सध्या त्यांच्या त्यांच्या घरी उपचार घेत आहेत.(स्रोत:सकाळ)

पावणेदोन लाख व्यक्तींनी लस घेतलीच नाही

सोलापूर जिल्ह्यातील १२ वर्षांवरील ३४ लाख ४१ हजार ४०० व्यक्तींनी कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचून घेणे आवश्यक आहे. पण, आतापर्यंत जिल्ह्यातील पावणेदोन लाख व्यक्तींनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही.

दुसरीकडे, पहिला डोस घेतलेल्या तब्बल सात लाख व्यक्तींनी दुसरा डोस घेतलाच नाही. तर जिल्ह्यातील अवघ्या एक लाख ८७ हजार व्यक्तींनीच संरक्षित डोस ( बूस्टर) घेतला आहे.

वातावरणातील बदलांमुळे सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी प्रतिबंधित लस टोचून घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.

सध्या सोलापूर शहरात सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण आढळत आहेत. प्रत्येकाने विशेषत: ज्येष्ठ नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे. लक्षणे वाटल्यास त्यांनी त्वरित कोरोनाची टेस्ट करून घ्यावी. प्रतिबंधित लस टोचून घ्यावी आणि चेहऱ्यावर मास्क घालायला हवा. – डॉ. बसवराज लोहारे, आरोग्याधिकारी, सोलापूर महापालिका

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोनासोलापूर

संबंधित बातम्या

सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

काय झाडी, काय डोंगर… अन काय तो पेपर! भूगोलाच्या पेपरात ‘नापास’ होण्याची भीती, पठ्ठ्यानं थेट प्रश्नपत्रिकाच केली चोरी

March 20, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून कालवा आणि बोगद्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात; ‘एवढ्या’ लाभक्षेत्राला पाणी मिळणार; ‘या’ अखेरपर्यंत पाणी चालू राहणार

March 19, 2026
नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

नदी वाचवा, निधी द्या! भीमेच्या शुद्धीकरणासाठी १०० कोटी द्या; आमदार आवताडेंची सरकारकडे आग्रही मागणी; विधानसभेत घुमवला आवाज

March 17, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! ​गरीबांच्या हक्काच्या पैशावर डल्ला; लाचखोर ग्रामपंचायत कर्मचारी अटकेत

March 17, 2026
कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबीर: मोफत तपासणी आणि उपचारांची सुवर्णसंधी

March 17, 2026
Next Post
एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवेढ्यातील तत्कालीन मंडळअधिकारी रंगेहाथ सापडला

मोठी बातमी! तीस हजार रुपयाची लाच मागून 10 हजार रुपये पहिला हप्ता घेणाऱ्या तलाठ्यास रंगेहात पकडले

ताज्या बातम्या

सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

काय झाडी, काय डोंगर… अन काय तो पेपर! भूगोलाच्या पेपरात ‘नापास’ होण्याची भीती, पठ्ठ्यानं थेट प्रश्नपत्रिकाच केली चोरी

March 20, 2026
वृक्षारोपणाने गुंफले सामाजिक उत्तरदायित्व! श्री वैभवलक्ष्मी महिला पतसंस्थेचा ३रा वर्धापनदिन दिमाखात साजरा

वृक्षारोपणाने गुंफले सामाजिक उत्तरदायित्व! श्री वैभवलक्ष्मी महिला पतसंस्थेचा ३रा वर्धापनदिन दिमाखात साजरा

March 20, 2026
विश्वासार्हता आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर ‘श्रीकृपा अर्बन’ प्रगतीपथावर राहील: आमदार समाधान आवताडे यांचे गौरउद्गार

विश्वासार्हता आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर ‘श्रीकृपा अर्बन’ प्रगतीपथावर राहील: आमदार समाधान आवताडे यांचे गौरउद्गार

March 20, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

March 20, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! आता ‘तारीख पे तारीख’ नाही; कोर्टाच्या तारखांनी हैराण झाला असाल तर ही बातमी वाचाच

March 20, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून कालवा आणि बोगद्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात; ‘एवढ्या’ लाभक्षेत्राला पाणी मिळणार; ‘या’ अखेरपर्यंत पाणी चालू राहणार

March 19, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा