mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यातील व्यवसायिक हबमुळे अर्थकारणास मोठी संजीवनी मिळणार; पंढरपूर एम.आय.डी.सी. कामासाठी गती देण्याचे उद्योगमंत्र्यांचे निर्देश

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 8, 2023
in मंगळवेढा, सोलापूर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पंढरपूर शहर व तालुक्याच्या दृष्टीने भौतिक, व्यावसायिक आणि अर्थिक  पातळ्यांवर अतिशय महत्वपूर्ण असणारा पंढरपूर एम. आय. डी. सी. प्रश्न गेली अनेक वर्षे भिजत घोंगडे अशा अवस्थेत सापडला होता.

सदर एम. आय. डी. सी. साकार झाल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील निरनिराळ्या विकासात्मक बाबींचा विकास कसा होऊ शकतो यावर फक्त कागदी घोडे नाचवून या मुद्द्याला वारंवार उर्जित ठेवण्याचा प्रयत्न सतत केला जात होता.

परंतु विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये  मंगळवेढा पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्राचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार आवताडे यांनी जबाबदारी खांद्यावर घेतल्यापासून मतदारसंघातील

वीज, पाणी, रस्ते, आरोग्य आदी बाबींच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी आपले राजकीय कौशल्य पणासलावून आत्तापर्यंतचा सर्वात भरीव आणि मोठा निधी मतदार संघासाठी खेचून आणला आहे.

आमदार आवताडे यांची ही विकासाभिमुख दृष्टी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरत आहे.

आ.आवताडे यांच्या या मागणीला सक्षमपणे पुष्टी देण्यासाठी प्रशासकीय पातळीवरील कामाची गती वाढविण्याचे निर्देश उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या मागणीच्या अनुषंगाने उद्योगमंत्री ना. नंबर उदय सावंत यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी बैठक संपन्न झाली. त्यावेळी संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत.

त्याचबरोबर मंगळवेढा तालुक्यातील एम.आय.डी. सी या व्यावसायिक संकुलास व्यापक व विस्तारित रूप देण्यासाठी उद्योजकांना या एम. आय. डी.सी मध्ये छोटे – मोठे उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी प्राधान्याने गुंतवणूक करण्यासाठी प्रयत्न करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली.

जे उद्योजक मंगळवेढा येथील एम.आय.डी.सी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी स्वारस्य दर्शवतील अशा उद्योजकांच्या समस्या व अडी- अडचणी  प्राधान्य क्रमाने सोडविण्यावरही यावेळी अधिकारी व पदाधिकारी यांच्या समवेत चर्चा करण्यात आली.

मंगळवेढा तालुक्यामध्ये या व्यवसायिक हबमुळे अर्थकारणास मोठी संजीवनी

दुष्काळी तालुका अशी ओळख असणाऱ्या मंगळवेढा तालुक्यामध्ये या व्यवसायिक हबमुळे अर्थकारणास मोठी संजीवनी मिळणार असल्याचेही या बैठकीत मत मांडण्यात आले.

मतदारसंघातील मूलभूत आणि पायाभूत बाबींच्या धोरणात्मक प्रगतीचा रथ पुढे संक्रमित करत असताना आमदार आवताडे यांनी पंढरपूर एम. आय. डी. सी पूर्णत्वास जाण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून चंग बांधला आहे.

अशातच राज्यामध्ये सत्तेची समीकरणे बदलल्यानंतर आमदार आवताडे यांच्या या मागणीला मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली सदर मागणीस आणखी धार प्राप्त झाली.

पंढरपूरसारख्या तीर्थक्षेत्र तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदर एम. आय. डी. सी.साकार होणे ही काळाची गरज असल्यामुळे आमदार आवताडे यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून व प्रत्यक्ष भेटून या प्रश्नाच्या अनुषंगाने पाठपुरावा केला होता.

येथील स्थानिक बेरोजगारी व आमदार आवताडे यांची या मागणीबद्दल असणारी तळमळ लक्षात घेऊन उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी या सह्याद्री शासकीय निवासस्थानी आमदार आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन या प्रश्नावर सखोल चर्चा केली.

सदर बैठकीमध्ये पंढरपूर एम.आय.डी. सी संदर्भात आमदार आवताडे यांनी आत्तापर्यंत झालेल्या सर्व घडामोडींची माहिती मंत्री महोदय यांच्यासमोर मांडली.

आमदार आवताडे यांनी मांडलेल्या या माहितीच्या आधारे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना या प्रश्नाच्या अनुषंगाने त्वरित आवश्यक शासकीय गोष्टींची पूर्तता करून पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आमदार आवताडे यांच्या आत्तापर्यंत केलेल्या मागणीला व पाठपुराव्याला मोठे यश आल्याचे चित्र मतदारसंघांमध्ये दिसत आहे.

पंढरपूर तालुका व शहर मधील युवक युवतींच्या बेरोजगारीचा प्रश्न या एम.आय.डी. सी मुळे मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहे. त्यासोबत तालुक्याच्या आर्थिक समीकरणाची चाकेसुद्धा अधिक गतिमान होणार आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आ.समाधान आवताडे

संबंधित बातम्या

​पोलीस ठाण्याच्या मैदानात रंगला थरार; मंगळवेढा व्हॉलीबॉल स्पर्धेत ‘हे’ संघ ठरले मानकरी; पोलीस-जनता सलोख्यासाठी रंगले सामने

​पोलीस ठाण्याच्या मैदानात रंगला थरार; मंगळवेढा व्हॉलीबॉल स्पर्धेत ‘हे’ संघ ठरले मानकरी; पोलीस-जनता सलोख्यासाठी रंगले सामने

July 6, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

सावधान! बीएलओ तीनदा येऊनही भेटला नाही तर मतदार यादीतून नाव होणार बाद; ​निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

July 6, 2026
आमदार रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात सामाजिक उपक्रमांचा धडाका; ​उद्योजक राहुल ताड यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम

आमदार रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात सामाजिक उपक्रमांचा धडाका; ​उद्योजक राहुल ताड यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम

July 5, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

​काळजाचा थरकाप! लेकरांना जेवत्या ताटावरून उठवलं, झोपवायला नेते म्हणून गेली; विहिरीतील ‘ते’ दृश्य पाहून गावकऱ्यांचा हंबरडा

July 5, 2026
बसवेश्वर स्मारकासाठी निधी देण्याचे दिले आश्वासन; अर्थसंकल्पात कोणतीच निधीची तरतूद केली नाही

अखेर प्रतीक्षा संपली! महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठी महत्त्वाची पाऊले; ‘या’ तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

July 5, 2026
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

​अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; लाखो रुपयांच्या मुद्देमालासह जुगाऱ्यांचा खेळ खंडोबा

July 4, 2026
मोठा दिलासा! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 10 हजार कोटींच्या पॅकेजची ठाकरे सरकार कडून घोषणा

मंगळवेढ्यात खळबळ! नामांकित शाळेच्या प्रवेशद्वारावरच मध्यरात्री ‘अघोरी पूजा’; संशयिताविरुद्ध पोलिसांत तक्रार

July 4, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सभापती दीपाली ताड यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! मंगळवेढा तालुक्यातील ७ जिल्हा परिषद शाळांना मिळाले नवीन शिक्षक; ​पालक वर्गातून व्यक्त होतोय आनंद

July 3, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

वटपौर्णिमेलाच सुहासिनीचा कुंकवाचा धनी हिरावला! ८ दिवसांत बेकायदा दारू विक्री बंद करा; अन्यथा महिला दारू धंद्यावर जाऊन बाटल्या फोडणार

July 3, 2026
Next Post
पालकांनो! सोलापूर जिल्ह्यातील लहान मुलांच्या होणार ५२ आजारांच्या तपासण्या; आता शाळेमध्येच येणार डॉक्टर; आजपासून मोहीम

पालकांनो! सोलापूर जिल्ह्यातील लहान मुलांच्या होणार ५२ आजारांच्या तपासण्या; आता शाळेमध्येच येणार डॉक्टर; आजपासून मोहीम

ताज्या बातम्या

​पोलीस ठाण्याच्या मैदानात रंगला थरार; मंगळवेढा व्हॉलीबॉल स्पर्धेत ‘हे’ संघ ठरले मानकरी; पोलीस-जनता सलोख्यासाठी रंगले सामने

​पोलीस ठाण्याच्या मैदानात रंगला थरार; मंगळवेढा व्हॉलीबॉल स्पर्धेत ‘हे’ संघ ठरले मानकरी; पोलीस-जनता सलोख्यासाठी रंगले सामने

July 6, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

सावधान! बीएलओ तीनदा येऊनही भेटला नाही तर मतदार यादीतून नाव होणार बाद; ​निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

July 6, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो नोंद घ्या! ऐन शाळा सुरू होताच शिक्षकांचा ‘एल्गार’; ७ आणि ८ जुलैला शाळा बंद राहण्याची शक्यता; काय आहे कारण?

July 5, 2026
आमदार रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात सामाजिक उपक्रमांचा धडाका; ​उद्योजक राहुल ताड यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम

आमदार रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात सामाजिक उपक्रमांचा धडाका; ​उद्योजक राहुल ताड यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम

July 5, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

​काळजाचा थरकाप! लेकरांना जेवत्या ताटावरून उठवलं, झोपवायला नेते म्हणून गेली; विहिरीतील ‘ते’ दृश्य पाहून गावकऱ्यांचा हंबरडा

July 5, 2026
बसवेश्वर स्मारकासाठी निधी देण्याचे दिले आश्वासन; अर्थसंकल्पात कोणतीच निधीची तरतूद केली नाही

अखेर प्रतीक्षा संपली! महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठी महत्त्वाची पाऊले; ‘या’ तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

July 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..