टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाच्या मृत्यूचे सत्र सुरुच असून आज पुन्हा 8 जणांचा बळी गेला आहे तर नव्या 258 कोरोना बाधितांची भर पडली आहे. 235 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
( Solapur rural corona news update )
आज ‘या’ गावातील रुग्णांचा मृत्यू
पंढरपुरातील संतपेठेतील 80 वर्षीय पुरुषाचा, शेगाव दुमाला येथील 67 वर्षीय पुरुषाचा, दक्षिण सोलापुरातील फताटेवाडी येथील 75 वर्षीय पुरुषाचा, तर मनगोळीतील 27 वर्षीय पुरुषाचा, बार्शी तालुक्यातील वैरागमधील 72 वर्षीय महिला, माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील 63 वर्षीय पुरुष तर वाफळे (ता. मोहोळ) येथील 53 वर्षीय पुरुष, कामती खुर्द येथील 77 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आज ‘या’ भागात आढळले नवे रुग्ण
मंगळवेढ्यातील बोराळे, ब्रम्हपुरी, गोनेवाडी, कुंभार गल्ली, लक्ष्मी दहिवडी, मरवडे, शिरनांदगी, तळसंगी, मोहोळमधील कामती खु., नरखेड, वाफळे,सांगोल्यातील जवळा, कडलास, महूद, मेथावडे, नाझरे, वाढेगाव, वाकीशेगाव, दक्षिण सोलापुरातील मनगोळीत आठ आणि विंचूर येथे दोन रुग्ण आढळले आहेत.
अक्कलकोटमधील बुधवार पेठ, दुधनी, किणी, कुरनूर, करमाळ्यातील चांदगुडे गल्ली, देवळाली, गुलसडी, जातेगाव, मेनरोड, रोशेवाडी, संभाजी नगर, तेली गल्ली, झरे, , बार्शीतील जामगाव आ., काटेगाव, कोरफळे, महागाव, शेलगाव, उत्तर सोलापुरातील बीबी दारफळ, मार्डी, माढ्यातील बेंबळे, भोसरे, कुंभेज, कुर्डू, कुर्डूवाडी, मोडनिंब, वरवडे येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे.
माळशिरस तालुक्यातील 61 फाटा, अकलूजमध्ये 21 रुग्ण, बागेचीवाडी, बोंडले, बोरगाव, कन्हेर, कुसमोड, लवंग, लोंढे-मोहितेवाडी, माळीनगर, मांडवे, नातेपुते, पिलीव, संग्राम नगर, तांबवे, तांदुळवाडी, पंढरपुरातील अनिल नगर, भक्तीमार्ग, भंडीशेगाव, बादुले चौक, चळे, जळोली, जुनी पेठ, कडबे गल्ली, कालिकादेवी चौक, करकंब, कासेगाव, करोळे, खर्डी, कोळी गल्ली, लक्ष्मी टाकळी, महापौर चाळ, मनिषा नगर, नेमतवाडी, मुंढेवाडी, पळशी, परदेशी नगर, सांगोला रोड, संत पेठ, स्टाफ क्वॉर्टर उपजिल्हा रुग्णालय, सुस्ते, उंबरेपागे, वाडीकुरोली आणि वाखरी येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे.
-:खासगी सावकारीतून तरुणाला केली मारहाण; राष्ट्रवादीच्या नगसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज