mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Breaking! साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ईडीच्या ताब्यात; आता पुढे काय?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 31, 2022
in राज्य
Breaking! साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ईडीच्या ताब्यात; आता पुढे काय?

टीम मंगळवेढा टाईम्स ।

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अखेर अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने ताब्यात घेतलंय. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात आज सकाळी 7 वाजता ईडीचं पथक संजय राऊत यांच्या घरी दाखल झालं.

त्यानंतर तब्बल साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने दुपारी साडे तीनच्या सुमारास संजय राऊत यांना ताब्यात घेतलं आहे.

आता काही वेळातच संजय राऊत यांना ईडी कार्यालयात नेलं जाण्याची शक्यता आहे. मात्र, संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर आता पुढे काय? असा प्रश्न विचारला जातोय.

त्याबाबत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

संजय राऊतांना ताब्यात घेतल्यानंतर आता पुढे काय?

उज्ज्वल निकम यांनी सांगितलं की, ज्यावेळी ईडी एखाद्या व्यक्तीला अटक करत असते, तेव्हा ईडीकडे त्या व्यक्तीविरोधात सकृतदर्शनी पुरावा असतो. ईडीच्या कारवाईत नेहमी तोंडी पुरावा नसतो, तर तो कागदोपत्री पुरावा असतो.

त्या कागदोपत्री पुराव्या आधारे संबंधित व्यक्तीला स्पष्टीकरण करता आलं नाही तर मात्र ईडी कारवाई करुन त्या व्यक्तीला ताब्यात घेऊ शकते. किंवा त्या वक्तीने ईडीच्या प्रश्नाला उत्तरं दिली नाहीत,

तसंच दिलेली उत्तरं समाधानकारक नसतील तर ईडी त्या वक्तीला ताब्यात घेऊ शकते. त्यानंतर पीएमएलए कायद्यानुसार त्या व्यक्तीला ईडीच्या विशेष कोर्टासमोर हजर करावं लागतं आणि मग तिथे ईडी कोठडी मागितली जाऊ शकते.

कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय..
मी शिवसेनेसाठी लढत राहीन.

— Sanjay Raut (@rautsanjay61) July 31, 2022


तिथे ईडी कोठडी किंवा न्यायालयीन कोठडी हे दोन प्रकार त्यांना मिळू शकतात. अर्थात हा न्यायाधीशांपुढे पुरावा सादर करावा लागतो आणि त्यानुसार ईडी कोठडी किंवा न्यायालयीन कोठडी दिली जाऊ शकते, अशी माहिती निकम यांनी दिलीय.

राऊतांची आक्रमकता नडली?

संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांबाबत कायम ताठर भूमिका घेतलेली आहे. शिवाय त्यांच्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

पत्राचाळीतील जागेच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना 1 जुलै रोजी नोटीस बजावली होती. तेव्हापासून सुरु असलेली प्रक्रिया आता थेट घरापर्यंत येऊन ठेपली आहे.


एकीककडे घरात त्यांच्यासह कुटुंबियांची चौकशी सुरु असताना दुसरीकडे फ्लॅटवरही अधिकारी पोहचल्याने नेमकी काय कारवाई होणार हे पहावे लागणार आहे.

या फ्लॅट खरेदीसाठी वर्षा राऊत यांच्या खात्यावर 55 लाख रुपये जमा केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळेच याची चौकशी सुरु झाली आहे.(स्रोत:TV9 मराठी)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: संजय राऊत

संबंधित बातम्या

मोठी बातमी! कृषिभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवून केली जबर मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण; जाणून घ्या..

धक्कादायक! 16 वर्षांच्या मुलगा मोबाईलमध्ये गुंग झाला अन् तोल जाऊन चौथ्या मजल्यावरुन पडला, पण…

April 27, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

खळबळ! ‘हा’ निघाला खरातच्या पुढचा बाबा, 200 व्हिडीओ, 90 गोळ्या; पोलीसही हादरले

April 25, 2026
पदवीधरसाठी रणधुमाळी शिगेला; देशमुख, ढमाले, पाटील व लाड यांच्यात काटे की टक्कर

विधान परिषद निवडणुकीसाठी कुणाला तिकीट? भाजपने ‘या’ नावांची यादी दिल्लीला पाठवली; कुणाकुणाची नावे?

April 24, 2026
शासकीय कार्यालयाप्रमाणे ‘या’ विभागाला पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी राज्य सरकारची हालचाली सुरू

कामाची बातमी! देवस्थान इनाम जमिनींबाबत महत्वाची अपडेट; राज्य सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय

April 23, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

हेलपाटे वाचणार! जमिन NA करण्यासाठी आता सोपी, जलद ऑनलाइन प्रणाली सुरु; बीपीएमएस प्रणालीचे महसुलीमंत्री बावनकुळेंच्या हस्ते लोकार्पण

April 22, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

उन्हाळ्यात पावसाळा! नागरिकांसाठी सूचना जारी; ‘हे’ जिल्हे आज ‘यलो अलर्ट’वर; ‘या’ दिवसापर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता

April 22, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

नागरिकांनो! गॅस सिलिंडरसाठी आता नवा नियम, हा नंबर नसेल तर सिलिंडर मिळणारच नाही; वाचा काय गरजेचं?

April 22, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! उच्च न्यायालयाचा ३१५ ग्रामपंचायतींच्या सरपंचांना मोठा दिलासा; दिला अत्यंत महत्वाचा निर्णय

April 21, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

रक्त नात्यातील जमीन वाटणी पूर्णपणे मोफत; सातबारावरील हक्कासाठी शुल्क भरावे लागणार नाही; नेमका बदल असा, आधी काय आणि आता काय?

April 21, 2026
Next Post
मंगळवेढ्यातील ‘या’ गावात होणार नविन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ८ कोटींचा निधी मंजूर; आ.आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

पाणीदार आमदार! मंगळवेढ्यातील 'या' गावांना पाणी पुरवठा योजनेसाठी १३ कोटी ६५ लाखांचा निधी मंजूर; आ.आवताडे

ताज्या बातम्या

मोठी बातमी! कृषिभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवून केली जबर मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण; जाणून घ्या..

धक्कादायक! 16 वर्षांच्या मुलगा मोबाईलमध्ये गुंग झाला अन् तोल जाऊन चौथ्या मजल्यावरुन पडला, पण…

April 27, 2026
लोकनेता! घोडके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; चेअरमन अनिल सावंतांनी सावरले, दिला माणुसकीचा आधार

लोकनेता! घोडके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; चेअरमन अनिल सावंतांनी सावरले, दिला माणुसकीचा आधार

April 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

शाळेच्या उंबरठ्यावरच दारूचे पेले? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा संताप; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

April 27, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू , शिक्षक नवऱ्याविरोधात गुन्हा; नेमकं काय घडलं?

April 27, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

सावधान! ‘लुटेरी दुल्हन’ सक्रिय; मंगळवेढ्यात नवरीने लावला २.७० लाखांचा चुना, पळून जाणाऱ्या ‘नवरी’सह महिला एजंट जेरबंद

April 26, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मोठी बातमी! जो तक्रार करायला आला, तोच लुटारू निघाला; पोलिसांच्या जाळ्यात ‘तो’ तोतया चालक; मंगळवेढा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

April 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा