mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नागरिकांनो! आमदार समाधान आवताडे व आ.प्रशांत परिचारक येणार तुमच्या गावात; सोबत असणार तालुकास्तरावरील सर्व प्रशासकीय यंत्रणा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 21, 2022
in मंगळवेढा, राजकारण
आवताडे-परीचारकांचे मनोमिलन झाल्यास राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव अटळ?

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा

सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे यांनी ग्रामस्थांच्या समस्या गावपातळीवरच सोडविण्यासाठी ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे.

आज गुरुवारपासून मतदारसंघातील प्रत्येक गावाला ते भेट घेऊन आढावा घेणार आहेत. त्यांच्यासोबत तालुकास्तरावरील सर्व प्रशासकीय यंत्रणा सोबत राहणार आहे.

‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत गावातील घरकुल योजना, कृषी, पीककर्ज, विकासकामे, शिक्षण, वीज, रेशन वाटप आदी बाबींचा आढावा घेणार आहेत.

दौऱ्यात तालुकास्तरावरील सर्व अधिकारी, स्थानिक यंत्रणा, सभापती, पंचायत समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत. तर गावात ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित असतील.

माजी आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे हे ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेऊन त्याबाबत प्रशासकीय यंत्रणेला सूचना देणार आहेत.

असा असेल दौरा

आज गुरुवार, दिनांक २१ एप्रिल रोजी दुपारी ४.०० वाजता देगांव, ४.३० वाजता शरदनगर, ५.०० वाजता ढवळस आणि ५.३० वाजता धर्मगांव असा कार्यक्रम असणार आहे.

शुक्रवार, दिनांक २२ एप्रिल रोजी सकाळी ८.०० वाजता मुंढेवाडी, ८.३० वाजता रहाटेवाडी, ९.३० वाजता बोराळे,  १०.०० वाजता नंदुर, १०.३० वाजता अरळी, ११.०० वाजता सिद्धापूर, ११.३० वाजता तांडोर, दुपारी १२.०० वाजता तामदर्डी, १२.३० वाजता माचणूर, १.०० वाजता ब्रम्हपूरी, १.३० वाजता बठाण आणि २.०० वाजता उचेठाण असा कार्यक्रम असणार आहे.

शनिवार, दिनांक २३ एप्रिल रोजी सकाळी ८.०० वाजता घरनिकी, ८.३० वाजता मारापूर, ९.३० वाजता गुंजेगाव, १०.०० वाजता महमदाबाद (शे), १०.३० वाजता लक्ष्मीदहिवडी, ११.०० वाजता लेंडवे चिंचाळे, ११.३० वाजता आंधळगाव, दुपारी १२.०० वाजता गणेशवाडी, १२.३० वाजता शेलेवाडी, १.०० वाजता अकोला,१.३० वाजता कचरेवाडी आणि २.०० डोंगरगाव येथे दौरा नियोजित आहे.

लोकाच्या समस्या गावातच सोडविण्याचा प्रयत्न

कोरोनामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे लोकांच्या समस्या गावातच सुटाव्यात, या उद्देशाने ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. लोकाच्या समस्या गावातच सोडविण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. – प्रशांत परिचारक, मा.आमदार,

कोणत्याही परिस्थितीत लोकांच्या प्रश्नांसाठी तत्पर राहणार : आ.आवताडे

सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी मी कायम तत्पर असून, आता रोज एका-एका गावात जावून तेथील प्रश्न समजावून घेतले जाणार आहेत. अनेक प्रश्न तेथेच सोडविण्याचा प्रयत्न असेल.

रस्ते, वीज, पाणी आदी प्रश्नांसाठी अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून कामे केली जातील असे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले आहे.

सदर गावभेट दौऱ्यामध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक व आ. समाधान आवताडे यांच्यासमवेत तालुका पातळीवररील विविध विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी सदरील गावातील ग्रामस्थांनी व नागरिकांनी आपल्या अडी – अडचणी व समस्या लेखी स्वरूपात सादर कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आ.समाधान आवताडेगाव भेट दौराप्रशांत परिचारक

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती,भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

उजनी पुनर्वसन जमीन घोटाळा! डमी खरेदीचे मोठे रॅकेट; एजंट झाले ‘मालामाल’, संपूर्ण रॅकेटची उच्चस्तरीय सखोल चौकशीची जनतेतून तीव्र मागणी

July 11, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बँकेचे पैसे बुडवणे भोवले! धनश्री मल्टीस्टेटची आक्रमक वसुली; कारखान्याच्या माजी संचालकाची थेट तुरुंगात रवानगी; न्यायालयाचा मोठा दणका

July 10, 2026
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

मंगळवेढ्यात बुलेट राजांना दणका! पोलिसांची धडक कारवाई; मॉडिफाईड सायलेन्सर अन् विना नंबर प्लेटच्या ‘या’ वाहनांवर ‘ॲक्शन’

July 10, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

पुनर्वसनाच्या जमिनीवर डोळा! जमीन तुमची, आधार कार्ड खोटे अन् अंगठा दुसऱ्याचाच; मंगळवेढ्यात उजनी जमीन घोटाळ्याचा थरार, वाचून थक्क व्हाल; एजंट मालामाल

July 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आ.समाधान आवताडेंचा धडाका! मंगळवेढ्याला म्हैसाळचे, तर पंढरपूरला कॅनॉलद्वारे मिळणार पाणी; वीज पुरवठाही ८ तास होणार

July 10, 2026
एका बाजूला यांची मोदींची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला दर दिवसाला शेतकरी आत्महत्या करतोय; ही स्थिती किती दिवस चालू द्यायची; शरद पवारांनी साधला निशाणा

विलिनीकरण की भाजपसोबत जायचं? शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं? थेट बड्या नेत्यानेच सांगितली आतली खबर

July 9, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो सावधान! ‘अनधिकृत’ इंग्लिश शाळेचा सुळसुळाट; मुलांचे भविष्य अंधारात, स्कूल बसची सुरक्षाही रामभरोसे

July 9, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर बसस्थानक परिसरात पोलिसांचे ‘मॉकड्रिल’

July 8, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

मंगळवेढ्यातील १ लाख ९९ हजार मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! २००२ च्या यादीत नाव नसेल तर ‘या’ कागदपत्रांशिवाय पर्याय नाही

July 7, 2026
Next Post
Breaking! मंगळवेढ्यातील सहा विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले, पालक चिंताग्रस्त; विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी आ.आवताडेंचे प्रयत्न सुरू

राज्यातील पोलीस दलात मोठी खांदेपालट; 'या' बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती,भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

उजनी पुनर्वसन जमीन घोटाळा! डमी खरेदीचे मोठे रॅकेट; एजंट झाले ‘मालामाल’, संपूर्ण रॅकेटची उच्चस्तरीय सखोल चौकशीची जनतेतून तीव्र मागणी

July 11, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बँकेचे पैसे बुडवणे भोवले! धनश्री मल्टीस्टेटची आक्रमक वसुली; कारखान्याच्या माजी संचालकाची थेट तुरुंगात रवानगी; न्यायालयाचा मोठा दणका

July 10, 2026
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

मंगळवेढ्यात बुलेट राजांना दणका! पोलिसांची धडक कारवाई; मॉडिफाईड सायलेन्सर अन् विना नंबर प्लेटच्या ‘या’ वाहनांवर ‘ॲक्शन’

July 10, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी गूडन्यूज! कर्जमाफीच्या दोन अटी केल्या रद्द, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कुणाला मिळणार फायदा?

July 11, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडकी बहीण’ योजनेचे पैसे वाढणार? मोदींच्या सल्लागार परिषदेचा मोठा अहवाल; पण ‘या’ महिलांसाठी चिंतेची बातमी

July 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा