mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मुख्यमंत्री ठाकरे यांनी साधला मंगळवेढा तालुक्यातील सरपंचांशी संवाद

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 7, 2021
in राज्य, सोलापूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलवली आज बैठक

मंगळवेढा टाईम्स टीम ।

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर जिल्ह्यातील सरपंचाशी संवाद साधला. त्यांच्या या संवादाने आमचा हुरूप आणखी वाढला, अशी भावना आज सोमवारी सोलापूर जिल्ह्यातील सहा सरपंचांनी व्यक्त केली.

मंगळवेढा तालुक्यातील आंधळगावच्या सरपंच शांताबाई भाकरे, रहाटेवाडी ता.मंगळवेढा वर्षाराणी गोपाळ पवार, मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील सरपंच डॉ. अमित व्यवहारे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना गाव कोरोनामुक्त करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी राज्यातील विविध सरपंचांनी आपआपल्या परीने उपक्रम राबविले आहे. पुणे, नाशिक व कोकण विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या काही सरपंचांशी आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी संवाद साधला.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज आष्टी ता. मोहोळचे सरपंच अमित व्यवहारे, गोपाळपूर ता. पंढरपूरचे सरपंच विलास मस्के, चिंचणी ता. पंढरपूरच्या सरपंच मुमताज शेख, जकापूर ता. अक्कलकोटच्या सरपंच दीपाली आळगी, आंधळगाव ता. मंगळवेढाच्या सरपंच शांताबाई भाकरे, रहाटेवाडी ता. मंगळवेढा वर्षाराणी गोपाळ पवार उपस्थित होत्या.

डॉ. अमित व्यवहारे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना त्यांनी गावात राबविलेल्या उपायांबाबत माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, सोलापूर जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ‘माझं गाव कोरोनामुक्त गाव व गाव तिथे कोविड सेंटर’ ही संकल्पना सुरू केली. जिल्हा परिषदेने विविध १५ अभियाने दिली.

त्यातून आम्ही गावातील सिल्हवर ओक स्कूलमध्ये कोविड केअर सेंटर सुरू केले. सेंटर सुरू झाले. त्यावेळेस ३५ पेशंट होते. या पेशंटना सेंटरच्या बाहेर जाऊ दिले नाही. यामुळे संक्रमणाला आळा बसला. त्याचबरोबर कोविड सेंटरमध्ये चांगले उपचार, सकस आहार आणि पेशंटची मानसिक स्थिती चांगली राहिल,

याकडे लक्ष दिले. ‘मी डॉक्टर असल्यामुळे रूग्णांना तपासत होतो. जिल्हा परिषदेच्या वतीने माझे गाव कोरोना मुक्त गाव अभियान सुरू केले.

यामध्ये आम्ही टेस्टिंग, ट्रेसिंग व ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर केला. जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम विभागाचे सभापती विजयराज डोंगरे यांची ग्रामीण कोविड सेंटर उभारणीसाठी चांगली मदत झाल्याचे डॉ. व्यवहारे यांनी सांगितले.

सरपंचांशी झालेल्या महासंवादाच्या कार्यक्रमाच विविध कोरोनामुक्ती बरोबरच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. ग्रामपंचायतीचे सरपंचांना प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयात बोलविण्यात आले होते.

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती यामध्ये सहभागी होण्याचे यापूर्वी आवाहन केले होते. मोठ्या संख्येने ग्रामपंचायती सहभागी झाल्या होत्या.

कोरोनामुक्त गावांना भेटी देणार : स्वामी

सोलापूर जिल्ह्यात कोरोनामुक्त सहा गावांना प्रामुख्याने भेटी देऊन त्यांना प्रोत्साहन देणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले. ज्या सरपंचांनी यात योगदान दिले आहे. ते कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

कोरोनामुक्त गाव अभियानाचा चारवेळा नामोल्लेख

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून माझं गाव कोरोनामुक्त गाव अभियान सुरू केले. त्याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या भाषणात केली होती. जनतेला संबोधित असताना त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींचा गौरव केला होता.

त्यानंतर माझ गाव कोरोना मुक्त गाव अभियान राज्यात सुरू करणार असल्याचे जाहीर करून शासन निर्णय काढला. सरपंचाशी आज संवाद साधून त्यांनी कोरोनामुक्त गाव अभियानाचा चार वेळा नामोल्लेख केला. हे अभियान प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढामुख्यमंत्री उद्धव ठाकरे

संबंधित बातम्या

घरबसल्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता अशाप्रकारे करा अपडेट

नागरिकांनो! राज्यातील लाखो रेशन कार्ड्स होणार बंद; सरकारकडून 5 मोठे बदल, जाणून घ्या नवे नियम काय?

March 9, 2026
दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

मोठी बातमी! कॉलेज आणि शाळांमध्ये मुलींना लाठ्याकाठ्यांचे प्रशिक्षण; कमवा आणि शिका योजनेतून ‘एवढे’ रुपये मिळणार; सरकारची घोषण

March 9, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! शेतीचा वाद ठरला काळ; सुसाईड नोटमध्ये मांडली व्यथा आणि संपवलं आयुष्य

March 8, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

March 8, 2026
मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

March 8, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार नको, १ लाखाचा लाभ द्या; ​उपसरपंच बालाजी गरड यांची शासनाकडे आग्रही मागणी ​

March 7, 2026
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

सोलापूर विमानतळाचा फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशनचा मार्ग मोकळा; विद्यार्थ्यांचे पायलट होण्याचे स्वप्न होणार साकार

March 7, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’ जाहीर; ‘इतक्या’ लाखांपर्यंत कर्जमाफी; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

March 6, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

खळबळजनक! सात हजारांची लाच स्वीकारताना चालकाला रंगेहाथ पकडले; मंडल अधिकाऱ्यांच्या गाडीतच पैसे घेतले

March 6, 2026
Next Post
भीमा नदीकाठ गावांना धोक्याचा इशारा! उजनीतून भीमा पात्रात ‘एवढ्या’ लाख क्यूसेसचा विसर्ग

पावसाळ्याला आजपासून सुरुवात, सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश; 'या' दिवशी वादळी पावसाचा अंदाज

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मुख्यमंत्र्यांच्या मुलाची राजकारणात एन्ट्री; आता थेट उपमुख्यमंत्री होणार, राजकीय चर्चांना उधाण

March 9, 2026
घरबसल्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता अशाप्रकारे करा अपडेट

नागरिकांनो! राज्यातील लाखो रेशन कार्ड्स होणार बंद; सरकारकडून 5 मोठे बदल, जाणून घ्या नवे नियम काय?

March 9, 2026
दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

मोठी बातमी! कॉलेज आणि शाळांमध्ये मुलींना लाठ्याकाठ्यांचे प्रशिक्षण; कमवा आणि शिका योजनेतून ‘एवढे’ रुपये मिळणार; सरकारची घोषण

March 9, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! शेतीचा वाद ठरला काळ; सुसाईड नोटमध्ये मांडली व्यथा आणि संपवलं आयुष्य

March 8, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

March 8, 2026
​’साप्ताहिक रणयुग टाईम्स’चा १४ वा वर्धापन दिन: मंगळवेढ्यात कर्तृत्ववानांचा होणार सन्मान; संपादक प्रमोद बिनवडे यांची माहिती

​’साप्ताहिक रणयुग टाईम्स’चा १४ वा वर्धापन दिन: मंगळवेढ्यात कर्तृत्ववानांचा होणार सन्मान; संपादक प्रमोद बिनवडे यांची माहिती

March 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..