mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भूसंपादनाच्या मोबदल्याचे साडेतीन कोटी हडपले; दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 26, 2020
in क्राईम, सोलापूर
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सांगली-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ गेलेला असल्याने भूसंपादन झाली आहे. त्यासंदर्भात भूसंपादन झालेल्या मोबदल्याची नोटीस त्या गटाशी संबंधित असणाऱ्या सर्व व्यक्तींना त्यांच्या नावे भूसंपादन मोबदला ३ कोटी ६० लाख २४ हजार १०२ रुपये अशी नमूद करून एकत्रित पाठविल्या होत्या.

जुनोनी-काळूबाळूवाडी येथील अंकुश मनोहर कांबळे यांच्या मालकी वहिवाटीची जमीन गट नं. १८० या मिळकतीचे त्यांच्या भावकीतील लोकांमध्ये अद्याप वाटप झालेले नाही.

सदर नोटिसीमध्ये फिर्यादीचे वडील मनोहर कांबळे यांचे नावदेखील नमूद होते. दरम्यान, नोटीस मिळाल्यानंतर तानाजी मारुती कांबळे यांनी स्वतःच्या नावे १०० रुपयांचा स्टॅम्प घेऊन संजय अशोक कांबळे, नवनाथ सोपान कांबळे, सुवर्णा सुधाकर कांबळे, अनिता केशव कांबळे, सदाशिव बापू कांबळे, विठ्ठल दामू कांबळे, कुमार तातोबा कांबळे, शशिकांत मनोहर कांबळे, गोरक्ष सखाराम कांबळे, सर्वजण अंकुश कांबळे यांचा भाऊ नंदकुमार, प्रफुल्ल व आई तुळसाबाई यांच्या घरी येऊन तुम्हाला तुमच्या मोबदल्याची रक्कम द्यायची आहे.

त्यासाठी फोटो, आधारकार्ड छायांकित प्रती जोडून घेऊन गेले.शेजारील भावकीतील त्या दहा जणांनी मिळून संगनमताने फसवणूक करण्याच्या हेतूने त्यांच्याकडून घेतलेले फोटो तानाजी कांबळे यांच्या नावे घेतलेल्या स्टॅम्पवर चिटकवून त्यास आधारकार्ड प्रती जोडून त्या स्टॅम्पवर जमीन गट नं. १८० मधील रस्त्याकरिता संपादित झालेल्या भूसंपादनाची सुमारे ३ कोटी ६० लाख २४ हजार १०२ रुपये लिहून घेणार तानाजी कांबळे देण्यास हरकत नाही, त्यास आमची सहमती आहे.

असा आशयाचा खोटा, बनावट मजकूर फसवणूक करण्याच्या हेतूने नमूद करून लिहून घेणार म्हणून फिर्यादीचा भाऊ नंदकुमार, प्रफुल्ल व तुळसाबाई यांची नावे नमूद केली आहेत. त्यांच्या नावापुढे फोटो चिटकवून डुप्लिकेट सह्या व अंगठे केले.

सदर स्टॅम्पवर सुरुवातीला कार्यकारी दंडाधिकारी तथा मंडलाधिकारी सांगोला यांच्यासमोर नमूद केले. त्यावर कार्यकारी दंडाधिकारी कोळा यांची सही घेऊन ओळख म्हणून आमिर आतार यांची स्वाक्षरी घेतली.

सदर घेतलेल्या स्टॅम्पवरील डुप्लिकेट सह्या फसवणूक करण्याच्या हेतूने अंकुश कांबळे यांची रक्कम हडप करण्याच्या हेतूने सक्षम प्राधिकारी भूसंपादन यांच्याकडे देऊन फिर्यादीची परस्पर रक्कम हडप केली आहे. दरम्यान, अंकुश कांबळे यांनी चौकशी केली असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

संबंधितांना विचारणा केली असता ते सर्वजण शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी देत आहेत. याबाबत अंकुश कांबळे सांगोला पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनी फिर्याद घेतली नाही.

म्हणून त्यांनी थेट पोलीस अधीक्षक सोलापूर यांच्याकडे धाव घेऊन सांगोला पोलीस फिर्याद घेत नसल्याचे सांगितले. दरम्यान, अंकुश कांबळे यांनी वकिलामार्फत सांगोला न्यायालयात प्रतिज्ञापत्रावर लिहून फिर्याद दाखल केली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: भूसंपादन

संबंधित बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आत्याच्या मुलाशी लग्न, पदरात 2 मुली, सुखाचा संसार सुरू असतानाच महिलेनं मुलीसह संपवलं जीवन, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

July 29, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
Next Post
विद्यार्थ्याने गळफास घेतला; मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे आत्महत्या केल्याचा दावा

मंगळवेढा ब्रेकिंग! कौटूंबिक नैराश्येतून तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मुलीचा संसार वाचवण्यासाठी सासू सरसावली; जावयाला किडनी दान करून दिले नवजीवन

August 4, 2026

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा