mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा ब्रेकिंग! कौटूंबिक नैराश्येतून तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 26, 2020
in सोलापूर, मंगळवेढा
विद्यार्थ्याने गळफास घेतला; मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे आत्महत्या केल्याचा दावा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील सागर तुकाराम शिवशरण (वय.२६) या तरूणाने कौटुंबिक नैराश्येतून दारूच्या नशेत घरातील लोखंडी अँगलला रस्सीने गळफास घेवून सायंकाळी आत्महत्या केली.

या प्रकरणी पोलिसात आकस्मात मयत अशी नोंद झाली आहे.दरम्यान मयताचे कारण अस्पष्ट असल्याने पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील मयत सागर तुकाराम शिवशरण हा कौटुंबिक नैराश्यात होता.तसेच त्याला दारूचे व्यसनही असल्याने त्याने दारूच्या नशेत दि.२५ रोजी सायंकाळी ४.०० वा. माचणूर येथील भिमनगरमधील राहते घरातील लोखंडी अँगलला रस्सीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची खबर आप्पा दादा शिवशरण यांनी पोलिसात दिली आहे.अधिक तपास बोराळे बीटचे पोलिस करीत आहेत.

बरूर येथे मारहाण

दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील बरूर येथे तमराया भीमाशंकर मकनापुरे (वय 23) यास गुरुवारी सायंकाळी गावातील हायस्कूलजवळ ग्रामपंचायत निवडणुकीबाबत मल्लिकार्जुन शिरढोणकर यांच्याशी बोलताना संतोष शिरढोणकर याने लाकडाने मारहाण केली. मकनापुरे यास डोक्‍यास मार लागल्याने त्यास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

गरम पाण्याने बालक भाजला

खेळताना गरम पाणी अंगावर पडल्याने जय कुमार सुरवसे (वय 7, रा. क्रांती नगर, सोलापूर) हा मुलगा अंग व पाय भाजून जखमी झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली असून जय यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

उसने पैशासाठी त्रास दिल्याने महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

उसने घेतलेले पैसे देण्यासाठी नसीमा पठाण, चॉंदतारा मुजावर, रजिया शेख या महिलांनी त्रास दिल्याने मुमताज शेकू शेख (वय 40, रा. भाग्यलक्ष्मी नगर, नई जिंदगी, सोलापूर) या महिलेने विषारी गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुमताज शेख यांना त्रास होऊ लागल्याने इरफान शेख यांनी त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

मोबाईल चोरीची घटना

रंगभवन चौकामध्ये एसटी बसमध्ये चढणाऱ्या वृद्धाच्या खिशातील सहा हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरल्याची घटना घडली. याबाबत जयशेखर शिवबसप्पा पाटील (वय 60, रा.सलगर, ता. अक्कलकोट) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रफिक हसन शेख, अखलाक इमामसाब महाजबडे आणि एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक लिगाडे पुढील तपास करीत आहेत.

दुचाकीस्वार जखमी

कुत्रा आडवा आल्याने दुचाकी घसरून झालेल्या अपघातात प्रदीप चंद्रकांत खराडे (वय 30, रा. कामती बु, ता. मोहोळ) हा तरुण जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास मोहोळ ते कामती रोडवरील परमेश्‍वर पिंपरी देवस्थानासमोर झाला. जखमी खराडे याच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

तरुणाची आत्महत्या

उत्तर सोलापूर तालुक्‍यातील नान्नज येथील शंकर बाबू जानराव यांच्या शेतातील लिंबाच्या झाडास बेल्टच्या सहाय्याने गळफास घेऊन प्रभाकर दत्तात्रय कांबळे (वय 35) या तरुणाने आत्महत्या केली. कांबळे याच्या नातेवाइकांनी प्रभाकर कांबळे याला बेशुद्धावस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी त्यास मृत घोषित केले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आत्महत्यागळफासमंगळवेढा पोलीस स्टेशन

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

July 12, 2026
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

July 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती,भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

उजनी पुनर्वसन जमीन घोटाळा! डमी खरेदीचे मोठे रॅकेट; एजंट झाले ‘मालामाल’, संपूर्ण रॅकेटची उच्चस्तरीय सखोल चौकशीची जनतेतून तीव्र मागणी

July 11, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बँकेचे पैसे बुडवणे भोवले! धनश्री मल्टीस्टेटची आक्रमक वसुली; कारखान्याच्या माजी संचालकाची थेट तुरुंगात रवानगी; न्यायालयाचा मोठा दणका

July 10, 2026
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

मंगळवेढ्यात बुलेट राजांना दणका! पोलिसांची धडक कारवाई; मॉडिफाईड सायलेन्सर अन् विना नंबर प्लेटच्या ‘या’ वाहनांवर ‘ॲक्शन’

July 10, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

पुनर्वसनाच्या जमिनीवर डोळा! जमीन तुमची, आधार कार्ड खोटे अन् अंगठा दुसऱ्याचाच; मंगळवेढ्यात उजनी जमीन घोटाळ्याचा थरार, वाचून थक्क व्हाल; एजंट मालामाल

July 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आ.समाधान आवताडेंचा धडाका! मंगळवेढ्याला म्हैसाळचे, तर पंढरपूरला कॅनॉलद्वारे मिळणार पाणी; वीज पुरवठाही ८ तास होणार

July 10, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो सावधान! ‘अनधिकृत’ इंग्लिश शाळेचा सुळसुळाट; मुलांचे भविष्य अंधारात, स्कूल बसची सुरक्षाही रामभरोसे

July 9, 2026
Next Post
शेतकऱ्यांनी लक्ष द्या! वारसनोंदीसाठी आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

शेतकऱ्यांची तहसील व भूमी अभिलेख कार्यालयांची वारी थांबणार, जमिनींसंबंधी जुने उतारे फेरफार व सातबारा आता एका सर्च वर

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

July 12, 2026
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

July 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती,भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

उजनी पुनर्वसन जमीन घोटाळा! डमी खरेदीचे मोठे रॅकेट; एजंट झाले ‘मालामाल’, संपूर्ण रॅकेटची उच्चस्तरीय सखोल चौकशीची जनतेतून तीव्र मागणी

July 11, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बँकेचे पैसे बुडवणे भोवले! धनश्री मल्टीस्टेटची आक्रमक वसुली; कारखान्याच्या माजी संचालकाची थेट तुरुंगात रवानगी; न्यायालयाचा मोठा दणका

July 10, 2026
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

मंगळवेढ्यात बुलेट राजांना दणका! पोलिसांची धडक कारवाई; मॉडिफाईड सायलेन्सर अन् विना नंबर प्लेटच्या ‘या’ वाहनांवर ‘ॲक्शन’

July 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..