mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

वाळूचा दंड न भरल्यास जमीन होणार सरकारजमा; तहसील कार्यालयाची धडक कारवाई

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 12, 2020
in राज्य
शेतकऱ्यांनी लक्ष द्या! वारसनोंदीसाठी आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

अवैध वाळू उत्खनन, अवैधरीत्या वाळूचा साठा करणे आणि अवैधरीत्या वाळूची वाहतूक या प्रकरणी तालुक्‍यातील 18 जणांना 3 कोटी 13 लाखांचा दंड करण्यात आला होता.

मात्र, त्यांनी तो न भरल्याने आता संबंधितांच्या सातबारावर बोजा चढवण्यात आला. त्यानंतरही दंड न भरल्याने आता ती बोजा चढवलेली जमीन सरकारजमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित हवालदिल झाले आहेत.

कऱ्हाड तालुक्‍यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जातो. तो करताना अनेकदा अवैधरीत्या करण्यात येत असल्याचेही यापूर्वी करण्यात आलेल्या कारवायातून स्पष्ट झाले आहे.

अशा अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या, साठा करणाऱ्या आणि अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्यांना तहसील कार्यालयाने दंड केला होता.

अनेकांनी तो दंड भरलाच नाही. त्यामुळे त्यांच्या सातबारावर बोजाही चढवण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. त्यांच्या सातबारावर संबंधित दंडाचा बोजा चढवल्यानंतरही त्यांनी दंडाची रक्कम भरलेली नाही.

त्यांना आता ती जमीन सरकारजमा करण्याची नोटीस पाठवण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी तालुक्‍यातील पोतले, ओंड, ओंडोशी, कार्वे, शिरवडे येथील नऊ, मालखेड, नडशी येथील तीन, तर वारुंजी येथील एक अशा 18 जणांना 3 कोटी 13 लाख 68 हजार 912 रुपयांच्या वसुलीच्या नोटीस पाठवल्या आहेत.

त्यांनी दिलेल्या मुदतीत त्याची कार्यवाही न केल्यास संबंधितांच्या सातबारावरील बोजा कायम ठेऊन त्या जमिनी सरकारजमा करण्यात येणार आहेत. त्यासाठीची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे.

कऱ्हाड तालुक्‍यातील 18 जणांना वाळूच्या दंडापोटी भरायच्या रकमेच्या नोटिसा पाठवल्या आहेत. संबंधितांनी मुदतीत कार्यवाही न केल्यास त्यांची जमीन सरकार जमा होणार आहे. संबंधितांनी त्याची नोंद घेऊन मुदतीत दंड भरावा.-अमरदीप वाकडे, तहसीलदार, कऱ्हाड

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अवैध वाळू उपसाजमीनसरकारजमा

संबंधित बातम्या

बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

मोठी बातमी! भोंदूबाबाचा पाय आणखी खोलात; अशोक खरात विरोधात ‘हा’ गुन्हा दाखल

April 6, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

जनता संभ्रमात! भगीरथदादा, तुमची निष्ठा नेमकी कुणाकडे? ​बीआरएस, काँग्रेस, राष्ट्रवादी अन् आता शिवसेना; भालकेंच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप

April 6, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

कामाची बातमी! SIR म्हणजे काय? SIR यादीत नाव आहे की नाही? कसं चेक करायचं?

April 1, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

March 30, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

नागरिकांनो! देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा

March 29, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांनो! शेतरस्ता अडवाल तर महागात पडेल, ५ वर्ष शासनाचा कोणताही लाभ मिळणार नाही; नवा निर्णय काय?

March 28, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पुण्यातील मंगळवेढेकर बांधवांसाठी सुवर्णसंधी! आमदार समाधान आवताडे साधणार थेट ‘संवाद’; अडीअचणी जाणून घेण्यासाठी विशेष बैठक

March 28, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

मोठी बातमी! बारामतीत अपघात, बंगळुरूत तक्रार; अजित पवार अपघात प्रकरणी दाखल झालेली झिरो FIR नेमकी आहे तरी काय?

March 27, 2026
अभिमानास्पद लढा! मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड ठरला महाराष्ट्र केसरीचा उपविजेता; मिळाली ‘ही’ बक्षिसे

महाराष्ट्र केसरी: महेंद्रची झुंज ठरली थरारक; मंगळवेढ्याचा ‘मान’ थोडक्यात हुकला; मैदानात काय घडलं?

March 23, 2026
Next Post
मंगळवेढ्यात खा.शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १२१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

मंगळवेढ्यात खा.शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १२१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

सोलापूर जिल्हात ‘या’ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा शंखनाद; आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; असा आहे निवडणूक कार्यक्रम..

April 7, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

स्मशानभूमी नाही तर निधी नाही! पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्ह्यासाठी ‘पॉवरफुल’ निर्णय; मैं जो बोलता हूँ.. वो मैं करता हूँ..

April 7, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

मोठी बातमी! भोंदूबाबाचा पाय आणखी खोलात; अशोक खरात विरोधात ‘हा’ गुन्हा दाखल

April 6, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नवीन मोबाईलसाठी धरला हट्ट, घरच्यांनी नकार देताच 21 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन; सोलापूर जिल्हा हादरला

April 6, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

जनता संभ्रमात! भगीरथदादा, तुमची निष्ठा नेमकी कुणाकडे? ​बीआरएस, काँग्रेस, राष्ट्रवादी अन् आता शिवसेना; भालकेंच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप

April 6, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

मंगळवेढ्यात काळजाचा थरकाप! सुसाट कंटेनरने हिरावले दोन तरुण प्राण; गावावर शोककळा, एकाचा जागीच मृत्यू तर दुसऱ्याची रुग्णालयात प्राणज्योत मालवली

April 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा