टीम मंगळवेढा टाईम्स ।
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 121 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना पाणी जार, हेल्मेट, कुकर अशा भेट वस्तू प्रदान करण्यात आले.
संध्या संपूर्ण जगभरात कोरोनो रोग महामारीने थैमान घातले असून रूग्णालयात रूग्णांना या काळात रक्ताची गरज भासू लागल्यामुळे निर्माण झालेला तुटवडा व सामाजिक जाणीव लक्षात घेऊन मंगळवेढा शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीरास रक्तदात्यांनी उस्फूर्त प्रतिसाद नोंदविला. मंगळवेढा येथील श्रीराम मंगल कार्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात विठ्ठल कारखान्याचे संचालक भगीरथ भालके, जेष्ठ नेते रामभाऊ वाकडे, रामचंद्र जगताप, पांडूरंग ताड, मारूती वाकडे, महिला जिल्हा अध्यक्ष अनिता नागणे, नगराध्यक्षा अरूणा माळी, पक्षनेते अजित जगताप, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, नगरसेवक प्रवीण खवतोडे, राहूल सावंजी,संकेत खटके, सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य सहसचिव विजय खवतोडे, जिल्हा सरचिटणीस भारत बेदरे, काँग्रेस तालुका अध्यक्ष नंदकुमार पवार, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सुनील डोके, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष मुजम्मील काझी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहूल घुले, लिगल सेल शहराध्यक्ष अँड जावेद मुल्ला, कार्याध्यक्ष अर्जुन पवार, महिला तालुका अध्यक्ष संगीता कट्टे, महिला शहराध्यक्ष प्रफुल्लता स्वामी, पी.बी.पाटील, माजी नगराध्यक्ष भारत नागणे, महादेव जाधव, सचिन शिंदे,
रावसाहेब फटे, राजाराम गवळी, पंडीत गवळी, राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहराध्यक्ष संदीप बुरकुल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष हर्षद डोरले पाटील, ज्ञानेश्वर भगरे, सोमनाथ माळी, मिलींद ढावरे,सुरेश कट्टे,सोमनाथ बुरजे,
राहूल वाकडे, विनायक दत्तू, चंद्रकांत काकडे,संदीप फडतरे, संदीप घुले , प्रविण गोवे, प्रविण भोसले, गणेश धोत्रे,अर्जून देवकर,रवि घुले, शशी साखरे, असिफ अतार, अजित यादव,अशोक माने, अजित घुले, विनायक हजारे आदी उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज