mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

गुजरात,गोवा,राजस्थान,नवी दिल्ली राज्यातून येणाऱ्या नागरिकांना आता कोरोना निगेटिव्ह असेलच महाराष्ट्रात प्रवेश मिळेल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 24, 2020
in राज्य
सोलापूर कोरोना ब्रेकिंग! शनिवारी 153 जण कोरोना पॉझिटिव्ह; ‘या’ गावातील 10 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारने या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जारी केली आहे.

महाराष्ट्रात यायचं असेल तर सोबत कोरोना निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट आणावा. अन्यथा तुम्हाला आल्या पावली परत पाठवलं जाईल, असं राज्य सरकारने नव्या नियमावलीत नमूद केलं आहे.

त्यामुळे या तिन्ही राज्यातील नागरिकांना महाराष्ट्रात येताना कोरोना निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्रं सोबत आणावं लागणार आहे.

दिवाळीनंतर दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्यात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत.महाराष्ट्रातही हा आकडा वाढत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मिशन बिगीन अगेन अंतर्गत गोवा, दिल्ली, गुजरात आणि राजस्थानमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी महाराष्ट्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे.

विमान, रस्ते मार्ग आणि रेल्वे मार्गाने महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 25 नोव्हेंबरपासून हे निर्बंध लागू होणार असल्याचं नोटिफिकेशन्समध्ये नमूद करण्यात आलं आहे.

नव्या निर्देशानुसार उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली या राज्यातून महाराष्ट्रात विमान आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी 72 तासाची कोव्हिड टेस्ट सक्तीची करण्यात आली आहे.

तसेच दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा राज्यातून महाराष्ट्रात हवाई, रेल्वे व रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांना कोविड आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत आणणे बंधनकारक करण्यात आलं आहे.

विमानाने प्रवास करत असाल तर…

दिल्ली, गोवा, राजस्थान आणि गुजरातमधून हवाईमार्गे मुंबईत येणाऱ्यांनी आरटीपीसीआर निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट सोबत आणणं बंधनकारक आहे. विमानतळावर या रिपोर्टची विचारणा करण्यात आल्यावर तो दाखवणं बंधनकारक आहे.

महाराष्ट्रात येण्यापूर्वी 72 तासांत ही आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी
प्रवाशाने आरटीपीसीआर चाचणी केली नसेल तर विमानतळावर त्याची चाचणी करण्यात येईल. त्याचा खर्च प्रवाशालाच करावा लागणार आहे.

विमानतळावर कोरोना चाचणी केल्यानंतर प्रवाशांना घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल. त्यानंतर कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यावरच प्रवाशाला त्याची माहिती कळवली जाईल.

प्रवाशाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्याच्याशी प्रोटोकॉलनुसारच व्यवहार केला जाईल.

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी…

दिल्ली, राजस्थान, गोवा आणि गुजरातमधून महाराष्ट्रात रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांनाही आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे कोरोना निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट असावा.

महाराष्ट्रात प्रवासाला येण्यापूर्वी 96 तासांत त्यांनी आरटीपीसीआर चाचणी करावी.
प्रवाशाकडे आरटीपीसीआर चाचणी अहवाल नसेल तर रेल्वेस्थानकांवर त्यांच्या शरीराचं तापमान तपासलं जाईल.

प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे नसतील तरच त्यांना राज्यात प्रवेश दिला जाईल.
ज्या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे जाणवतील त्यांची अँटिजेन टेस्ट करण्यात येईल. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्यांनी परत त्यांच्या राज्यात पाठवलं जाईल.

एखाद्याला कोरोनाची लक्षणं आढळल्यास त्याला कोविड सेंटरमध्ये पाठवलं जाईल.

रस्ते मार्गे प्रवास करणाऱ्यांसाठी….

दिल्ली, गोवा, राजस्थान आणि गुजरातमधून येणाऱ्या प्रवाशांच्या शारिरीक तपासणीसाठी जिल्हाधिकारी राज्यांच्या सीमेवर व्यवस्था करतील.

कोरोनाची लक्षणे नसलेल्या प्रवाशांना राज्यात प्रवेश दिला जाईल. कोरोनाची लक्षणे असलेल्यांना त्यांच्या राज्यात जावं लागणार आहे.

ज्या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे जाणवतील त्यांची अँटिजेन टेस्ट करण्यात येईल. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्यांना महाराष्ट्रात पुढचा प्रवास करता येईल.एखाद्याला कोरोनाची लक्षणं आढळल्यास त्याला कोविड सेंटरमध्ये पाठवलं जाईल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोना न्युजमहाराष्ट्र राज्य सरकार

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावात पाणी नाही, मजुरांना पैसे नाही! ग्रामपंचायतींचा आर्थिक कारभार ठप्प; कोर्टाच्या आदेशामुळे सरपंच अडचणीत; ग्रामीण भागात संतापाचा उद्रेक

May 10, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेत ‘या’ विषयात 80 हजारापेक्षा जास्त विद्यार्थी नापास

May 9, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

हाण की बडीव! नवरदेवाच्या बुटांसाठी भर लग्नात राडा, आपापसात भिडले वधू आणि वरपक्ष; झिंज्या धरून फ्री-स्टाईल हाणामारी

May 9, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ वर्गाची शिकण्याची पद्धतच बदलणार; नव्या अभ्यासक्रमाचं गुपित काय?

May 8, 2026
पिकांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, ‘या’ तालुक्यात वीज पडून महिला व तरुण ठार; ४ शेळ्या दगावल्या

वादळी वारा अन् विजांचा कडकडाट; राज्यात पुढील ५ दिवस पावसाची शक्यता, ‘या’ चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

May 4, 2026
मर्चंट नेव्हीतील अधिकार्‍यावर हल्ला; माजी सरपंचासह 5 जणांना पोलिस कोठडी

किळसवाणी! भोर प्रकरणातल्या विकृत नराधमाचं हादरवणारं सत्य; वाचून येईल संताप

May 4, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

पुढील 48 तास अत्यंत धोक्याचे! अवकाळीचं मोठं संकट, घराबाहेर पडू नका; आयएमडीकडून हाय अलर्ट

May 1, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

ऑल द बेस्ट! बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, HSC बोर्डाकडून निकालाची तारीख जाहीर; निकाल कुठे पाहायचा?

May 1, 2026
सोलापूर ग्रामीण भागात पुन्हा 266 जण कोरोना पॉझिटिव्ह; 22 वर्षीय तरुणाचा बळी

मोठी बातमी! कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात गूढ अधिक वाढलं; डॉक्टरांनी सांगितली हादरवणारी माहिती

April 30, 2026
Next Post
शाळांची वेळ ठरविण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना; दोन शिफ्टमध्ये भरतील शाळा

मंगळवेढा तालुक्यातील 'इतक्या' विद्यार्थ्यांनी शाळेकडे फिरवली पाठ; विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास पालकांचा नकार

ताज्या बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

संतापजनक! शेतीच्या कारणावरून मुलाचा वडिलांवर चाकूने हल्ला; वडिलांची मुलाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार

May 10, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावात पाणी नाही, मजुरांना पैसे नाही! ग्रामपंचायतींचा आर्थिक कारभार ठप्प; कोर्टाच्या आदेशामुळे सरपंच अडचणीत; ग्रामीण भागात संतापाचा उद्रेक

May 10, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात गांजा विक्रीचे मोठे रॅकेट उध्वस्त; पाच जणांवर गुन्हे, झटपट श्रीमंत होण्याच्या नादात तरुण गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

May 10, 2026
शेतकऱ्यांना मोठा आधार! सोलापुरात कांद्याला मिळाला प्रति क्विंटल ‘एवढया’ हजारांचा भाव

​कांदा रडवतोय! ५० पैसे किलो भाव; ७३ पिशव्या कांदा विकून खर्च वजा जाता शेतकऱ्याच्या पदरात उरली चहा-पाण्याइतकीच रक्कम; बळीराजा’चे डोळे पाणावले

May 9, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेत ‘या’ विषयात 80 हजारापेक्षा जास्त विद्यार्थी नापास

May 9, 2026
निराधार लेकरांसोबत सुखाचा घास! उद्योजक संजय आवताडे यांचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत ‘सहभोजनाने’ होणार साजरा

निराधार लेकरांसोबत सुखाचा घास! उद्योजक संजय आवताडे यांचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत ‘सहभोजनाने’ होणार साजरा

May 9, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा