mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात बबनराव आवताडे गटाने फुकले निवडणुकीचे रणशिंग; अशी आखली गेली व्युवरचना

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 10, 2021
in मंगळवेढा, सोलापूर
मंगळवेढ्यात बबनराव आवताडे गटाने फुकले निवडणुकीचे रणशिंग; अशी आखली गेली व्युवरचना

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यात आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद , पंचायत समिती , दामाजी कारखाना निवडणुकीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व निवडणुका लढविल्या जाव्यात,

तसेच या निवडणुकीमध्ये भाजपा सोडून सर्व पक्षातील नेतेमंडळी व कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन निवडणुका लढविण्याची मागणी आवताडे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली.

आंधळगाव येथे आगामी निवडणुकीसंदर्भात बबनराव आवताडे गटाने कार्यकर्त्यांची विचार विनिमय बैठक आयोजित केली होती.

यावेळी खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे म्हणाले, आगामी काळात येणाऱ्या दामाजी कारखाना, जिल्हा व पंचायत समितीच्या निवडणुका सर्वांना एकत्रित घेऊन लढविल्या जाणार असून , या निवडणुकीत निष्ठावंत तसेच युवक कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे.

 

तसेच विधानसभा निवडणुकीतील पराभवाने न खचता नव्या उमेदीने जनतेच्या मदतीसाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना मुलाणी म्हणाले, दामाजी कारखान्यात हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू असून , त्या विरोधात लोकशाही पद्धतीने निवडणूक लढायची आहे. ही निवडणूक बबनराव आवताडे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे.

दामाजीच्या कारभाऱ्यांनी १० रु किलो साखर पहिल्या दोन वर्षात न देता चालढकल केली. परन्तु आपण पाठपुरावा केल्याने सभासदांना साखर मिळाली.

दामाजी कारखाना डबघाईला आणला असून , नव्या जोमाने कारखाना चालवण्यासाठी कोरोना सदृश्य अवस्थेत असलेल्या कारखान्याला बबनराव आवताडे रुपी रेमेडिसीवर इंजेक्शन देण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सचिन कदम यांनी कारखान्याच्या विद्यमान सत्ताधाऱ्यांनी कारखान्यावर ५६ कोटीवरून १२४ कोटी कर्ज केल्याचा आरोप केला. यावेळी अनेक कार्यकत्यांनी आपले विचार मांडताना भाजपा सोडून सर्व पक्षांना एकत्रित निवडणुका लढविण्याची मागणी करीत बबनराव आवताडे यांनी घेतलेला कोणताही निर्णय आम्हाला मान्य असल्याचे सांगितले.

यावेळी बैठकीच्या वेळी बबनराव आवताडे , विठ्ठल घुले , संजय पवार , ज्ञानेश्वर भगरे , प्रकाश जुंदले , समाधान क्षीरसागर , अनिल पाटील , अनिल माळी , महादेव माळी , काशीनाथ पाटील , रामचंद्र लेंडवे , अंकुश डांगे , दिलीप सावंत , आबासो लांडे , राजाभाऊ मेतकूटे , दिलीप भुसे , अशोक लेंडवे , संजय क्षीरसागर , हिम्मत पाटील , सचिन कदम , विष्णू जाम्बले , तुकाराम चव्हाण , प्रकाश सावंत , दादा बाळा लेंडवे , हणमंत मासाल , अॅड . दत्ता तोडकरी , शैलेश आवताडे , संजय जगताप ,

ADVERTISEMENT

जमीर शेख , सोपान चव्हाण , पंडित ताणगावडे , प्रशांत पाटील , बाळदादा नागणे तानाजी दिघे , मनोज चव्हाण , श्रीकांत पाटील , यांच्यासह लक्ष्मी दहिवडी गणातील अनेक गावातील सोसायटी व ग्रामपंचायतचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक मोहसीन मुलाणी , आभार अंकुश डांगे यांनी तर सूत्र संचालन भारत मुढे यांनी केले .

 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: निवडणूक लढणारबबनराव आवताडेसिध्देश्वर आवताडे
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यात शैक्षणिक वर्तुळात खळबळ; जुगार खेळतांना शिक्षक सापडला

बडे मासे गळाला! मंगळवेढ्यात हॉटेलच्या पाठीमागे सुरु असलेल्या दोन जुगार अड्ड्यावर छापा; सर्वात मोठी कारवाई

August 11, 2022
मंगळवेढ्यात पाण्याच्या टँकर मागणीचा प्रस्ताव दाखल; आमदार समाधान आवताडेंनी बोलावली ‘या’ गावांची बैठक

देवांना साकडे! मंगळवेढ्यातील ‘या’ गावात पावसासाठी ग्रामदैवतांना घातला जलाभिषेक

August 11, 2022
उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

अनेक पिके पाण्याअभावी कात टाकत आहेत, उजनीतील अतिरिक्त पाणीसाठा मंगळवेढ्यातील गावांसाठी द्या; आ.आवताडेंची मागणी

August 11, 2022
वेगळ्या मुहूर्ताची गरज नाही! आज असे करता येईल विधिवत रक्षाबंधन; पंचांगकर्ते दाते

वेगळ्या मुहूर्ताची गरज नाही! आज असे करता येईल विधिवत रक्षाबंधन; पंचांगकर्ते दाते

August 11, 2022
विद्यार्थ्यांनो! टीईटी आणि नेट परीक्षा एकाच दिवशी, एसटी संपामुळे उमेदवारांची गैरसोय; टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

विद्यार्थ्यांना त्रास! सोलापूर विद्यापीठाच्या चुका; ‘या’ वर्षाच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा आता १७ ऑगस्टला होणार

August 10, 2022
Breaking! मंगळवेढ्यात उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

अख्ख गाव रडलं! तीन वर्षीय मुलीसह महिलेची आत्महत्या, फास न लागल्याने मुलगा बचावला; एकाच चितेवर दोघांना अंत्यसंस्कार

August 10, 2022
मी शपथ घेतो की… 18 आमदार शपथबद्ध, सर्व कॅबिनेट मंत्री; आता 20 जणांचे असणार मंत्रिमंडळ

पालकत्व! सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदी ‘या’ मंत्र्याची लागणार वर्णी; आज होणार अधिकृत घोषणा

August 10, 2022
खळबळ! महिलांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ७ जणींना अटक

खळबळ! मंगळवेढ्यात जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा, क्लब चालकासह नऊ जणांविरूध्द गुन्हे दाखल

August 10, 2022
दत्तात्रय भरणे औकातीत राहायचं, उजनीसुद्धा ओलांडू देणार नाही; आमदार तानाजी सावंत यांचा इशारा

मोठी बातमी! नामदार तानाजी सावंत यांना ‘हे’ खात मिळणार; मंत्रिपदाने मंगळवेढ्यात जल्लोष

August 10, 2022
Next Post

अक्षरगंध साहित्य व सांस्कृतिक संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी अ‍ॅड.दत्तात्रय तोडकरी यांची वर्णी

ताज्या बातम्या

मी शपथ घेतो की… 18 आमदार शपथबद्ध, सर्व कॅबिनेट मंत्री; आता 20 जणांचे असणार मंत्रिमंडळ

यादी समोर! 15 ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार; पालकमंत्रीही हेच राहणार?

August 11, 2022
मंगळवेढ्यात शैक्षणिक वर्तुळात खळबळ; जुगार खेळतांना शिक्षक सापडला

बडे मासे गळाला! मंगळवेढ्यात हॉटेलच्या पाठीमागे सुरु असलेल्या दोन जुगार अड्ड्यावर छापा; सर्वात मोठी कारवाई

August 11, 2022
Breaking! पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यांत ‘या’ कारणांसाठी जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार

मोठी बातमी! राज्यात पाेलीस दलात २९ हजार पदे रिक्त; पदे भरण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत डेडलाइन

August 11, 2022
शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

Breaking! मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

August 11, 2022
मंगळवेढ्यात पाण्याच्या टँकर मागणीचा प्रस्ताव दाखल; आमदार समाधान आवताडेंनी बोलावली ‘या’ गावांची बैठक

देवांना साकडे! मंगळवेढ्यातील ‘या’ गावात पावसासाठी ग्रामदैवतांना घातला जलाभिषेक

August 11, 2022
उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

अनेक पिके पाण्याअभावी कात टाकत आहेत, उजनीतील अतिरिक्त पाणीसाठा मंगळवेढ्यातील गावांसाठी द्या; आ.आवताडेंची मागणी

August 11, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा