टीम मंगळवेढा टाईम्स । अज्ञात कारणावरून गळफास घेवून ३६ वर्षीय महिलेने आत्महत्या करण्याची घटना मंगळवेढा शहरात घडली असून निर्मला दत्तात्रय मदने असे त्या आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे.
दरम्यान या प्रकरणी मयताची पोलिसात नोंद झाली आहे. यातील मयत निर्मला मदने हिने दि .१४ रोजी सकाळी ९ .३० च्या पुर्वी गोफणबाई रोडवर अज्ञात कारणावरून गळफास घेवून आत्महत्या केल्याची खबर अजीनाथ बोडरे यांनी पोलिसात दिली आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट असल्याने पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे.अधिक तपास पोलिस नाईक विक्रमसिंह राठोड हे करीत आहेत.
Mangalwedha A 36-year-old woman committed suicide by hanging herself for unknown reasons
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज